एक्स्प्लोर

Ujani Dam: उजनीतून दोन दिवसापूर्वी सोडलेल्या पाण्याचा वेग मंदावलाय, सोलापूरपर्यंत पाणी पोहोचायला लागणार तब्बल 10 दिवस

गेल्या काही दिवसापासून  कोरडे पडलेले पात्र , पाण्यासाठी शेतकऱ्यांनी मशीनच्या साहाय्याने नदीत खोदलेले मोठा मोठे खड्डे भारत पाणी पुढे सरकताना साधारण तासाला अर्धा ते पाऊण किलोमीटर असा संथ गतीने प्रवास करत पुढे सरकत आहे .

 सोलापूर:  पंढरपूर , सांगोला , मंगळवेढा शहरांसाठी उजनीतून दोन दिवसापूर्वी सोडलेल्या पाण्याचा वेग मंदावला असून आज सकाळी 10 वाजता धरणापासून केवळ 35  किलोमीटर अंतरावर असणाऱ्या संगम येथे पोचायला पाण्याला 41 तासांचा वेळ लागला आहे . परवा दिवशी सायंकाळी पाच वाजता उजनी धरणातून पाच हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली होती .  सर्वसाधारणपणे धरणातून सोडलेले पाणी इतरवेल तासाला एक किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने प्रवास करत असते . मात्र गेल्या काही दिवसापासून  कोरडे पडलेले पात्र , पाण्यासाठी शेतकऱ्यांनी मशीनच्या साहाय्याने नदीत खोदलेले मोठा मोठे खड्डे भारत पाणी पुढे सरकताना साधारण तासाला अर्धा ते पाऊण किलोमीटर असा संथ गतीने प्रवास करत पुढे सरकत आहे .

भीमा नदीच्या दोन्ही तीरावरील वीज प्रवाह खंडित

उजनी धरणापासून 30 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नीरा नरसिंहपूर येथे 33 तासानंतर पाणी पोहचले असले तरी यापुढचा प्रवास मंदावत चालला आहे . नरसिंहपूरपासून संगमपर्यंतचे पाच किलोमीटर अंतर कापायला आठ तासांच वेळ लागला आहे . यापुढे सर्व शेतीचे क्षेत्र असल्याने नदीतून पाणी पुढे सरकायला अजून वेळ वाढत जाणार आहे . सध्या प्रशासनाने पिण्यासाठी सोडलेल्या या पाण्याचा उपसा करू नये म्हणून भीमा नदीच्या दोन्ही तीरावरील वीज प्रवाह खंडित केला आहे . उजनी धारण ते पंढरपूर हे अंतर 115 किलोमीटर असून येथे पाणी पोहचायला चार किंवा पाच दिवसांचा वेळ लागणार असून सोलापूरच्या औज बंधाऱ्यात पाणी पोहचायला तब्बल 10 दिवसांचा वेळ लागेल   . 

सध्या भीमा नदी कोरडी असल्याने उजनी धरणातून पिण्यासाठी सोडलेले पाणी पंढरपूरला पोचायला चार दिवस तर सोलापूरच्या औज बंधाऱ्यात पोचण्यास आठ दिवसाचा वेळ लागणार आहे . या दरम्यान पाण्याचा शेतीसाठी पाणी उपसा होऊ नये म्हणून भीमा नदीकाठच्या दोन्ही काठावरील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे पाणी वेळेत पंढरपूर आणि सोलापूरपर्यंत पोचण्यास मदत होणार आहे. पंढरपूर आणि सांगोला नगरपालिकेला पाणीपुरवठा करणारे बंधारे आहेत . याशिवाय सांगोल्यातील 81 गावांना पाणीपुरवठा करणारी योजना आणि कासेगाव पाणी पुरवठा योजनेचाही बंधारे आहेत . 

पंढरपूरवरून पाणी पुढे जाताना मंगळवेढा शहराला पाणीपुरवठा करणारा बंधारा असून यानंतर सोलापूर महापालिकेचा औज बंधारा आहे . हे पाणी सोलापूरला जाताना रस्त्यातील बंधारे भरून घेतले जाणार आहेत . यामुळे पुढील दोन महिने या शहरांची तहान मागण्यास मदत होणार आहे . सध्या उजनी धरणात 22.90 टक्के इतका पाणीसाठा असून धरणात 75 टीएमसी पाणी आहे . पिण्यासाठी पाणी सोडल्यानंतर धरणाची पातळी अजून खालावणार असून शेतीसाठी एक पाळी पाणी सोडण्यास मात्र शासनाने नकार दिला आहे .

हे ही वाचा :

Ujani Dam : पाऊस पुण्यात... आनंद सोलापुरात, उजनी धरणात पाणी वाढायला सुरूवात 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखलPlane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवानाPune Police on Sam David | सॅमचा बॉलिवूड ते आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा प्रवास, पोलिसांकडून पर्दाफाशManoj Jarange On Mumbai : मुंबई जाम होणार मराठा मागे येणार नाही, जरांगेंचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Embed widget