Ashadhi Wari 2022 : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी अकलूज येथील डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या बलराज या अश्वाचे पालखी सोहळ्याकडे प्रस्थान झाले आहेत. बलराज हा अश्व तीन वर्षाचा असून तो राणा प्रताप यांच्या चेतक या अश्वांच्या ब्लड लाईन मधील घोडा आहे.
संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळयात रथाच्या पुढे धावण्याचा मान यंदा बलराजला मिळाला आहे.त्यासाठी अकलूज येथून बलराज या अश्वाचे प्रस्थान झाले. यावेळी पद्मजा देवी प्रतापसिंह मोहिते यांनी विधिवत पूजन करून अश्वाला निरोप दिला.
पंढरपूर येथे पुढील महिन्यात आषाढी यात्रा भरते. त्यासाठी राज्यभरातून संतांच्या पालख्या पंढरपूरकडे रवाना होत असतात. त्याच प्रमाणे देहू येथून उद्या तुकोबा रायांच्या पालखीचे पंढरपूसाठी प्रस्तान होणार आहे. याच पालखीसाठी आज डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या बलराज या अश्वाचे विधिवत पूजन करून अकलूज येथून प्रस्थान झाले. थोर योद्धे राणा प्रताप सिंह यांच्या चेतक या अश्वाचा बलराज असून अतिशय सुलक्षणी आणि देखणा बलराज रिंगणाची शोभा वाढवणार आहे.
आज अकलूज येथील प्रतापगड या मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी बलराजला सजवून आणण्यात आले. येथे श्रीमती पद्मजादेवी मोहिते पाटील यांनी बलराज याचे विधिवत पूजन केले. बलराज हा तीन वर्षांचा अश्व असून पालखी सोहळ्याची तयारी गेल्या एक वर्षांपासून त्याच्याकडून करून घेण्यात आली आहे. दरवर्षी पालखी सोहळ्या साठी दोन अश्वांची तयारी ठेवली जाते . त्यानुसार यंदा ही दोन अश्वांची तयारी केली असल्याचे पद्मजादेवी मोहिते पाटील यांनी सांगितले. बलराज हा यंदा पहिल्यांदाच पालखी सोहळ्यात सामील होत असून रिंगण सोहळ्यात जरी पटक्याचा मानाचा अश्व म्हणून धावणार आहे, अशी माहिती श्रीमती पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या