एक्स्प्लोर

Devendra Fadnavis: बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील एका कार्यक्रमानंतर माध्यमांसोबत बोलताना महाराष्ट्राच्या हास्यरेषा कार्यक्रमावेळी उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या भेटीबद्दल भाष्य केलं आहे.

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत महाराष्ट्राच्या हास्यरेषा पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे उपस्थित होते. या कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची बंद खोलीत बैठक झाल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील कार्यक्रमानंतर बोलताना कालच्या कार्यक्रमाला साहित्य प्रेमी म्हणून गेलो होतो असं म्हटलं. काल बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, कुठलाही वेगळा राजकीय अर्थ काढायची गरज नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

बंद खोलीत बैठक झाली नाही...

मला असं वाटतं की अतिशय छान कार्यक्रम होता. महाराष्ट्राच्या हास्यरेषा, राज्यातील 100 वर्षातील 75 व्यंगचित्रकारांबाबत ते पुस्तक आहे. तो व्यंगचित्रकारांचा कार्यक्रम होता, आम्ही तिघेही साहित्य प्रेमी म्हणून गेलो होतो. तिथे जी भाषणे झाली ती लाईटर म्हणजे हास्य विनोद फुलवणारी अशा प्रकाराची होती, यातून महाराष्ट्राचे संस्कृती पाहायला मिळते विचार काही असले तरी, विचारामध्ये अनेकवेळा एक अंतर असलं. राजकीयदृष्ट्या एकमेकांवर टीका करत असलो तरीदेखील अशा कार्यक्रमात आम्ही एकत्र येऊ शकतो. ही संस्कृती महाराष्ट्र अपेक्षित आहे. लोकांना देखील कार्यक्रम आवडला. पुढील काळात देखील असे कार्यक्रम व्हावेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.  

माध्यमांध्ये बघितलं की तिघांची बंद खोलीत बैठक झाली. बंद खोलीत बैठक वगैरे नाही. स्टेजवर येण्यापूर्वी सगळे, काही व्यंगचित्रकारांसह सगळे वेटिंग एकत्र बसलो होतो.  वेळ झाल्यावर सगळे एकत्रित स्टेजवर आलो. त्यामुळे कुठलिही राजकीय चर्चा झाली नाही.  यातून कुठलेही अन्वयार्थ काढू नये, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. 

महाराष्ट्रात इलेक्ट्रिक बसेस ही आमची प्राथमिकता आहे. मुंबई महापालिका एकटी दहा हजार इलेक्ट्रिक बसेस खरेदी करु इच्छिते. एसटी महामंडळात 30 हजार बसेसची आवश्यकता आहे. पुणे, नागपूर महापालिकेत इलेक्ट्रिक बसेसची आवश्यकता आहे.  आज तेवढं उत्पादन होतं नाही. पिनॅकलच्या नव्या उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केलं तेव्हा त्यांना त्यांची उत्पादनक्षमता वाढवण्यास सांगितलं. एकट्या महाराष्ट्राला पुढच्या तीन ते चार वर्षात 50 हजार बसेसची आवश्यकता पडणार आहे. कारण आपल्याला ग्रीन मोबिलिटीला प्राधान्य द्यायचं आहे. मेक इन महाराष्ट्र बसेस असल्या तर त्या आम्हाला अधिक सोयीच्या आहेत. महाराष्ट्रात इलेक्ट्रिक व्हेईकलची इको सिस्टीम तयार होतेय, त्याचा अर्थव्यवस्थेला आणि महाराष्ट्राला फायदा होईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sayaji Shinde On Tree Cutting: 'महाराष्ट्रात सध्या कोरोनासारख्या ‘झाडखाऊ’ व्हायरसची लागण', सयाजी शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल; कर्जतमधील प्रकल्पाविरोधात नागपुरात राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
'महाराष्ट्रात सध्या कोरोनासारख्या ‘झाडखाऊ’ व्हायरसची लागण', सयाजी शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल; कर्जतमधील प्रकल्पाविरोधात नागपुरात राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
कर्जतमधील टोरेंट प्रकल्प नको असेल, तर सरकारमधून बाहेर पडावे; सत्ताधारी आमदार थोरवेंचा सुनील तटकरेंना टोला
कर्जतमधील टोरेंट प्रकल्प नको असेल, तर सरकारमधून बाहेर पडावे; सत्ताधारी आमदार थोरवेंचा सुनील तटकरेंना टोला
Gokul Election: कोर्टाने गोकुळ चेअरमन निवडीसाठी थेट तारीख दिली; महायुतीला दणका, निवडणूक आयोगालाही निर्देश
कोर्टाने गोकुळ चेअरमन निवडीसाठी थेट तारीख दिली; महायुतीला दणका, निवडणूक आयोगालाही निर्देश
Maharashtra Live News Updates: नागपुरात आज पर्यावरणवादी थाळी बजाओ आंदोलन; सयाजी शिंदेही सहभागी होणार
Maharashtra Live News Updates: नागपुरात आज पर्यावरणवादी थाळी बजाओ आंदोलन; सयाजी शिंदेही सहभागी होणार
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्त्याचे काम सुरु असतानाच मशीनचा उच्च दाबाच्या तारेला स्पर्श; कंत्राटदारासह 8 मजुरांचा विजेचा धक्क्याने अंत, 5 जण जखमी
रस्त्याचे काम सुरु असतानाच मशीनचा उच्च दाबाच्या तारेला स्पर्श; कंत्राटदारासह 8 मजुरांचा विजेचा धक्क्याने अंत, 5 जण जखमी
दिवाळीपूर्वी पर्यटकांना गुडन्यूज, रायगडवरील रोप-वे पुन्हा सुरू; देखभालीसाठी दीड महिन्यांपासून होता बंद
दिवाळीपूर्वी पर्यटकांना गुडन्यूज, रायगडवरील रोप-वे पुन्हा सुरू; देखभालीसाठी दीड महिन्यांपासून होता बंद
Sayaji Shinde On Tree Cutting: 'महाराष्ट्रात सध्या कोरोनासारख्या ‘झाडखाऊ’ व्हायरसची लागण', सयाजी शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल; कर्जतमधील प्रकल्पाविरोधात नागपुरात राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
'महाराष्ट्रात सध्या कोरोनासारख्या ‘झाडखाऊ’ व्हायरसची लागण', सयाजी शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल; कर्जतमधील प्रकल्पाविरोधात नागपुरात राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
कर्जतमधील टोरेंट प्रकल्प नको असेल, तर सरकारमधून बाहेर पडावे; सत्ताधारी आमदार थोरवेंचा सुनील तटकरेंना टोला
कर्जतमधील टोरेंट प्रकल्प नको असेल, तर सरकारमधून बाहेर पडावे; सत्ताधारी आमदार थोरवेंचा सुनील तटकरेंना टोला
न्यायालये बॉम्बने उडवून देऊ, ई-मेलवरुन धमकी; ठाणे, सांगली, परभणी, बीड, सोलापुरात न्यायालय परिसर केला रिकामा; पोलीस यंत्रणा अलर्ट
न्यायालये बॉम्बने उडवून देऊ, ई-मेलवरुन धमकी; ठाणे, सांगली, परभणी, बीड, सोलापुरात न्यायालय परिसर केला रिकामा; पोलीस यंत्रणा अलर्ट
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: पुणे, सातारा, रत्नागिरीमध्ये पावसाची हजेरी; राज्यात अचानक पाऊस पु्न्हा का कोसळतोय?; हवामान विभागाने सांगितले कारण
पुणे, सातारा, रत्नागिरीमध्ये पावसाची हजेरी; राज्यात अचानक पाऊस पु्न्हा का कोसळतोय?; हवामान विभागाने सांगितले कारण
Gokul Election: कोर्टाने गोकुळ चेअरमन निवडीसाठी थेट तारीख दिली; महायुतीला दणका, निवडणूक आयोगालाही निर्देश
कोर्टाने गोकुळ चेअरमन निवडीसाठी थेट तारीख दिली; महायुतीला दणका, निवडणूक आयोगालाही निर्देश
Donald Trump: इराण युद्धाचा नाद अंगलट आला, ट्रम्प आता युद्ध मंत्र्यांची उचलबांगडी करणार? मध्यावधी निवडणुकीतील पराभवाच्या भीतीनं पोटात गोळा!
इराण युद्धाचा नाद अंगलट आला, ट्रम्प आता युद्ध मंत्र्यांची उचलबांगडी करणार? मध्यावधी निवडणुकीतील पराभवाच्या भीतीनं पोटात गोळा!
Embed widget