आणखी एक बोट बुडाली! सिंधुदुर्गात बर्फ घेऊन जाणारी बोट पलटली, दोन जणांचा मृत्यू तर दोन जण बेपत्ता
Sindhudurga Boat Accident : बोट पलटी झाल्यानंतर तीन जणांनी पोहून किनारा गाठला. तर चार जण बेपत्ता होते, त्यातील दोघांचे मृतदेह सापडले असून दोघे जण अद्याप बेपत्ता आहेत, शोध मोहीम सुरु आहे.
Sindhudurga Boat: राज्यात गेल्या तीन दिवसांत वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडून 18 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता आणखी एक बोट पलटल्याची घटना समोर येत आहे. सिंधुदुर्गातील वेंगुर्ले बंदरात (Sindhudurga Boat Accident) जाणरी एक बोट पलटल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण बेपत्ता आहेत. बेपत्तांचा शोध सुरू आहे.
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार , वेंगुर्ले बंदरात रात्री मच्छिमार बोटींना लागणार बर्फ घेऊन बोट घऊन जात असताना बोट उलटली. या बोटीमध्ये एकूण सात खलाशी होते. बोट पलटी झाल्यानंतर तीन जणांनी पोहून किनारा गाठला. तर चार जण बेपत्ता होते, त्यातील दोघांचे मृतदेह सापडले असून दोघे जण अद्याप बेपत्ता आहेत, शोध मोहीम सुरु आहे.
बोट भरकटल्याने घडला हा प्रकार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला बंदरातून रात्री मच्छिमारांना लागणारा बर्फाची वाहतूक सुरू असताना ही दुर्घटना घडला. रात्री ढगांचा गडगडाट जोरदार वादळी वारे अशी परिस्थिती असल्यामुळे ही बोट भरकटल्याने हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. बेपत्ता असलेल्या खलाशांपैकी एक खलाशी रत्नागिरीतील तर तीन खलाशी मध्यप्रदेशातील असल्याचे समजते. अन्य होड्यांमधून त्या खलाशांना वाचविण्यासाठी शोध कार्य सुरू झाले.
राज्यात गेल्या तीन दिवसांत वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडून 18 जणांचा मृत्यू
राज्यात गेल्या तीन दिवसांत वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडून 18 जणांचा मृत्यू झालाय. मंगळवारी 21 तारखेला नाशिकच्या इगतपुरीमधील भावली धरणात बुडून पाच जणांचा मृत्यू झाला. तर इंदापूरच्या उजनी धरणात प्रवासी वाहतूक करणारी बोट बुडून सहा जण दगावलेत. गुरूवारी अहमदनगरच्या अकोलेतील प्रवरा नदीत SDRF पथकाची बोट उलटून तिघांचा मृत्यू झाला. पुण्याच्या शिरुर तालुक्यातील पाबळमध्ये शेततळ्यात पोहायला गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झालाय. तर नाशिकच्या सिन्नर तालुक्यातही दोन चुलत भावांचा बुडून मृत्यू झाला. गेली दोन दिवस हे नातेवाईक आपला माणूस पाण्यातून सहिसलामत बाहेर येईल या आशेवर होते. मात्र मृतदेह पाण्यावर तरंगले आणि मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला.
हे ही वाचा :
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके