एक्स्प्लोर

वय वर्ष अवघे 24, बिकट परिस्थितीवर मात करत आयेशा बनली न्यायाधीश

महाराष्ट्र राज्य लोकसेवा तर्फे घेण्यात येणाऱ्या या परीक्षेत जवळपास 190 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुंबई येथे प्रशिक्षण झाल्यानंतर जिल्हास्तरावर न्यायाधीश म्हणून सर्वांची नियुक्ती केली जाईल. आयेशाच्या या यशाने तिच्या नातेवाईकांसह गावात देखील आनंदाला उधाण आले आहे.

सोलापूर : चिकाटी, जिद्द आणि परिश्रमाची जोड असल्यास कोणत्याही परिस्थितीत सर्वकाही शक्य आहे असे म्हटले जाते. त्याचीच प्रचिती आज आली आहे. राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील असलेल्या तोळणूर या छोटाशा गावातील मुलीने घवघवीत यश संपादन केलं आहे. आयेशा पिरजादे असे या मुलीचे नाव आहे. आयेशा ही अवघ्या 24 वर्षाची आहे. इतक्या कमी वयात न्यायाधीश बनणारी ती जिल्ह्यातील पहिलीच मुलगी आहे. अक्कलकोट शहरापासून जवळपास 40 किलोमीटर अंतरावर तोळणूर हे गाव आहे. गावापासून कर्नाटक सीमा अगदी हाकेच्या अंतरावर असल्याने गावात भाषेची अडचण. गावात फक्त 10 पर्यंतचीच शिक्षणाची सोय. त्यामुळे उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर तालुक्याच्या ठिकाणी जावं लागायचं. मात्र जिद्द न सोडता आयेशाने सोलापुरातील दयानंद विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला. चार वर्ष विधीचं शिक्षण घेतल्यानंतर तिने पहिल्याच प्रयत्नात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ विभाग आणि न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा उत्तीर्ण केली आहे. राज्यभरातून जवळपास 15 हजार विद्यार्थी या परीक्षेसाठी बसलेले होते. मात्र अंतिम यादीत फक्त 190 विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. आयेशा पिरजादेचे वडील अजीजपाशा पिरजादे हे अल्प भू धारक शेतकरी आहेत. गावात असलेली शेती हेच अर्थाजनाचे साधन आहे. त्यांना पाच मुली. मात्र परिस्थिती नसतानाही त्यांनी आपल्या मुलींना शिक्षणापासून दूर जाऊ दिले नाही. पाचपैकी चार मुली ह्या उच्चशिक्षित झाल्या आहेत. त्यांची पाचवी मुलगी देखील शालेय शिक्षण घेत आहेत. सततच्या पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतीत ही उत्पन्न नाही. कुटुंबाची बिकट परिस्थिती असताना ही मुलींचं शिक्षण पूर्ण करण्याकडे त्यांनी कधीच दुर्लक्ष होऊ दिलं नाही. याच परिश्रमाच्या जोरावर त्यांनी आयेशाला देखील शिकवले. या कष्टाचं फलित आज झालं. या यशानंतर संपूर्ण परिवार आनंदात आहे. परिवारासह आयेशाला देखील आनंदाश्रू अनावर झाले. 'मुस्लीम परिवारांमध्ये सहसा मुलींना शिक्षणासाठी प्रेरीत केलं जात नाही. मात्र वडिलांनी नेहमी प्रेरणा देत शिक्षणात साथ दिल्यानेच हे यश प्राप्त झाले.', अशी प्रतिक्रिया आयेशाने एबीपी माझाशी बोलताना दिली. तर मुलींना दुय्यम स्थानी समजणाऱ्या लोकांसाठी हे यश दिशा देणारे आहे. पाच मुली असताना देखील त्यांच्यावर विश्वास ठेवल्याने त्यांनी हे यश आज दिसत आहे. फक्त कुटुंबातीलच नाही तर गावातील पहिली न्यायाधीश मुलगी झाल्याने अतिशय आनंदी असल्याचे मत आयेशा हिचे वडील अजीजपाशा पिरजादे यांनी व्यक्त केलं. दरम्यान महाराष्ट्र राज्य लोकसेवा तर्फे घेण्यात येणाऱ्या या परीक्षेत जवळपास 190 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुंबई येथे प्रशिक्षण झाल्यानंतर जिल्हास्तरावर न्यायाधीश म्हणून सर्वांची नियुक्ती केली जाईल. आयेशाच्या या यशाने तिच्या नातेवाईकांसह गावात देखील आनंदाला उधाण आले आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे माल वाहतूक करणाऱ्या चालकांना फटका
Maharashtra Live blog updates: पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे माल वाहतूक करणाऱ्या चालकांना फटका
Maharashtra Heat Stroke: विदर्भात भयंकर उष्णतेने टोक गाठलं, एकाचवेळी 500 वटवाघुळं मेली, हवामान खात्याचा रेड अलर्ट
Maharashtra Heat Stroke: विदर्भात भयंकर उष्णतेने टोक गाठलं, एकाचवेळी 500 वटवाघुळं मेली, हवामान खात्याचा रेड अलर्ट
Maharashtra Weather Update : निसर्गाचा प्रकोप! विदर्भात उन्हाचा कहर, ब्रह्मपुरी देशात सर्वाधिक हॉट; तर मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसाचा कहर, बळीराजा दुहेरी संकटात
निसर्गाचा प्रकोप! विदर्भात उन्हाचा कहर, ब्रह्मपुरी देशात सर्वाधिक हॉट; तर मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसाचा कहर, बळीराजा दुहेरी संकटात
Ban Public Gatherings In Pune: पुणेकरांनो सावधान! आजपासून जमावबंदी लागू, मोर्चे-सभांना बंदी; आदेशात नेमकं काय काय म्हटलंय?
पुणेकरांनो सावधान! आजपासून जमावबंदी लागू, मोर्चे-सभांना बंदी; आदेशात नेमकं काय काय म्हटलंय?

