Justice Uday Lalit : कोकणचे शिरपेचात मानाचा तुरा, न्या. उदय लळीत देशाचे 49 वे सरन्यायाधीश, 27 ऑगस्ट रोजी पदभार स्वीकारणार
देशाचे सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा (NV Ramana) हे 26 ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. त्यांची जागा आता न्यायमूर्ती उदय लळीत घेणार आहेत.
सिंधुदुर्ग: तळकोकणात देवगडमधील गिर्ये गावातील लळीत कुटूंबातील न्यायमूर्ती उदय लळीत (Justice Uday Lalit) यांची 27 ऑगस्ट रोजी देशाचे 49 वे सरन्यायाधीश या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या कुटुंबातील व्यक्ती वकिली पेशात गेली अनेक वर्षे आहेत. न्यायमूर्ती उदय लळीत यांना सरन्यायाधीश म्हणून तीन महिन्यापेक्षा कमी कालावधी मिळणार आहे. न्यायमूर्ती लळीत यांचे वडील अॅड. उमेश लळीत हेही मुंबई उच्च न्यायालयाने नामनिर्देशित केलेले ज्येष्ठ वकील होते. ते 1974 ते 76 या काळात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे माजी अतिरिक्त न्यायाधीश होते.
न्यायमूर्ती लळीत यांच्या कुटुंबाला 900 वर्षांचा ज्ञात इतिहास आहे. लळी कुटुंब हे सगळे मूळ रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यातील मावळगे गावातील मावळणकर सरदेसाई आहेत. मावळणकर सरदेसाई घराण्यातली एक शाखा ललित म्हणून लळीत उपनाम घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विजयदुर्ग जवळच्या गिर्ये गावांमध्ये स्थायिक झाले.
काय म्हणतंय लळीत कुटुंबीय?
आमच्या घरात चांगल्या प्रकारचे लळीत सादरीकरण करणारे गृहस्थ पूवी होते त्यामुळे आम्हाला लळीत हे नाव पडले असं त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आलं. लळीत म्हणून गिर्ये गावात स्थायिक झाले. पेशव्यांच्या दरबारात प्रत्यक्ष लळीत लोककला सादर केली. त्यावेळी दरबारात प्रत्यक्ष लळीत अवतरले असा उल्लेख आहे. तर न्यायमूर्ती उमेश लळीत यांचं जे घराणं आहे, त्यांचे पूर्वज आणि 200 वर्षांपूर्वी गिर्यातून रायगड जिल्ह्यातल्या आपट्या या गावांमध्ये गेले. पुढे उदरनिर्वाहासाठी तिथून ते कुटुंब सोलापूरला स्थायिक झाले. आता ते सध्या सोलापूरला स्थायिक आहेत. अतिशय हसतमुख व्यक्ती आहेत.
विशेष म्हणजे उदय लळीत मुंबईमध्ये ज्यावेळी उच्च न्यायालयामध्ये वकिली केली. त्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर त्यांनी अनेक हाय प्रोफाईल खटले चालवले. विशेषतः 2G स्कॅम हा जो मोठा घोटाळ्याचा खटला होता. त्या खटल्यामध्ये सीबीआयने विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केली होती. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे वकिलांच्या बारमधून थेट न्यायमूर्ती झालेले सर्वोच्च न्यायालयामध्ये झालेले ते दुसरी व्यक्ती आहेत. त्यापूर्वी त्यावेळेचे वकील एस एम सिक्री यांना थेट न्यायमूर्ती म्हणून नेमलं होतं. त्यानंतर आता तर ते देशाचे थेट सरन्यायाधीश होत आहेत.
न्यायमूर्ती लळीत यांच्या कुटुंबांमध्ये पीढीजात वकिली आहे. त्यांचे आजोबा रोयातून आपट्यातून नागपूरला वकिली करायला गेले. त्यांची चांगल्या प्रकारे वकिली केली. नंतर व्यायमूर्ती उमेश लळीत यांचे वडील सुद्धा मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकील करायचे. नंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती झाले. अशा प्रकारे आजोबा, वडील आणि स्वतःची अशी ही परंपरा त्यांच्या घराण्यामध्ये आहे.
न्यायमूर्ती यांचं सांगण्यासारखं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये तिहेरी तलाक चा जो कटला चालला. त्या खटल्यामच्या खंडपीठामध्ये त्यांचा समावेश होता. विशेषत: न्यायालयामध्ये जे वर्षांवर्ष प्रलंबित खटले असतात ते लवकरात लवकर कसे निपटारा होईल त्यासाठी विशेष प्रयत्न केले. याबाबत त्यांची मत अतिशय परखड आहेत. न्यायालयांचा वेळ सुद्धा सकाळी नऊ वाजता न्यायालय सुरू व्हावीत, जर शाळेतले विद्यार्थी सात वाजता जाऊ शकतात. शाळेमध्ये शिक्षक जाऊ शकतात तर वकील आणि न्यायमूर्ती नऊ वाजता का पोहोचू शकत नाहीत असा सवाल त्यांनी विचारला होता आणि त्याचा स्वागतही झालं होतं. अशाप्रकारे एक कर्तव त्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा महाराष्ट्राचा वारसा आहे. असे एक व्यक्तिमत्व देशाच्या सरन्यायाधीश पदी विराजमान होतायेत. 27 ऑगस्टला ते देशाच्या सरन्यायाधीश म्हणून विराजमान होतायेत त्यांचा कुटुंबीयांना त्यांचा अभिमान आहे.
व्यायमूर्ती उदय लळीत यांचा सरन्यायाधीश पदी अल्प कालावधी असणार आहे. जेमतेम त्यांना 72 दिवस या पदावर मिळतात त्यामुळे त्यांचा कालावधीत अल्प असेल अर्थात नियमनासाठी निवृत्त होत आहेत. सरन्यायाधीश म्हणून नियुक्त झाल्यानंतर यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निमंत्रित करण्याचा आमचा मानस आहे. आणि त्यांचा इथे एक जाहीर सत्कार करण्याचा मनोदय आहे.