एक्स्प्लोर

कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख ठरली! 2 मार्चला उसळणार भक्तांचा महासागर

देवीचा कौल घेऊनच यात्रेचा दिवस ठरविण्यात येतो. यावेळी सुमारे दहा लाखांपेक्षा जास्त भाविक यात्रेस उपस्थिती दर्शवतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

सिंधुदुर्ग :  कोकणातील (Konkan)  प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणाऱ्या आंगणेवाडीच्या (AanganeWadi)  भराडी देवीची (Bharadi Devi)  यात्रा येत्या 2 मार्च ला होत आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देश-परदेशात कोकणातील ज्या एका जत्रेचं आकर्षण आहे ती म्हणजे आंगणेवाडीची जत्रा. दरवर्षी लाखो भाविकांच्या गर्दीमध्ये मोठ्या उत्साहात भराडी देवीची जत्रा रंगते. मालवण मधील मसुरे गावातील आंगणेवाडीतल्या भराडी देवीच्या यात्रेला मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होत असतात. त्यासोबतच विविध पक्षाचे राजकीय नेते या यात्रेत सहभागी होतात.

नवसाला पावणारी भराडी देवी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे एक गाव आहे. या गावात आंगणेवाडी नावाची वाडी असून या वाडीत 'भराडी देवी' विराजमान आहे. भरडावर देवी प्रकट झाली म्हणून या देवीचं नाव 'भराडी देवी' असं ठेवण्यात आलं आहे. भराड म्हणजे माळरान. या देवीच्या आजूबाजूचा परिसर हा माळरान आहे म्हणूनच या देवीला भराडी देवी असं नाव पडलं.

दरवर्षी सुमारे पाच ते सात लाख भाविक भराडी देवीच्या दर्शनासाठी

मसुरे गावच्या या आंगणेवाडीच्या या वाडीत केवळ आंगणे कुटुंबीयांची ही देवी आहे. तसा फलक आंगणे कुटुंबीयांचं खाजगी मंदिर म्हणून फलक लावला आहे. मात्र नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असल्याने देवीचं सर्वांसाठी दर्शन खुले असते. भाविकांच्या गर्दी आणि श्रद्धेसाठी ते इतर सर्व भाविकांना खुले असते. गाऱ्हाणं आणि नवस बोलून अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी भराडीदेवीचं दर्शन घेतात. दरवर्षी सुमारे पाच ते सात लाख भाविक भराडी देवीच्या दर्शनासाठी केवळ दीड दिवसांच्या जत्रेमध्ये सहभागी होतात. आंगणेवाडीच्या भराडी देवीचा नैवेद्य खास असतो. आंगणे कुटुंबियांच्या माहेरवाशिणी तो अबोल राहून करतात. या जत्रेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक भाविकाला त्याचा लाभ घेता येतो.

देवीचा कौल घेऊनच यात्रेचा दिवस ठरविण्यात येतो

सकाळी देवीचा हुकूम घेऊन सदर तारीख निश्चित करण्यात आली. आंगणेवाडी जत्रा कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते. देवीचा कौल घेऊनच यात्रेचा दिवस ठरविण्यात येतो. यावेळी सुमारे दहा लाखांपेक्षा जास्त भाविक यात्रेस उपस्थिती दर्शवतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

26  ते 28  डिसेंबर असे तीन दिवस धार्मिक विधीसाठी बंद

आंगणेवाडी जत्रेची तारीख निश्चित झाल्यानंतर रेल्वे तसेच खाजगी वाहनांच्या बुकिंग साठी चढाओढ लागली आहे. राजकीय क्षेत्रातील सर्व पक्षिय नेते जत्रेस उपस्थिती दर्शवीत असल्याने ग्रामस्थ मंडळा बरोबरच शासनाची सुद्धा या यात्रेच्या नियोजनासाठी एक प्रकारची कसोटीच लागते. जत्रेची तारीख आता जाहीर झाल्याने पूर्व तयारीस लवकरच प्रारंभ होणार आहे. जत्रेच्या तारीख ठरविण्याचा कौल झाल्या नंतर श्री देवी भराडी मंदिर आज 26  ते 28  डिसेंबर असे तीन दिवस धार्मिक विधीसाठी बंद राहणार आहे. कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. भाविकांनी नोंद घेण्याचे आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार! एका बाजूला उन्हाचा पारा वाढला, तर दुसऱ्या बाजूला वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार! एका बाजूला उन्हाचा पारा वाढला, तर दुसऱ्या बाजूला वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस
Damini Palav Death News: एकतर्फी प्रेमातून दामिनी पालवला संपवलं; साहिल धुरीने नको नको ते केलं, कोकणात खळबळ, दुचाकी आणि मोबाईल जप्त
एकतर्फी प्रेमातून दामिनी पालवला संपवलं; साहिल धुरीने नको नको ते केलं, कोकणात खळबळ, दुचाकी आणि मोबाईल जप्त
Maharashtra Rain Update: कोकणासह राज्यात अवकाळी पावसाची हजेरी; हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह सतर्कतेचा इशारा, ‘यलो अलर्ट’ जारी
कोकणासह राज्यात अवकाळी पावसाची हजेरी; हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह सतर्कतेचा इशारा, ‘यलो अलर्ट’ जारी
सोशल मीडियातून ओळख, एकतर्फी प्रेम; माझं प्रेम स्वीकार कर म्हणत तरुणाने कॉलेजच्या युवतीला संपवलं
सोशल मीडियातून ओळख, एकतर्फी प्रेम; माझं प्रेम स्वीकार कर म्हणत तरुणाने कॉलेजच्या युवतीला संपवलं