व्हिडीओ

Petrol Diesel Shortage : दरवाढीने धास्ती, टंचाईची भीती; दरवाढीचा चौकार, जनता बेजार Special Report
Onion Farmer Crises : गाळला घाम, मिळेना दाम; कांदा उत्पादक रडकुंडीला Special Report
Alandi Mandir Vastav 283 : पैशाचं 'ते' पोतं, माऊलींच्या गाभाऱ्यातील चोरीची कहाणी
Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Heat Stroke: विदर्भात भयंकर उष्णतेने टोक गाठलं, एकाचवेळी 500 वटवाघुळं मेली, हवामान खात्याचा रेड अलर्ट
Maharashtra Heat Stroke: विदर्भात भयंकर उष्णतेने टोक गाठलं, एकाचवेळी 500 वटवाघुळं मेली, हवामान खात्याचा रेड अलर्ट
IPL 2026 RCB vs GT :  बंगळुरु विरुद्ध गुजरात, मॅच कोण जिंकणार? गुजरात आणि बंगळुरुचे 5 खेळाडू ठरवणार निकाल
बंगळुरु विरुद्ध गुजरात, मॅच कोण जिंकणार? गुजरात आणि बंगळुरुचे 5 खेळाडू ठरवणार निकाल
Maharashtra Live blog updates: पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे माल वाहतूक करणाऱ्या चालकांना फटका
Maharashtra Live blog updates: पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे माल वाहतूक करणाऱ्या चालकांना फटका
Tamil Nadu AIDMK : अण्णाद्रमुकला मोठा धक्का, तीन बंडखोर आमदारांचे राजीनामे, TVK मध्ये प्रवेश करण्याची शक्यता
अण्णाद्रमुकला मोठा धक्का, तीन बंडखोर आमदारांचे राजीनामे, TVK मध्ये प्रवेश करण्याची शक्यता
IPL 2026 : ना विराट, ना रजत पाटीदार आरसीबीचा 'हा' हुकमी एक्का नाही चालला तर बंगळुरुवर मोठं संकट? आकडेवारी काय सांगते?
ना विराट, ना रजत पाटीदार आरसीबीचा 'हा' हुकमी एक्का नाही चालला तर बंगळुरुवर मोठं संकट?
Padma Award: महाराष्ट्रातील 8 मान्यवरांचा दिल्लीत सन्मान; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्याहस्ते पद्म पुरस्कार, हेमा मालिनींच्या हाती धर्मेंद्र यांचा अवॉर्ड
महाराष्ट्रातील 8 मान्यवरांचा दिल्लीत सन्मान; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्याहस्ते पद्म पुरस्कार, हेमा मालिनींच्या हाती धर्मेंद्र यांचा अवॉर्ड
2 लाख ठरले, पण 45 हजारांची लाच घेताना अटक; ग्रामपंचायतमधील महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
2 लाख ठरले, पण 45 हजारांची लाच घेताना अटक; ग्रामपंचायतमधील महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
RCB vs GT Qualifier 1: पावसामुळं क्वालिफायर-1 रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण? बंगळुरु की गुजरात, जाणून घ्या IPL चा नियम 
पावसामुळं क्वालिफायर-1 रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण? बंगळुरु की गुजरात, राखीव दिवस आहे का?
Embed widget