एक्स्प्लोर

350 एकर परिसर, 30 हजार फ्लॅट्स, सोलापुरात उभारली देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत, PM मोदींच्या हस्ते होणार लोकार्पण

रे नगर येथे उभारलेली ही वसाहत एकूण 350 एकर परिसरात असेल. यामध्ये एकूण 834 इमारती आणि 30 हजार फ्लॅट्स असतील.

सोलापूर : कामगारांचे शहर अशी सोलापूरची ओळख आहे. आधी सूतगिरणीमध्ये काम करणारे आता वस्त्रोद्योग, विडी उद्योग, बांधकाम अशा विविध क्षेत्रात हजारो कामगार सोलापुरात काम करत असतात. गरिबी पाचवीला पूजलेली असताना या कामगारांना मोडक्या तोडक्या घरांमध्ये राहण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र संपूर्ण आयुष्य झोपडपट्टीत घालवणाऱ्या या कामगारांचे स्वतःच्या हक्काचं घर स्वप्न साकार होताना पाहायला मिळत आहे. देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत सोलापुरातल्या रे नगर येथे साकारत आहे. याच्या लोकार्पणासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः सोलापूरला येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतं आहे. 

रे नगर येथे उभारलेली ही वसाहत एकूण 350 एकर परिसरात असेल. यामध्ये एकूण 834 इमारती आणि 30 हजार फ्लॅट्स असतील. सोलापुरात उभारली जातेय देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत. सोलापुरातल्या कुंभारी गावात साकार होत असलेल्या या वसाहतीच्या पहिल्या टप्प्यातील 15 हजार घरांचे लोकार्पण लवकरच पार पडणार आहे. 9 जानेवारी 2019 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाचे उदघाटन केले. सलग 4 वर्ष जवळपास 10 हजार कामगारांनी मिळून हा भव्य प्रकल्प साकारला आहे. आयुष्यभर झोपडपट्टीत जगणाऱ्या कामगारांना देखील स्वतःचं हक्काच घर असावं, याच उद्दिष्टाने पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून ही घरे साकारली आहेत. इथे केवळ डोक्यावर छत नाही तर सोयी सुविधा देखील पुरवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. 

कशी असणार आहे रे नगर वसाहत?
 
एकूण 350 एकर परिसर

एकूण 834 इमारत 

प्रत्येक इमारतीत 36 फ्लॅट्स

एकूण 30 हजार कुटुंबासाठी घर

एकूण 60 मेगावॅट विजेचे प्रकल्प काम सुरु, 20 मेगावॅटचे काम पूर्ण 

परिसरात 7 मोठ्या पाणी टाकी, ज्याची क्षमता 29 mld आहे

यामुळे 24 तास पाणी पुरवठा शक्य

परिसरात मलशुद्धीकरण केंद्र

स्वतंत्र घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा

विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदतर्फे शाळा, अंगणवाडी सोय

खेळण्यासाठी क्रीडा मैदान

आरोग्यासाठी हॉस्पिटल

लोकांच्या रोजगारासाठी व्यवसाय देखील उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु 

