एक्स्प्लोर

Solapur News: देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; अक्कलकोटमधील भीषण अपघातात 6 ठार

Solapur Accident News: क्रूझरमधील भाविक हे अणूर (ता.आळंद, जि.कलबुर्गी) येथून नवस फेडण्याकरिता कर्नाटकातील अफझलपूर येथील भागम्मा देवी येथे जावून नवस फेडण्यासाठी गेले होते

Solapur News:  गाणगापूर, अक्कलकोट येथून देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. शिरवळवाडी येथील अक्कलकोट ते वागदरी जाणार्‍या रस्त्यावर सिमेंटचे कंटेनर व क्रूझरचा भीषण अपघात झाला. या अपघात सहा जण ठार झाले असून तर 10 गंभीर जखमी झाल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे.

क्रूझरमधील भाविक हे अणूर (ता.आळंद, जि.कलबुर्गी) येथून नवस फेडण्याकरिता कर्नाटकातील अफझलपूर येथील भागम्मा देवी येथे जावून नवस फेडण्यासाठी गेले होते. त्यानंतर त्यांनी परतीच्या प्रवासात गाणगापूर, अक्कलकोट येथे देवदर्शन करुन वागदरी मार्गे पुन्हा अणूरकडे जात होते. त्याच दरम्यान, शिरवळवाडीच्या पुढे एक किलोमीटर अंतरावर पुलाशेजारील वळणावर कलबुर्गीहून सोलापूरकडे येणार्‍या कंटनेर क्र.एम.एच.12/युएम/7186 या गाडीने समोरुन येणार्‍या क्रूझर क्र.केए/35/ए/7495 गाडीला जोरदार धडक दिली. 

शुक्रवारी, सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. क्रूझरला बसलेल्या या भीषण धडकेमुळे चालकासह सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, 8 जण गंभीर जखमी झाले. तर, दोन जण किरकोळ जखमी झाले. जखमींना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचारसाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सर्व जखमी रुग्णांना सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे पुढील उपचाराकरिता पाठविण्यात आले आहे.

अक्कलकोट येथे झालेल्या अपघातात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. 

1) संगीता मदन माने (वय 35) रा.  बेडगे ता . उमरगा

2) सुंदराबाई भारतासिंग राजपूत (वय 55) रा अन्नुर ता.आळंद

3) ललीता  महादेव बग्गे (वय 50 रा  अन्नुर)

4) साईनाथ गोविंद पुजारी (वय  10 रा अन्नुर)

5) रोहिणी गोपाळ पुजारी (वय 40 रा अन्नुर ता.आळंद) असे पाच मयताची नांवे असुन

6) एका मयत महिलेची ओळख पटली नाही. 

अपघातातील यातील जखमींची नावे: 

सुनिल हणमंतराव पांचाळ (वय 50), 
सुमित पुजारी (वय 9), 
रेखा गोविंद पुजारी (वय 40), 
गोपाल चंद्रकांत पुजारी (वय 50), 
विठ्ठल हणमंत ननवरे (वय 35), 
अजित अशोक कुंदले (वय 30), 
भाग्येश अशोक कुंदले (वय 40), 
अशोक पुनदिले (वय 45), 
कोमल शामडे (वय 50), 
कल्पना अशोक कुंदले (वय 40) रा. सर्व अणूर (ता.आळंद, जि.कलबुर्गी) अशी जखमींची नावे आहेत. 

या अपघात प्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते. घटनास्थळी ग्रामीण पोलिस अधीक्षक, अक्कलकोट उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार, उत्तर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, तहसिलदार बाळासाहेब शिरसाठ यांनी भेट दिली. या अपघातात मृत झालेल्यांचे मृतदेह शवविच्छेनासाठी अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
विधानसभेची खडाजंगी: राखीव मोहोळ मतदारसंघात कुणाचं पारडं जड?; विधानसभेला कोण उधळणार गुलाल
विधानसभेची खडाजंगी: राखीव मोहोळ मतदारसंघात कुणाचं पारडं जड?; विधानसभेला कोण उधळणार गुलाल
Nana Patole : शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
Embed widget