एक्स्प्लोर

Solapur : विखे पाटलांवर भंडारा उधळणाऱ्या कार्यकर्त्यास मारहाण प्रकरण, भाजप शहराध्यक्षांनी मागितली माफी

मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर भंडारा उधळणाऱ्या कार्यकर्त्यास भाजपचे सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी मारहाण केली होती. या प्रकरणी काळे यांनी माफी मागितली आहे.

Solapur News : सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर धनगर आरक्षणाच्या (Dhangar Reservation) मुद्यावरुन शेखर बंगाळे (Shekhar Bangale) यांनी भंडारा टाकला होता. यावेळी आंदोलक शेखर बंगाळे यांना भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे (Narendra Kale) यांनी मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर धनगर समाजातर्फे संताप व्यक्त होऊ लागला. तर धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी या मारहाणी प्रकरणी माफी मागितली आहे.

नेमकं काय म्हणाले नरेंद्र काळे 

आंदोलक शेखर बंगाळे यांनी काहीही करणार नाही असे आश्वासन दिल्यानंतर मी स्वतः त्याला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याजवळ नेले होते. पण त्याने अचानकपणे खिशातून काय काढले हे लक्षात आले नाही. त्यावेळेस झटापटीत माझ्याकडून अनावधानाने कृत्य झाले. यामुळं समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो. पण कोणीही याचे भांडवल करु नये असे नरेंद्र काळे म्हणाले. मी धनगर चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे, अशी प्रतिक्रिया भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी दिली.

नेमकं प्रकरण काय?

सोलापुरात धनगर समाज आरक्षण कृती समितीने (Dhangar Reservation Action Committee) राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळला आहे. धनगर आरक्षणाचा प्रश्न कित्येक वर्ष प्रलंबीत असल्यानं धनगर आरक्षण कृती समितीच्या सदस्यांनी भंडारा उधळला आहे. सोलापूर (Solapur News) शासकीय विश्रामगृहात घटना घडली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दोन दिवसीय दौऱ्यासाठी सोलापुरात आले होते. काल त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस होता. ते शासकीय विश्रामगृहात थांबले होते. अशातच अनेक लोक त्यांच्या भेटीसाठी तिथे येत होते, आपले प्रश्न मांडत होते. ते लोकांची निवेदनं स्विकारत होते. अशातच धनगर आरक्षण कृती समितीच्या काही सदस्यांनी कित्येक वर्ष प्रलंबित असलेल्या धनगर आरक्षणासंदर्भातील निवेदन त्यांना देण्याची विनंती केली. हे निवेदन राधाकृष्ण विखे पाटील स्विकारत असताना कार्यकर्त्यांनी अचानक खिशातून भंडारा काढला आणि तो राधाकृष्ण विखे पाटलांच्या अंगावर उधळण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात विखे पाटलांच्या सुरक्षारक्षकांनी आणि उपस्थित पोलिसांनी धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांना अडवलं आणि बाहेर आणलं. कार्यकर्त्यांना थांबवले, काही प्रमाणात मारहाणही करण्यात आली होती.

महत्त्वाच्या बातम्या:

मराठा आरक्षणापाठोपाठ धनगर आरक्षणाची मागणी; आक्रमक झालेल्या कृती समितीनं विखे पाटलांवर भंडारा उधळला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime: झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
Uddhav Thackeray : मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
Ayushmann Khurrana T-20 World Cup :   टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाचे कौतुक, अभिनेता आयुष्यमान खुरानाने लिहिली भन्नाट कविता...
टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाचे कौतुक, अभिनेता आयुष्यमान खुरानाने लिहिली भन्नाट कविता...
Pune Wari Accident:  विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  1:00PM : 1 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPratap Sarnaik vs Jitendra Awhad : जिथे रेव्ह पार्ट्या सुरु आहेत तिथे कारवाई झालीच पाहिजेAnil Deshmukh on Samruddhi Accident : समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघात, अहवाल कधी येणार?Amarnath Yatra Jammu Kashmir : अमरनाथ यात्रेला सुरूवात; 28 हजारहून अधिक भाविकांनी घेतलं दर्शन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime: झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
Uddhav Thackeray : मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
Ayushmann Khurrana T-20 World Cup :   टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाचे कौतुक, अभिनेता आयुष्यमान खुरानाने लिहिली भन्नाट कविता...
टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाचे कौतुक, अभिनेता आयुष्यमान खुरानाने लिहिली भन्नाट कविता...
Pune Wari Accident:  विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
Rajeshwari Kharat Relationship :  ''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस
''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस
आनंदाच्या भरात लोक पाण्यात जातात आणि..., भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन
आनंदाच्या भरात लोक पाण्यात जातात आणि..., भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन
T20 World cup: विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाच्या 11 खेळाडुंचं अभिनंदन करण्याऐवजी BCCIचे खजिनदार आशिष शेलारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव; विरोधकांचा सभात्याग
टीम इंडियाच्या खेळाडुंचं अभिनंदन करण्याऐवजी सभागृहात आशिष शेलारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडल्याचा आरोप, विरोधकांचा सभात्याग
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतमोजणीत पुन्हा आढळल्या दोन जास्त मतपत्रिका; मतमोजणी केंद्रावर खळबळ
मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतमोजणीत पुन्हा आढळल्या दोन जास्त मतपत्रिका; मतमोजणी केंद्रावर खळबळ
Embed widget