एक्स्प्लोर

Takatak 2 : 'टकाटक'चा येणार सिक्वेल; मोशन पोस्टर रिलीज

Takatak 2 : 'टकाटक 2' या सिनेमाचं मोशन पोस्टर आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Takatak 2 : बॉक्स ऑफिसवर तूफान गर्दी खेचणाऱ्या 'टकाटक' (Takatak) या मराठी सिनेमाचा सिक्वेल असलेल्या 'टकाटक 2'ची (Takatak 2) रसिक खूप आतुरतेनं वाट पहात आहेत. 18 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'टकाटक 2'चं मोशन पोस्टर आता रिलीज करण्यात आलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांसोबत शेअर करण्यात आलेल्या 'टकाटक 2'च्या मोशन पोस्टरमध्ये कलाकारांची धमाल पहायला मिळत आहे.

लेखक-दिग्दर्शक मिलिंद कवडे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेलं अनोखं मोशन पोस्टर रसिकांसोबतच संपूर्ण मनोरंजन विश्वाचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरत आहे. रिलीज झाल्यानंतर अल्पावधीतच 'टकाटक 2'च्या मोशन पोस्टरनं लक्षवेधी लाईक्स मिळवले असून, प्रेक्षकांची पसंती मिळवत बाजी मारल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

रसिकांना अनुभवायला मिळणार फ्रेश कथानक

'टकाटक 2'च्या माध्यमातून रसिकांना पुन्हा एकदा एक फ्रेश कथानक अनुभवायला मिळणार आहे. 'टकाटक'च्या यशानंतर 'टकाटक 2' जणू इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'टकाटक 2'मध्येही प्रथमेश परब मुख्य भूमिकेत असल्यानं गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक आणि मराठी रसिकांच्या लाडक्या अभिनेत्याची केमिस्ट्री रसिकांना पुन्हा अनुभवायला मिळणार आहे.

मिलिंद कवडे यांनी नेहमीच आपल्या कलाकृतींद्वारे मनोरंजक कथानकाच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश समाजापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला आहे. हा सिनेमाही त्याला अपवाद नाही. अॅडल्ट कॅामेडी असूनही प्रेक्षकांनी जसा 'टकाटक'मधील सामाजिक संदेश समजून घेऊन चित्रपट डोक्यावर घेतला तसाच 'टकाटक 2' देखील घेतील असा विश्वास कवडे यांनी व्यक्त केला आहे. या सिनेमात काय पहायला मिळणार आहे याची झलक दाखवणारं मोशन पोस्टर धमाल-मस्तीसोबत आणखी बरंच काही सांगणारं आहे.

'टकाटक 2'मध्ये कोणते कलाकार असणार? 

'टकाटक 2'मध्ये प्रथमेशसह अक्षय केळकर, अजिंक्य राऊत, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे, सुशांत दिवेकर, स्वप्नील राजशेखर, किरण माने, पंकज विष्णू, किरण बेरड, आरजे महेश काळे, स्मिता डोंगरे आणि इतर कलाकारांच्याही भूमिका आहेत. 

संबंधित बातम्या

Takatak 2 : 'टकाटक 2' येतोय प्रेक्षकांच्या भेटीस; 19 ऑगस्टला होणार रिलीज

Takatak 2 Shooting | गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘टकाटक 2’ च्या शूटिंगला सुरूवात

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Chandrashekhar Bawankule: शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा! शेतीकामांसाठी गौण खनिजावरील 'रॉयल्टी' पूर्णपणे माफ, अर्ज कसा कराल, A टू Z माहिती
शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा! शेतीकामांसाठी गौण खनिजावरील 'रॉयल्टी' पूर्णपणे माफ, अर्ज कसा कराल, A टू Z माहिती
Nagpur Crime News :एकाच आठवड्यात दोन महिलांचा बळी; नागपूर जिल्ह्यातील कामठी पुन्हा हादरली! गादा-घोरपड रोडव महिलेचा संशयास्पद मृत्यू दुसऱ्या पतीवर संशय
एकाच आठवड्यात दोन महिलांचा बळी; नागपूर जिल्ह्यातील कामठी पुन्हा हादरली! गादा-घोरपड रोडव महिलेचा संशयास्पद मृत्यू दुसऱ्या पतीवर संशय
Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशींसाठी जुलैचा पहिलाच आठवडा नशीब पालटणारा; 6 पैकी 4 राशींना लागणार लॉटरी, साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशींसाठी जुलैचा पहिलाच आठवडा नशीब पालटणारा; 6 पैकी 4 राशींना लागणार लॉटरी, साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: पुणे जिल्ह्यात स्टंटबाजांचा धुमाकूळ! लोणावळ्यात धबधब्याच्या कड्यावर पर्यटकांचा थरार, तर पुण्यात अल्पवयीन मुलांची 'चौबल सीट' जीवघेणी स्वारी
पुणे जिल्ह्यात स्टंटबाजांचा धुमाकूळ! लोणावळ्यात धबधब्याच्या कड्यावर पर्यटकांचा थरार, तर पुण्यात अल्पवयीन मुलांची 'चौबल सीट' जीवघेणी स्वारी
Pune Rain Alert : पुण्यात रात्रभर पावसाची रिपरिप, जोर आणखी वाढणार; पुढील 3 दिवस रेड अलर्ट जारी, लोणावळ्यात तुफान पाऊस, पांघरली धुक्याची चादर
पुण्यात रात्रभर पावसाची रिपरिप, जोर आणखी वाढणार; पुढील 3 दिवस रेड अलर्ट जारी, लोणावळ्यात तुफान पाऊस, पांघरली धुक्याची चादर
Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case Pune: घराबाहेर पडताच सिया गोयलचे अश्लील हावभाव; मिडल फिंगर दाखवत काय काय केलं?, VIDEO
घराबाहेर पडताच सिया गोयलचे अश्लील हावभाव; मिडल फिंगर दाखवत काय काय केलं?, VIDEO
Mumbai Rain Updates: मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; तिन्ही मार्गावरच्या लोकल उशिराने, सखल भागात साचलं पाणी, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; तिन्ही मार्गावरच्या लोकल उशिराने, सखल भागात साचलं पाणी, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
Jubilant Ingrevia Ltd : रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Embed widget