एक्स्प्लोर

माजी क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांना टीम इंडियाची मैदानावर अनोखी आदरांजली

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अखेरच्या वन-डे सामन्याला बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदाता सुरु आहे. पहिल्यांदा गोलंदाजीची संधी मिळालेल्या भारतीय संघ आपल्या हातावर काळी पट्टी लावत मैदानावर उतरला आहे.

बंगळुरु : ऑस्ट्रलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात टीम इंडिया मालिका विजयाच्या इराद्याने उतरली आहे. मात्र या सामन्यात टीम इंडियाने आणखी एक गोष्ट करुन सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पहिल्यांदा गोलंदाजीची संधी मिळालेल्या भारतीय संघाने आपल्या हातावर काळी पट्टी लावत मैदानावर पाऊल टाकलं. भारताचे माजी क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांचं शुक्रवारी निधन झालं. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी भारतीय संघाच्या खेळाडूंनी काळी पट्टी लावली आहे. बीसीसीआयने देखील आपल्या ट्विटर हॅंडलवरुन नाडकर्णी यांना श्रद्धांजली अर्पण केली होती. नाडकर्णी यांनी 1955 ला न्यूझीलंड विरूद्ध दिल्लीमध्ये कसोटीमध्ये पदार्पण केले. तर त्यांनी आपला शेवटचा कसोटी सामना ऑकलॅडमध्ये न्यूझीलंडविरूद्ध 1968 साली खेळला होता. नाडकर्णींच्या नावावर कसोटीमध्ये एका डावात सलग 21 षटकं निर्धाव टाकण्याचा विक्रम आहे. त्यांनी 1964 मध्ये इंग्लंड विरूद्ध मद्रास कसोटीमध्ये सलग 21 षटकं निर्धाव टाकली होती. भारताचे माजी कसोटीवीर रमेशचंद्र उर्फ बापू नाडकर्णी यांचं शुक्रवारी वृद्धापकाळानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. अचूक टप्पा आणि अचूक दिशा राखणारा डावखुरा फिरकी गोलंदाज अशी बापूंची एका जमान्यात ख्याती होती. नाडकर्णी यांनी कारकीर्दीतल्या 41 कसोटी सामन्यांत 1411 धावा आणि 88 विकेट्स अशी अष्टपैलू कामगिरी बजावली होती. 43 धावांमध्ये 6 विकेट्स ही त्यांची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी होती. बापूंनी प्रथम दर्जाच्या 191 सामन्यांमध्ये 8 हजार 880 धावा आणि 500 विकेट्स अशी दुहेरी कामगिरी बजावली होती. त्यांच्या निधनानंतर माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर, सुनिल गावस्कर यांनी बापूंना आदरांजली वाहिली होती. सलग 21 निर्धाव षटकं टाकण्याच रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. भारताचा कसोटीमधील सर्वात कंजूस गोलंदाज म्हणून त्यांना ओळखलं जातं. चेन्नईमधील एका सामन्यात त्यांनी 32 षटकांपैकी 27 षटकं निर्धाव टाकली होती. 32 षटकात त्यांनी अवघ्या 5 धावा दिल्या होत्या. पाकिस्तानविरुद्ध कानपूरमध्ये खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्याच्या एका डावात बापूंनी 34 षटकं गोलंदाजी केली होती. त्यापैकी 24 षटकं त्यांनी निर्धाव टाकली होती. त्यात त्यांनी अवघ्या 23 धावा दिल्या होत्या. त्याच मालिकेत दिल्लीत खेळवण्यात आलेल्या सामन्यात त्यांनी 34 षटकात 24 धावा देत एक बळी मिळवला होता. या डावातही त्यांनी तब्बल 24 षटकं निर्धाव टाकली होती. संबंधित बातम्या 
माजी क्रिकेटर बापू नाडकर्णींचं निधन, सचिन आणि गावस्करांकडून आदरांजली

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा ते बंगालपर्यंत; अवघ्या देशभरात विद्यार्थ्यांचा नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ रस्त्यावर आक्रोशाचा वणवा, वकील सुद्धा आंदोलनात
महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा ते बंगालपर्यंत; अवघ्या देशभरात विद्यार्थ्यांचा नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ रस्त्यावर आक्रोशाचा वणवा, वकील सुद्धा आंदोलनात
Rajkumar Rao on CJP Protest: 'तुम्ही दबावाची कल्पना करु शकत नाही'; राजकुमार रावने डिलिट केली कमेंट, 'मोदी हैं तो मुमकिन हैं' वर दिलं स्पष्टीकरण
'तुम्ही दबावाची कल्पना करु शकत नाही'; राजकुमार रावने डिलिट केली कमेंट, 'मोदी हैं तो मुमकिन हैं' वर दिलं स्पष्टीकरण
Neet Paper Leak: केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड
केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड
Maharashtra Live News Updates: सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे
Maharashtra Live News Updates: सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे

व्हिडीओ

Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा ते बंगालपर्यंत; अवघ्या देशभरात विद्यार्थ्यांचा नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ रस्त्यावर आक्रोशाचा वणवा, वकील सुद्धा आंदोलनात
महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा ते बंगालपर्यंत; अवघ्या देशभरात विद्यार्थ्यांचा नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ रस्त्यावर आक्रोशाचा वणवा, वकील सुद्धा आंदोलनात
Video: सरकार म्हणाले, पेलेट गनचा वापर केला नाही; राहुल गांधींनी तिरंगा हातात असताना गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय साहिलच्या टी शर्ट वर करून जखमा दाखवल्या, डोळा सुद्धा गेला, पोलिस भरतीचं होतं स्वप्न
Video: सरकार म्हणाले, पेलेट गनचा वापर केला नाही; राहुल गांधींनी तिरंगा हातात असताना गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय साहिलच्या टी शर्ट वर करून जखमा दाखवल्या, डोळा सुद्धा गेला, पोलिस भरतीचं होतं स्वप्न
Neet Paper Leak: केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड
केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड
EPFO : पीएफ खात्यात 2025-26 चं व्याज जमा, ईपीएफओकडून खातेदारांना मेसेज,पीएफ बॅलन्स कसा चेक करायचा?
पीएफ खात्यात 2025-26 चं व्याज जमा, ईपीएफओकडून खातेदारांना मेसेज,पीएफ बॅलन्स कसा चेक करायचा?
JP Nadda on CJP Meeting : 3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
नीट परीक्षेच्या दुसऱ्या निकालात मुलीला अवघे 200 गुण, वडिलांना ह्रदयविकाराचा झटका; लेकीचा सरकारला सवाल
नीट परीक्षेच्या दुसऱ्या निकालात मुलीला अवघे 200 गुण, वडिलांना ह्रदयविकाराचा झटका; लेकीचा सरकारला सवाल
Pune Crime News: पुण्यात पोलिस चौकीसमोरच गोळीबार; पूर्व वैमन्यासातून तरुणावर फायरिंग, अवघ्या २० मिनिटात आरोपीला घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
पुण्यात पोलिस चौकीसमोरच गोळीबार; पूर्व वैमन्यासातून तरुणावर फायरिंग, अवघ्या २० मिनिटात आरोपीला घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
RBI : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला आरबीआयकडून 13.30 लाखांचा दंड, RBI नं सहा बँकांना ठोठावला आर्थिक दंड
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला आरबीआयकडून 13.30 लाखांचा दंड, RBI नं सहा बँकांना ठोठावला आर्थिक दंड
Embed widget