व्हिडीओ

NCP Finance Ministry : अर्थखातं राष्ट्रवादी मिळणार? मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली?Special Report
Vivek Padit Majha Katta : आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे विवेक पंडित माझा कट्ट्यावर
Mann Suddha Tujha Season 3 : गवताची पेंढी | मन सुद्ध तुझं | Episode 4 | ABP Majha
Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha
KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aadhaar Email Update : आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी ॲपमधून मोफत अपडेट कसा करायचा? 'या' तारखेनंतर शुल्क द्यावं लागणार
आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी ॲपमधून मोफत अपडेट कसा करायचा? 'या' तारखेनंतर शुल्क द्यावं लागणार
Mumbai Indians : हार्दिक पांड्यानं साथ सोडल्यास मुंबई इंडियन्सचा पुढील कॅप्टन कोण? हिटमॅन रोहित शर्माच्या नावाला थेट RCB च्या कोचचा सपोर्ट  
हार्दिक पांड्यानं साथ सोडल्यास मुंबई इंडियन्सचा पुढील कॅप्टन कोण? हिटमॅन रोहित शर्माच्या नावाला कुणाकडून पसंती?
Gold Price :  ऑगस्ट महिन्यातील उच्चांकावरुन चांदी 56000 रुपयांनी स्वस्त, सोने दरात 23000 रुपयांची घसरण, सोने चांदीचे दर कशामुळं कोसळले?  
सोने चांदीचे दर कशामुळं कोसळले? ऑगस्टमधील उच्चांकाच्या तुलनेत सोनं 23 हजारांनी स्वस्त
Loan : जगातील अनेक देश कर्जात अडकले, अमेरिका, फ्रान्स ते भारतापर्यंत कोणत्या देशांवर किती कर्ज? सर्वाधिक कर्ज 'या' देशावर
जगातील बडे देश कर्जाच्या जाळ्यात अडकले, अमेरिका, फ्रान्स ते भारतापर्यंत कोणावर किती कर्ज?
Gold Silver Rate : चार दिवसांमध्ये चांदीचे दर गडगडले, चांदीचे दर 16000 रुपयांनी घसरले, सोन्याचे दर कोसळले
चार दिवसांमध्ये चांदीचे दर गडगडले, चांदीचे दर 16000 रुपयांनी घसरले, सोन्याचे दर कोसळले
अरुणाचल प्रदेशात NHPC कार्यालय, पोलीस ठाणे पेटवलं; भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदाराच्या घराची सुद्धा तोडफोड, अनेक पोलीस जखमी, सियांग प्रकल्पाला कडाडून विरोध
अरुणाचल प्रदेशात NHPC कार्यालय, पोलीस ठाणे पेटवलं; भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदाराच्या घराची सुद्धा तोडफोड, अनेक पोलीस जखमी, सियांग प्रकल्पाला कडाडून विरोध
Donald Trump: अमेरिका आज इराणवर हल्ला करणार? ट्रम्प म्हणाले, आम्हाला एका मोठ्या कराराची आशा, इराणने अण्वस्त्रे बनवू नयेत अशी आमची इच्छा
अमेरिका आज इराणवर हल्ला करणार? ट्रम्प म्हणाले, आम्हाला एका मोठ्या कराराची आशा, इराणने अण्वस्त्रे बनवू नयेत अशी आमची इच्छा
Accident News: न्यायाधीशांच्या अल्पवयीन मुलानं घरातून गाडी नेली; मध्यरात्रीच्या सुमारास दिली दुचाकीस्वाराला दिली धडक, एकाचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
न्यायाधीशांच्या अल्पवयीन मुलानं घरातून गाडी नेली; मध्यरात्रीच्या सुमारास दिली दुचाकीस्वाराला दिली धडक, एकाचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
Embed widget