Solapur : 312 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप, 8 वर्ष तुरुंगात ; जामिनावर बाहेर येताच रमेश कदमांचे जंगी स्वागत
मोहोळचे (Mohol) माजी आमदार रमेश कदम (Former MLA Ramesh Kadam) यांचे आज मोहोळमध्ये आगमन झाले. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
Solapur : मोहोळचे (Mohol) माजी आमदार रमेश कदम (Former MLA Ramesh Kadam) यांचे आज मोहोळमध्ये आगमन झाले. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतानंतर मोहोळमध्ये रॅलीला सुरुवात झाली आहे. रमेश कदम यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने समर्थक मोहोळमध्ये दाखल झाले आहेत. तुरुंगातून सुटल्यानंतर पहिल्यांदाच रमेश कदम मोहोळमध्ये येत आहेत.
राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांच्यावर अण्णाभाऊ साठे महामंडळ कथित घोटाळ्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. यानंर त्यांना अटक करण्यात आली होती. तब्बल आठ वर्षांनंतर 20 ऑगस्टला रमेश कदम यांची जामीनावर सुटका झाली होती. माजी आमदार रमेश कदम यांची ठाणे सेंट्रल जेलमधून सुटका करण्यात आली होती. त्यानंतर सुटका झाल्यानंतर आज प्रथमच रमेश कदम मोहोळमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी जंगी तयारी केली आहे. सध्या त्यांच्या रॅलीला सुरुवात झाली असून, मोठ्या संख्येनं कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले आहेत.
रमेश कदम यांच्यावर नेमके आरोप काय?
माजी आमदार रमेश कदम यांच्यावर अण्णा भाऊ साठे महामंडळामध्ये 312 कोटी रुपयांच्या घोटाळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. महामंडळाच्या अध्यक्षपदी असताना बोगस लाभार्थी दाखवून रमेश कदमांनी शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी रमेश कदम यांना आठ वर्षापूर्वी अटक केली होती. याच घोटाळ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना पक्षातून निलंबित केलं आहे. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळा घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम यांना ऑगस्ट, 2015 मध्ये अटक करण्यात आली होती.
रमेश कदम वेगवेगळ्या कारणाने चर्चेत
रमेश कदम हे वेगवेगळ्या कारणाने सतत चर्चेत राहिलेत. मागे एका व्हिडीओ क्लीपमध्ये रमेश कदम आर्थर रोड जेलमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ करत असल्याचं दिसलं होतं. त्यासंदर्भात रमेश कदम यांच्याविरोधात नागपाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. मात्र, 'पोलिसांनीच मला जातीवाचक शिवीगाळ केली आणि 25 हजारांची लाच मागितली होती असा आरोप रमेश कदम यांनी केला होता. तसेच भायखळा जेलमध्ये असताना वॉर्डन मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणातही प्रकरणातही रमेश कदम यांनी पोलिसांवर आरोप केले होते.
महत्त्वाच्या बातम्या: