Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur university : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. 20 जून पासून होणाऱ्या सर्व परीक्षा विद्यापीठाने पुढे ढकलल्या असून या परीक्षा आता 14 जुलैपासून सुरू होणार आहेत.  परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांची याबाबतची माहिती दिली आहे.  


 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा येत्या 20 जून पासून होणार होत्या. परंतु, या परीक्षा विद्यापीठाने पुढे ढकलल्या असून विद्यापीठाने या परीक्षा आता 14 जुलैपासून घेण्याच निर्णय घेतला आहेत. याबरोबच 14 जुलैपासून होणारी परीक्षा आता सविस्तर उत्तर पद्धत ऐवजी बहुपर्यायी पद्धतीने होणार आहे. 


बहुपर्यायी पद्धतीने परीक्षा घेण्यात यावी या मागणीसाठी आज सकाळपासून  सोलापूर विद्यापीठात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने त्यांच्या  मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले असून मागण्या मान्य झाल्याचा निर्णय होताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लो केला. 


 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात या आधी देखील बदल करण्यात आला होता. पदवी आणि पदव्युत्तर विभागाच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा 20 जून 2022 पासून ऑफलाइन डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने होणार होत्या. परंतु, या परीक्षा आता 14 जुलैपासून होणार असल्याची माहिती परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ विभागाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी दिली.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात आज विद्यार्थी संघटनाने विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. परीक्षा संदर्भात वेगवेगळ्या मागण्या घेऊन प्रहार आणि अभाविपसह वेगवेगळ्या संघटनानी या आंदोलनात सहभाग घेतला होता. 20 जून पासून होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून करण्यात आली होती. तर दुसरीकडे MCQ पद्धतीने परीक्षा झाली पाहिजे अशी मागणी NSUI आणि प्रहार संघटनेकडून करण्यात आली होती.  विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाची दखल घेऊन विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI