एक्स्प्लोर

Ajit Pawar: राजन पाटलांची एकाधिकारशाही उलथवून टाकायला रणरागिणी मैदानात उतरवली, अनगरमध्ये कधी घडलं नाही ते घडलं, पण अजितदादांनी एका ओळीत विषय संपवला, म्हणाले...

Ajit Pawar: भाजपचे नेते माजी आमदार राजन पाटील यांनी ही किमया घडवून आणल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. अनगर नगरपरिषद निवडणूक प्रकरणी अजित पवार यांची एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.

सोलापूर : नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच सोलापुरातील अनगरमध्ये विजयी जल्लोष सुरू झाला. त्याच कारण म्हणजे अनगर नगरपालिकेमध्ये (Angar Nagar Panchayat) सर्व 17 जागा या बिनविरोध निवडून आल्या आहेत. राष्ट्रवादीतून नुकतेच भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेले माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल बिनविरोध निवडून आलं. मात्र नगराध्यक्षपदासाठी दोन अर्ज आल्याने निवडणूक होणार आहे. सोलापुरातील अनगर नगरपंचायतीच्या 17 सदस्यांच्या जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. 17 सदस्यांच्या जागासाठी केवळ 17 अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूकच बिनविरोध झाली आहे. भाजपचे नेते माजी आमदार राजन पाटील यांनी ही किमया घडवून आणल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. अनगर नगरपरिषद निवडणूक प्रकरणी अजित पवार यांची एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. 

Angar Nagar Panchayat Election :  बिनविरोध होणारी अनगर नगरपंचायत ही राज्यातील पहिलीच नगरपंचायत

सर्व प्रकरणाची माहिती घेऊन सविस्तर बोलतो अशी एका वाक्यातील प्रतिक्रिया अजित पवार यांनी माध्यमांना दिली आहे. अनगर नगरपरिषदेत सध्या सगळे भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, तर राष्ट्रवादीकडून आमच्या उमेदवाराना अर्ज भरू दिला नसल्याचा आरोप केला जात आहे. माजी आमदार राजन पाटील यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. त्या आधी ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये होते. तर सर्व 17 जागा या बिनविरोध होणारी अनगर नगरपंचायत ही राज्यातील पहिलीच नगरपंचायत ठरली आहे. दरम्यान या अनगर नगरपरिषद निवडणूक प्रकरणी अजित पवार यांची एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. 

Angar Nagar Panchayat Election : नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होणार

नगरसेवकपदाच्या सर्व जागा जरी बिनविरोध निवडून आल्या असल्या तरी नगराध्यक्षपदासाठी मात्र निवडणूक होणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी दोन अर्ज आले आहेत. नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील उभ्या आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उज्वला थिटे यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी या महायुतीतील दोन पक्षांमध्येच ही लढत रंगणार असल्याचं स्पष्ट आहे.

Rajan Patil Mohol : अनगरमध्ये राजन पाटलांचे वर्चस्व

गेल्या अनेक वर्षांपासून मोहोळ तालुक्यासोबत अनगर ग्रामपंचायतीमध्येही राजन पाटील यांच्या कुटुंबाचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. अनगर ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाल्यानंतर याठिकाणी पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. गेली अनेक वर्षे याठिकाणी राजन पाटील यांना आव्हान देणारा एकही चेहरा नव्हता. किंबहुना असा कोणताही उमेदवार उभाच राहणार नाही, अशी काळजी राजन पाटील यांनी घेतली होती. आताही सर्व नगरसेवक त्यांनी बिनविरोध निवडून आले.

Solapur Angar Nagarpanchayat Election : राजन पाटलांची दहशत, उज्ज्वला थिटेंचा आरोप

राजन पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर अजित पवार यांनी याठिकाणी उज्ज्वला थिटे यांच्या रुपाने नवा मोहरा रिंगणात उतरवला आहे. आपल्याला उमेदवारी अर्ज भरू दिला जात नव्हता. रस्त्यात ट्रॅक्टर आडवे लावले होते, गाड्या चेक करून कुटुंबावर हल्ला करण्याचा डाव होता, राजन पाटलांची इतकी दहशत आहे असा आरोप उज्ज्वला थिटे यांनी केला होता.

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar: अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
सुषमा अंधारेंकडून एकनाथ शिंदेंच्या भावावर 145 कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप; प्रकाश शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
सुषमा अंधारेंकडून एकनाथ शिंदेंच्या भावावर 145 कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप; प्रकाश शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
बीड अन् धाराशिव पोलिसांची सिनेस्टाईल 'रेड'; राना-वनातून घुसल्या गाड्या, चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या
बीड अन् धाराशिव पोलिसांची सिनेस्टाईल 'रेड'; राना-वनातून घुसल्या गाड्या, चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde Brother : साताऱ्यातील सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स सापडलं- अंधारे
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar: अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
सुषमा अंधारेंकडून एकनाथ शिंदेंच्या भावावर 145 कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप; प्रकाश शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
सुषमा अंधारेंकडून एकनाथ शिंदेंच्या भावावर 145 कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप; प्रकाश शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
बीड अन् धाराशिव पोलिसांची सिनेस्टाईल 'रेड'; राना-वनातून घुसल्या गाड्या, चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या
बीड अन् धाराशिव पोलिसांची सिनेस्टाईल 'रेड'; राना-वनातून घुसल्या गाड्या, चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या
Prithviraj Chavan: ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
शिंदेंच्या शिवसेनेची काँग्रेससोबत हातमिळवणी; फोटो शेअर करत दानवेंची टीका, शिंदेसेनेचाही पलटवार
शिंदेंच्या शिवसेनेची काँग्रेससोबत हातमिळवणी; फोटो शेअर करत दानवेंची टीका, शिंदेसेनेचाही पलटवार
Dhananjay Munde: आपदा में अवसर! इकडं माणिकराव संकटात अन् तिकडं शांतीत क्रांती करत धनुभाऊंची थेट दिल्लीत 'मन की बात'; योगायोग की नियोजित घरवापसी?
आपदा में अवसर! इकडं माणिकराव संकटात अन् तिकडं शांतीत क्रांती करत धनुभाऊंची थेट दिल्लीत 'मन की बात'; योगायोग की नियोजित घरवापसी?
Video: मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केला, पण राजकारण्यांना किक मारली, केवळ तीन सेलिब्रेटींना फ्रेममध्ये संधी दिली ते कोण?
Video: मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केला, पण राजकारण्यांना किक मारली, केवळ तीन सेलिब्रेटींना फ्रेममध्ये संधी दिली ते कोण?
Embed widget