अशा पद्धतीने व्यवस्था उभी करण्याचे प्रयत्न रे नगर मध्ये सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीसाठी हे ड्रीम प्रोजेक्ट असल्याने सर्वच यंत्रणा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे. येत्या काही दिवसात आपल्या घराच्या चाव्या मिळणार असल्याने कामगारांना देखील मोठा आनंद आहे. मागील दहा वर्ष केलेल्या नरसय्या आडम यांच्या प्रयत्नांना राज्य आणि केंद्र शासनाच्या मदतीमुळे मूर्त स्वरूप येताना दिसतं आहे. या प्रयत्नामुळे देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत सोलापुरात उभी राहत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अमोल मिटकरींना वडिलकीच्या नात्यानं सल्ला; दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन; भाजप नेत्याकडून मध्यस्थी
अमोल मिटकरींना वडिलकीच्या नात्यानं सल्ला; दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन; भाजप नेत्याकडून मध्यस्थी
Ashish Shelar Asha Bhosle : आशिष शेलारांनी 'ती' आठवण सांगताच आशाताईंच्या डोळ्यात अश्रू तरळले
आशिष शेलारांनी 'ती' आठवण सांगताच आशाताईंच्या डोळ्यात अश्रू तरळले
Pune Car Accident: अग्रवालांच्या लेकाने गाडीचा ब्रेक मारला तेव्हा पोर्शेचा स्पीड 110 किमी होता; फडणवीसांनी सांगितली पुणे अपघाताची इनसाईड स्टोरी
अग्रवालांच्या लेकाने गाडीचा ब्रेक मारला तेव्हा पोर्शेचा स्पीड 110 किमी होता; फडणवीसांनी सांगितली पुणे अपघाताची इनसाईड स्टोरी
Ambani Family Drinks Milk : अंबानी कुटुंबाकडून दररोज 'या' गायीच्या दूधाचे सेवन; एका लिटरची किंमत पाहता दुसरं किती लिटर दूध येईल?
अंबानी कुटुंबाकडून दररोज 'या' गायीच्या दूधाचे सेवन; एका लिटरची किंमत पाहता दुसरं किती लिटर दूध येईल?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik Hindu Sanghatna Protest : नाशिकमध्ये हिंदू संघटनांचं आंदोलनABP Majha Headlines :  2:00 PM : 28 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal - Majhi Wari : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारीMaharashtra Assembly Monsoon Session : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमोल मिटकरींना वडिलकीच्या नात्यानं सल्ला; दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन; भाजप नेत्याकडून मध्यस्थी
अमोल मिटकरींना वडिलकीच्या नात्यानं सल्ला; दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन; भाजप नेत्याकडून मध्यस्थी
Ashish Shelar Asha Bhosle : आशिष शेलारांनी 'ती' आठवण सांगताच आशाताईंच्या डोळ्यात अश्रू तरळले
आशिष शेलारांनी 'ती' आठवण सांगताच आशाताईंच्या डोळ्यात अश्रू तरळले
Pune Car Accident: अग्रवालांच्या लेकाने गाडीचा ब्रेक मारला तेव्हा पोर्शेचा स्पीड 110 किमी होता; फडणवीसांनी सांगितली पुणे अपघाताची इनसाईड स्टोरी
अग्रवालांच्या लेकाने गाडीचा ब्रेक मारला तेव्हा पोर्शेचा स्पीड 110 किमी होता; फडणवीसांनी सांगितली पुणे अपघाताची इनसाईड स्टोरी
Ambani Family Drinks Milk : अंबानी कुटुंबाकडून दररोज 'या' गायीच्या दूधाचे सेवन; एका लिटरची किंमत पाहता दुसरं किती लिटर दूध येईल?
अंबानी कुटुंबाकडून दररोज 'या' गायीच्या दूधाचे सेवन; एका लिटरची किंमत पाहता दुसरं किती लिटर दूध येईल?
Maharashtra Vidhan Parishad Election: मोठी बातमी : चित्रा वाघ, माधवी नाईक ते रावसाहेब दानवे, हर्षवर्धन पाटील, विधानपरिषदेसाठी भाजपची 10 नावांची यादी
मोठी बातमी : चित्रा वाघ, माधवी नाईक ते रावसाहेब दानवे, हर्षवर्धन पाटील, विधानपरिषदेसाठी भाजपची 10 नावांची यादी
Nashik Accident : नाशकात रुग्णवाहिकेची तीन वाहनांना धडक, रुग्णवाहिकेत दारूच्या बाटल्या आढळल्याने खळबळ
नाशकात रुग्णवाहिकेची तीन वाहनांना धडक, रुग्णवाहिकेत दारूच्या बाटल्या आढळल्याने खळबळ
पुणे पोर्शेप्रकरणात पोलिसांकडून 'या दोन चुका, गृहमंत्र्यांनी केलं मान्य; विधानसभेत फडणवीस-वडेट्टीवारांची जुंपली
पुणे पोर्शेप्रकरणात पोलिसांकडून 'या दोन चुका, गृहमंत्र्यांनी केलं मान्य; विधानसभेत फडणवीस-वडेट्टीवारांची जुंपली
चक्कर येऊन बेशुद्ध पडली अन् खाली कोसळली, नाशिकमध्ये मोबाईल टॉवरच्या लहरींमुळे शाळकरी मुलीचा जीव गेल्याचा आरोप
चक्कर येऊन बेशुद्ध पडली अन् खाली कोसळली, नाशिकमध्ये मोबाईल टॉवरच्या लहरींमुळे शाळकरी मुलीचा जीव गेल्याचा आरोप
Embed widget