एक्स्प्लोर

Twitter Security Breach : 200 दशलक्ष ट्विटर युजर्सचा डेटा चोरीला, ईमेल आयडी लीक झाल्याचा रिपोर्टमध्ये दावा

Twitter Safety : ब्रीच-नोटिफिकेशन साइट हॅव आय बीन प्वेन्डचे निर्माते ट्रॉय हंट यांच्या माहितीनुसार, 200 दशलक्ष ट्विटर युजर्सचा ईमेल आयडी चोरीला गेला आहे.

Twitter Safety Breach : ट्विटर (Twitter) युजर्ससाठी मोठी बातमी आहे. ट्विटर युजर्सचा डेटा चोरीला (Data Leak) गेल्याची माहिती समोर आली आहे. एका रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. सिक्योरिटी रिसर्चर रिपोर्टच्या दाव्यानुसार, 200 दशलक्षहून अधिक ट्विटर युजर्सचा ईमेल आयडी चोरीला गेला आहे. हॅकरने युजर्सचे ई-मेल आयडी चोरून ते एका ऑनलाइन फोरममध्ये पोस्ट केले आहेत. ब्रीच-नोटिफिकेशन साइट हॅव आय बीन प्वेन्डचे निर्माते ट्रॉय हंट यांच्या माहितीनुसार, 200 दशलक्ष ट्विटर युजर्सचा ईमेल आयडी चोरीला गेला आहे.

200 दशलक्ष ट्विटर युजर्सचा डेटा चोरीला

इस्त्रायली सायबर सिक्युरिटी-मॉनिटरिंग फर्म हडसन रॉकचे सह-संस्थापक एलोन गॅल यांनी लिंक्डइन पोस्ट करत म्हटले आहे की, 'फार मोठ्या प्रमाणात माहिती चोरीला गेली आहे. दुर्दैवाने या घटनेमुळे बरेच हॅकिंग, टार्गेट फिशिंग आणि डॉक्सिंग या घटनांमध्ये वाढ होईल.' गॅल यांनी 24 डिसेंबर रोजी सोशल मीडियावर ट्विटर युजर्सचा डेटा लीक झाल्याबद्दल पोस्ट करत माहिती दिली होती. गॅल यांनी त्यावेळी सांगितलं होते की, 'मोठ्या प्रमाणात ट्विटर युजर्सची माहिती चोरीला जात आहे. ट्विटरने या समस्येची चौकशी किंवा समस्या सोडवण्यासाठी काय कारवाई केली आहे, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.'

ट्विटरवरून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही

ट्विटरच्या सुरक्षेबाबत एका रिपोर्टमध्ये मोठा दावा करण्यात आला आहे. एका सुरक्षा फर्मच्या रिपोर्टनुसार, हॅकर्सनी 200 दशलक्षाहून अधिक ट्विटर युजर्सचे ईमेल आयडी चोरले आणि ते ऑनलाइन हॅकिंग फोरमवर पोस्ट केले आहेत. ट्विटर युजर्सची मोठ्या प्रमाणात माहिती चोरीला गेल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, ट्विटरकडून याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. दरम्यान याआधीही ट्विटरवरील डेटा चोरीला गेला होता. जानेवारी 2022 मध्ये सुमारे 54 लाख युजर्सचा डेटा चोरी झाल्याचं ट्विटर कंपनीनं सांगितलं होतं. 

दुसऱ्या एका तज्ज्ञाकडून दाव्यावर शिक्कामोर्तब

या प्रकरणात, हॅव आय बीन पॉन्ड या ब्रीच-नोटिफिकेशन साइटचे निर्माते ट्रॉय हंट यांनीही या रिपोर्टच्या दाव्यावर शिक्कामोर्तब केला आहे. ट्रॉय हंट यांनी म्हटलं आहे की, या रिपोर्टमधील दावा खरा आहे. त्यांनी लीक झालेला डेटा पाहिला आणि सांगितले की 'रिपोर्टमध्ये जे सांगण्यात आले ते खरं आहे. हॅकर्सने ऑनलाइन फोरमवर युजर्सच्या आयडीचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. दरम्यान, या स्क्रीन शॉट्समध्ये त्याची ओळख किंवा ठिकाण याचा उल्लेख नाही.' काहींच्या मते, हा डेटा 2021 च्या सुरुवातीच्या काळात चोरीला गेल्याचंही म्हटलं जात आहे. यावेळी एलॉन मस्क यांनी ट्विटर कंपनी विकत घेतली नव्हती.

महत्त्वाच्या इतर बातम्या

Twitter : ट्विटरच्या सुरक्षेला सुरंग! 54 लाख युजर्सचा डेटा लीक, अकाऊंट होल्डर्सला दिली माहिती

महत्त्वाच्या बातम्या

मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Mhada Pune Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
Raju Shetti : राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादी पक्षाच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादीच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
Embed widget