(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Manoj Jarange : 'एक महिना नव्हे आता एक घंटा सुद्धा वाढवून देणार नाही, आता सरकारला वळवळ करू देणार नाही, मनोज जरांगे कडाडले!
Manoj Jarange Solapur : सरकारने आपल्याकडून वेळ घेतलाय, सावध राहा, आपण वेळ दिलेला नाही, आपण चार दिवसाचा वेळ दिला होता. पण आता ती वेळ संपली आहे.
सोलापूर : 'सरकारने आपल्याकडून वेळ घेतलाय, सावध राहा, आपण वेळ दिलेला नाही, आपण चार दिवसाचा वेळ दिला होता. पण आता ती वेळ संपली आहे. आता कुणालाही सुट्टी नाही. एक महिना मागितला, दिला, आपण वरून दहा दिवस दिले, पण आता एक घंटा सुद्धा वाढवून देणार नाही, आता सरकारला वळवळ सुद्धा करू देणार नाही', असा इशाराच मनोज जरांगे पाटील (Jarange Patil) यांनी यावेळी दिला.
सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमध्ये मनोज जरांगे पाटलांची (Manoj Jarange) भव्य सभा पार पडली. रणरणत्या उन्हात हजारो मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटलांच्या सभेसाठी हजेरी लावली होती. यावेळी मनोज जरांगे बोलत होते. 'मनोज जरांगे म्हणाले की, 'कुठली जात किंवा समूह ओबीसी आरक्षणात (OBC Reservation) समाविष्ट करायचा असल्यास त्यांना मागास सिद्ध करायला लागतं. गायकवाड कमिशन मराठ्यांना बारा-तेरा टाक्यात मागास सिद्ध केलंय, म्हणून चार दिवस कायदा पारित करायला एक दिवसात होतो तरीही चार दिवस दोन व्यवसायानुसार जाती निर्माण केल्या. त्यानुसार आरक्षण दिलं गेलं म्हणून चार दिले असून कायदा पारित करण्यासाठी एक दिवसात होतो, तरीही चार दिवस दिले आहेत. व्यवसायानुसार जातीनिर्माण केल्या. त्यानुसार आरक्षण (Maratha Aarakshan) दिलं गेलं. म्हणून चार दिवस दिले आहेत. त्यामुळे एका दिवसात तुम्हाला मराठ्यांना ओबीसी आरक्षणात घेता येत आहे. कारण आमचा एक भाऊ विदर्भातला आरक्षणाचे कुणबी प्रमाणपत्र घेऊन बसला आहे, म्हणून आम्हालाही कुणबी प्रमाणपत्र पाहिजे, असे ते म्हणाले.
कुणबी प्रमाणपत्र घ्यायला अडचण काय?
आपल्या पूर्वजानी आपल्याला शिकवलं, रात्रंदिवस काबाडकष्ट केले, आपल्याला सुशिक्षित केलं. ते आपले आजोबा शेतीला कुणबीक म्हणायचे. जेव्हा एखाद्या गावात लग्न जमविण्यासाठी बाहेर पडले, तेव्हा मुलीकडचे विचाराच्या तुमचा मुलगा काय करतो तर ते म्हणायचे आमचा मुलगा एकटा कुणबी करतो. त्यानंतर कुणबीला सुधारित आता शेती म्हटलं जात. पूर्वी पायताण म्हणायचे आता सुधारित शब्द म्हणून चप्पल आला, मग आपण चप्पल घालतं नाही का? पूर्वी हॉटेल म्हटलं जायचं, आता नवीन शब्द रेस्टॉरंट आला, मग चहा प्यायचा बंद करायचं का? पूर्वी घराला वाडा म्हणायचे, आता हाऊस म्हणतात, मग राहायचं सोडलं का? मग कुणबी प्रमाणपत्र (Kunbi) घ्यायला अडचण काय आहे. ज्यांना कुणबी प्रमाणपत्रांची गरज नाही, त्यांनी घेऊ नका, ज्याला घ्यायचं ते घेतील, गोरगरिबांच्या पोरांचं कल्याण होईल, त्यांच्या अंगणात माती कालविण्याचे काम करू नका, असा इशारा सुद्धा मनोज जरांगे यांनी दिला.
एक इंचही नियत ढळू दिली नाही....
मराठा समाजातील काही नेते विरोध करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेकजण माझ्याशी गद्दारी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी या समाजाचं लेकरु असून मराठा समाजासाठी एक इंचही नियत ढळू दिली नाही. यांनी फुट पाडण्याचा प्रयत्न केला, मात्र खुळखुळा वाजवणारा दिसतो, म्हणून त्यांनी हलक्यात घेतलं. पण आपण साधे नाही आहोत, असा इशारा मनोज जरांगे यांनी यावेळी दिला. ते पुढे म्हणाले की, आम्ही निकष पार केले तरी आरक्षण मिळालेलं नाही. मराठा ही देशभरात एकमेव मागास सिद्ध झालेली जात आहे. गायकवाड समितीने 12- 13 टक्के आरक्षण दिल जाऊ शकत, असं म्हटलं आहे. आणि एका दिवसांत कायदा करता येऊ शकतो. विदर्भात कुणबी प्रमाणपत्र मिळतय, म्हणून आपल्यालाही ते हवं आहे, असंही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.