एक्स्प्लोर

Ashadhi Wari 2022 : यंदा विठुरायाला आषाढीला तुळशी वृंदावनातील 8 प्रकारच्या तुळशींचा हार

Ashadhi Wari 2022 : यंदा विठुरायाला आषाढीला तुळशी वृंदावनातील 8 प्रकारच्या तुळशींचा हार घातला जाणार आहे.

Ashadhi Wari 2022 : यंदा दोन वर्षानंतर होत असलेल्या आषाढी एकादशी (Ashadhi Wari) सोहळ्याला प्रथमच तुळशी वृंदावनामधील 8 प्रकारच्या तुळशीचा हार विठुरायाच्या गळ्यात घालण्यात येणार आहे. ही माहिती मंदिर समितीसह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. 

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून वनविभागानं 8 कोटी रुपये खर्च करुन वारकरी भाविकांसाठी अफलातून तुळशी वृंदावन साकारलं होतं. येथे वारकरी संतांच्या मूर्ती आणि त्याचा इतिहास रेखाटला आहे. देशात आढळणाऱ्या तुळशीच्या सर्व प्रकारची झाडं जोपासण्याचा प्रयत्न वन विभागानं केला आहे. पंढरपूरला येणाऱ्या भाविकांचं हे आकर्षणाचं केंद्र असून दरवर्षी हजारो भाविक येथे भेट देत असतात. 

बी बाग वन विभागानं मंदिर समितीला हस्तांतरित करावी, अशी मागणी समितीनं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्याकडे केली आहे. यावर आदित्य ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती. यावेळी आषाढी महापूजेसाठी आल्यावर पुन्हा एकदा ही मागणी केली जाणार असून आदित्य ठाकरे हे तुळशी वृंदावन लाखो भाविकांसाठी मंदिर समितीस देतील, असा विश्वास औसेकर यांनी व्यक्त केला आहे. 

आषाढी यात्रेपूर्वी विठ्ठल भक्तांच्या खिशाला कात्री, लाडू प्रसाद दीडपट महागला

आषाढी यात्रेपूर्वीच विठ्ठल भक्तांचे तोंड कडू करणारी बातमी आहे. नाही नाही म्हणत अखेर मंदिर समितीने नवीन टेंडरमध्ये विठुरायाच्या लाडू प्रसादात तब्बल दीडपटीने वाढ केल्याने गोरगरीब भाविकांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. गेल्या सहा महिन्यापासून मंदिर समितीच्या भोंगळ कारभारामुळे आधी भाविकांना लाडू प्रसाद मिळालेला नाही. यानंतर नवीन टेंडरनुसार लाडूचे दर जवळपास दीडपट वाढवल्याने याचा फटका सर्वसामान्य भाविकांना बसणार आहे. मंदिर समितीने लाडू बनवण्यासाठी ठेका देताच लाडूच्या किमतीत दीडपट वाढ झाल्याचं मंदिर समितीच्या सहअध्यक्षांनी सांगितल्याने भाविकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्जमुक्ती करुन सातबारा कोरा करा, शेतकरी लिहणार थेट राष्ट्रपतींना पत्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढाकार 
कर्जमुक्ती करुन सातबारा कोरा करा, शेतकरी लिहणार थेट राष्ट्रपतींना पत्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढाकार 
Jayant Patil on Ajit Pawar : श्रेयवादाच्या लढाईसाठी अजितदादांना व्हिडिओ करावा लागला असेल; जयंत पाटलांचा खोचक शब्दात टोला
श्रेयवादाच्या लढाईसाठी अजितदादांना व्हिडिओ करावा लागला असेल; जयंत पाटलांचा खोचक शब्दात टोला
शासनाची जन्म-मृत्यू नोंदणी वेबसाईट 15 दिवसांपासून बंद; अर्जासाठी लागतायत 15 ते 20 दिवस, नागरिकांची तारांबळ
शासनाची जन्म-मृत्यू नोंदणी वेबसाईट 15 दिवसांपासून बंद; अर्जासाठी लागतायत 15 ते 20 दिवस, नागरिकांची तारांबळ
मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट; वसंत मोरेंच्या शिवसेना प्रवेशाची तारीख ठरली, विधानसभा लढवणार
मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट; वसंत मोरेंच्या शिवसेना प्रवेशाची तारीख ठरली, विधानसभा लढवणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines 1PM एबीपी माझा हेडलाईन्स 1 PM 04 July 2024 Marathi NewsPolice Constable Suspended : ललित पाटीलसोबत एक्सरेसाठी पोलिस गेलेच नसल्याचा ठपका, दोघेजण बडतर्फRohit Pawar on Dhananjay Munde : परळीत वाल्मिक कराडांची दहशत, धनुभाऊंचं काही चालत नाही...Ladaki Bahin Yojana Application : प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी महिलांच्या रांगा, सेतू कार्यालयात गर्दी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्जमुक्ती करुन सातबारा कोरा करा, शेतकरी लिहणार थेट राष्ट्रपतींना पत्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढाकार 
कर्जमुक्ती करुन सातबारा कोरा करा, शेतकरी लिहणार थेट राष्ट्रपतींना पत्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढाकार 
Jayant Patil on Ajit Pawar : श्रेयवादाच्या लढाईसाठी अजितदादांना व्हिडिओ करावा लागला असेल; जयंत पाटलांचा खोचक शब्दात टोला
श्रेयवादाच्या लढाईसाठी अजितदादांना व्हिडिओ करावा लागला असेल; जयंत पाटलांचा खोचक शब्दात टोला
शासनाची जन्म-मृत्यू नोंदणी वेबसाईट 15 दिवसांपासून बंद; अर्जासाठी लागतायत 15 ते 20 दिवस, नागरिकांची तारांबळ
शासनाची जन्म-मृत्यू नोंदणी वेबसाईट 15 दिवसांपासून बंद; अर्जासाठी लागतायत 15 ते 20 दिवस, नागरिकांची तारांबळ
मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट; वसंत मोरेंच्या शिवसेना प्रवेशाची तारीख ठरली, विधानसभा लढवणार
मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट; वसंत मोरेंच्या शिवसेना प्रवेशाची तारीख ठरली, विधानसभा लढवणार
मोठी बातमी: अंबादास दानवे उद्याच सभागृहात दिसणार, निलंबनाच्या कालावधीत दोन दिवसांची कपात
मोठी बातमी: अंबादास दानवे उद्याच सभागृहात दिसणार, निलंबनाच्या कालावधीत दोन दिवसांची कपात
MLA Sunil Shinde: मोठी बातमी : ठाकरेंच्या वरळीच्या आमदाराचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
मोठी बातमी : ठाकरेंच्या वरळीच्या आमदाराचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
Anant Amabni-Radhika Merchant Wedding : अनंत-राधिकाच्या लग्नात परफॉर्म करणार जस्टीन बीबर, मानधनाचा आकडा किती?
अनंत-राधिकाच्या लग्नात परफॉर्म करणार जस्टीन बीबर, मानधनाचा आकडा किती?
काही काळजी नाही, बहिण विधानपरिषदेवर आली, भाऊपण येणार, महादेव जानकरांची नेमकी अपेक्षा काय?
काही काळजी नाही, बहिण विधानपरिषदेवर आली, भाऊपण येणार, महादेव जानकरांची नेमकी अपेक्षा काय?
Embed widget