एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
एसटी प्रवासभाड्यामध्ये सवलतीसाठी 'स्मार्टकार्ड' बंधनकारक
मासिक, त्रैमासिक पासधारकांना स्मार्टकार्ड 15 फेब्रुवारी 2020 पासून बंधनकारक करण्यात येत आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी 1 जून 2020 पासून स्मार्टकार्ड बंधनकारक करण्यात येत आहे.
![एसटी प्रवासभाड्यामध्ये सवलतीसाठी 'स्मार्टकार्ड' बंधनकारक St corporation of maharashtra smart card compulsory after एसटी प्रवासभाड्यामध्ये सवलतीसाठी 'स्मार्टकार्ड' बंधनकारक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/12/16173253/nashik-st-bus.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राज्य परिवहन (एस टी) महामंडळाच्यावतीने विविध सामाजिक घटकांना एसटी प्रवासभाडे सवलतीसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘स्मार्टकार्ड’ योजना बंधनकारक करण्यास 1 एप्रिल 2020 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. यासंदर्भात नागपूर अधिवेशनादरम्यान विविध लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिकांनी परिवहनमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.
राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने विविध घटकांसाठी 1 जून 2019 पासून स्मार्टकार्ड योजना सुरू करण्यात आली असून सद्यस्थितीत 30 लाख 97 हजार 726 जणांची नोंद झाली आहे. या योजनेसाठी ज्येष्ठ नागरिक, विविध पुरस्कारार्थी, विद्यार्थी तसेच व्याधीग्रस्त रुग्णांना 31 डिसेंबर 2019 पर्यंत स्मार्टकार्ड मिळविणे आवश्यक होते. नोंदणीला मिळालेला प्रतिसाद पाहता ही मुदत वाढून देण्याची मागणी लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिकांनी केली होती. त्यास परिवहन मंत्री देसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
हेही वाचा- मार्गात खोळंबलेल्या बसमधील प्रवाशांना मूळ तिकीटावर उच्च श्रेणीच्या बसमधून प्रवास करता येणार
ज्येष्ठ नागरिक, विविध पुरस्कारार्थी, अधिस्विकृतीधारक पत्रकार तसेच व्याधीग्रस्त रुग्ण यांना स्मार्टकार्ड 31 डिसेंबर 2019 पर्यंत प्राप्त करणे आवश्यक होते. परंतु आता ही मुदत 31 मार्च 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे. 1 एप्रिल 2020 पासून स्मार्टकार्ड बंधनकारक करण्यात येत आहे.
हेही वाचा - डिझेल अभावी रत्नागिरीत एसटीच्या 270 फेऱ्या रद्द; विद्यार्थी, नोकरदारांचे हाल
मासिक, त्रैमासिक पासधारकांना स्मार्टकार्ड 15 फेब्रुवारी 2020 पासून बंधनकारक करण्यात येत आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी 1 जून 2020 पासून स्मार्टकार्ड बंधनकारक करण्यात येत आहे.
दिव्यांगांसाठी अद्याप स्मार्टकार्ड योजना लागू करण्यात आली नाही. त्यामुळे दिव्यांगांसाठी सध्याचीच कार्यपद्धतीच लागू राहील. या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. सर्व घटकांनी विहित कालावधीत स्मार्टकार्ड प्राप्त करुन घ्यावे असे आवाहन एसटी प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
हेही वाचा- CM Uddhav Thackeray | एसटी कर्मचाऱ्याच्या लेकीचं मुख्यमंत्र्यांना पत्र, पगारवाढ, ओव्हरटाईम कमी करण्याची
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)