UPSC 2022 Results: सेवानिवृत्त एसटी वाहकाचा मुलगा झाला आयएएस; पहिल्यांदा अपयश पण आई वडिलांनी दिलेल्या बळाने यशाच्या शिखरावर
सेवानिवृत्त एसटी वाहकाचा मुलगा शशिकांत दत्तात्रय नरवडे याने आई वडिलांचे प्रोत्साहन व सारथीच्या स्काँलरशिपमुळे युपीएससी 2023मध्ये 493 व्या रँकने उतीर्ण होत आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.
UPSC 2022 Results: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC 2022 Results) परीक्षेत देशातील एकूण 933 उमेदवार यशस्वी झाले असून यापैकी राज्यातील 70 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास 12 टक्के महाराष्ट्रातून आहेत. राज्यातून कश्मिरा संख्ये प्रथम आली असून तिने देशात 25 वा क्रमांक पटकावला. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मसलाखुर्द येथील ऐका सेवानिवृत्त एसटी चालकाचा मुलगा शशिकांत दत्तात्रय नरवडे हा आई वडिलांचे प्रोत्साहन व सारथीच्या स्काँलरशिपमुळे युपीएससी 2023मध्ये 493व्या रँकने उतीर्ण होत आयएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. शशीकांत नरवडेच्या यशाने सर्वत्र अभिनंदन होत आहे.
मसलाखुर्द येथील दत्तात्रय नरवडे यांना अवघी अडीच एकर शेती आहे. ते एसटी वाहक पदावर काम करुन दोन वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. घरची परिस्थिती गरीब वडिलांचा तुटपुंजी पगार तरीही जिद्द न सोडता ते शिकत राहिले. त्याचे पहिली ते पाचवी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा, मसलाखुर्दमध्ये झाले. दहावीपर्यंत सरस्वती विद्यालय, लातूरमधून झाले. बारावीचे शिक्षण शाहु विद्यालय लातूर तर इंजिनियरींग शिक्षण वालचंद काॅलेज सांगलीमधून घेतले.
अपयशानंतरही आई वडिलांकडूनही लढण्याचे बळ
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शशिकांत स्पर्धा परिक्षा देत राहिला. एकदा तर केवळ तीन मार्कांमुळे स्पर्धा परिक्षेत अपयश आले होते. त्यानंतर नाराज होऊन गावी येवून शेतात राबू लागले. परंतु, आई वडिलांनी तू पास होईल शिकत, परीक्षा देत राहा असे पाठीवर हात टाकून लढण्याचे बळ दिले. पुढे शिक्षणासाठी प्रोत्साहित केले.
सारथीची स्काॅलरशिप मिळाली
घरच्यांनी दिलेल्या बळानंतर शशिकांत दिल्लीत पोहोचला. दिल्लीमध्ये गेल्यानंतर सारथीची स्काँलरशिप मिळाल्याने आई वडिलांवरील अर्थिक भार कमी झाला. नंतर अहोरात्र अभ्यास करुन मग स्पर्धा परिक्षा पास झाला आहे. आई गृहिणी आहे, तर वडिल सेवानिवृत्त एसटी वाहक आहेत घरची गरीबी तरीही दत्तात्रय नरवडे यांनी आपला एक मुलगा डॉक्टर तर दुसऱ्या मुलाला आयएएस अधिकारी केलं आहे.
माझ्या यशात आई वडिलांचा सिंहाचा वाटा
स्पर्धा परिक्षेत तीन मार्काने नापास झाल्याने घरचे पैसे खर्चाचे तरी किती म्हणून नोकरी शोधायाचे मनात आले. पण आई वडिलांनी स्पर्धा परिक्षा दे तू नक्की पास होशील असे सतत सांगत राहिले, प्रोत्साहित करत राहिले. त्यातच सारथीची स्काॅलरशिप मिळाल्याने काहीसा डोक्यावरचा अर्थिक भार कमी झाला. आई वडिलांचा शब्द वाया घालवयाचा नाही हे मनात पक्के ठेवून अभ्यास करुन यश मिळवले आणि अखेर आयएएस झालो. आई वडिलांचा पाठिंब्याने यश मिळवले आहे, अशी प्रांजळ प्रतिक्रिया शशिकांतने दिली.
इतर महत्वाच्या बातम्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI