Sindhudurg News: ओसरगाव टोलनाक्यावरून पुन्हा वाद? आजपासून सुरू होणार, सिंधुदुर्गातील वाहनांना टोलमाफी मिळालीच पाहिजे, सर्वपक्षीयांची भूमिका
Sindhudurg News: कणकवली जवळचा ओसरगाव टोलनाका आजपासून सुरू, सिंधुदुर्गातील वाहनांना टोलमाफी मिळालीच पाहिजे, सर्वपक्षीयांची भूमिका
![Sindhudurg News: ओसरगाव टोलनाक्यावरून पुन्हा वाद? आजपासून सुरू होणार, सिंधुदुर्गातील वाहनांना टोलमाफी मिळालीच पाहिजे, सर्वपक्षीयांची भूमिका Sindhudurg News Osargaon toll Plaza near Kankavali starts from today vehicles in Sindhudurga must get toll exemption stand of all parties Sindhudurg News: ओसरगाव टोलनाक्यावरून पुन्हा वाद? आजपासून सुरू होणार, सिंधुदुर्गातील वाहनांना टोलमाफी मिळालीच पाहिजे, सर्वपक्षीयांची भूमिका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/14/458efae3b1809979788ca2f0a0fe9bc7168671095189488_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sindhudurg News: तळकोकणातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai-Goa National Highway) ओसरगावमधील टोल नाका (Osargaon Toll Plaza) आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (Sindhudurg District) सर्व वाहनधारकांना टोल माफी मिळाल्याखेरीज ओसरगाव टोल नाका सुरू होऊ देणार नाही, असा इशारा सर्वपक्षीय त्यांनी दिला आहे. महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) वतीनं सकाळी 10 वाजता टोलनाक्यावर आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकवटणार आहेत. त्यामुळे आज ओसरगाव (Osargaon News) टोलनाक्यावर तणावाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जानवली (Janavali) ते पत्रादेवी (Patradevi) या 60 किमी लांबीच्या मार्गासाठी टोल वसूल (Toll Collection) केला जाणार आहे. आता, सिंधुदुर्गवासियांसाठी संपूर्ण टोल माफी करण्याच्या मागणीवर टोलविरोधी कृती समिती आक्रमक असताना दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं टोल वसुली करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे मंगळवारी ओसरगावमध्ये तणावाची स्थिती असण्याची शक्यता आहे. ओसरगाव टोल नाका येथील वसुलीचे कंत्राट कोरल असोसिएट या राजस्थानमधील कंपनीला देण्यात आलं आहे. आतापर्यंत तीन वेळा टोल नाका सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र आता टोल सुरू होईल की स्थानिक आक्रमक पवित्रा घेतील? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पाहा व्हिडीओ : Sindhudurg Toll Plaza : सिंधुदुर्ग पासिंग वाहनांना टोल माफीतून सूट देण्याची मागणी, ओसरगाव टोलनाक्यावरुन वाद?
ओसरगाव टोल नाक्यावर 14 जूनपासून टोल वसुली सुरू केली जाणार आहे. यात सिंधुदुर्ग पासिंगच्या नोंदणीकृत व्यावसायिक वाहनांसाठी शुल्कात 50 टक्के सवलत असणार आहे. तर खासगी अव्यावसायिक वाहनांना महिन्यासाठी 330 रुपयांचा पास असणार आहे. टोलनाका सुरू होत असल्याची अधिसूचना महामार्ग प्राधिकरणातर्फे काल (13 जून 2023) प्रसिद्ध करण्यात आली.
आजपासून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कणकवली ओसरगाव येथे टोल नाका सुरू होत आहे. या आधी तिनदा टोलनाका सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याला सर्व पक्षांचा विरोध होता. आज देखील शिवसेना ठाकरे गट विरोधासाठी टोलनाकाच्या ठिकाणी आंदोलन करण्याच्या तयारीत असून इतर सर्व पक्षांचा टोलला विरोध आहे. भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टोलला याआधीच समर्थन दिलं आहे.
असे असणार आहेत टोल वसुलीचे नवे दर
- मोटार, जीप, व्हॅन आणि इतर हलकी वाहने 95 रुपये
- मिनी बस आणि हलकी व्यावसायिक वाहने 155 रुपये
- ट्रक आणि बस (2 अँक्सल) 320 रुपये
- व्यावसायिक वाहने 3 अँक्सलसाठी 350 रुपये
- मल्टी अँक्सल 4 ते 6 अँक्सल वाहनांसाठी 505 रुपये
- सात किंवा त्याहून जास्त अँक्सल वाहनांसाठी 615 रुपये
- अवाणिज्य प्रकारच्या वाहनांसाठी 330 रुपये मासिक पास शुल्क
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Landslide : कोकणातील 1050 गावांना दरडीचा धोका; केंद्र व राज्यशासनाचा 10 हजार कोटींचा आराखडा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)