Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं टोमणे बॉम्ब अस्त्र आता बोथट झालंय; दीपक केसरकरांचा हल्लाबोल
Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना वाऱ्यावर सोडल्यामुळेच आमच्यासोबत एवढी लोक बाहेर पडली.
Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) टोमणे बॉम्ब हे अस्त्र आता बोथट झाला आहे, अशी घणाघाती टीका दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) पर्यटन मंत्री असतांना देखील त्यांनी काहीही केलेलं नाही, फक्त टीका करणे हेच आदित्य ठाकरेंचं काम आहे. मुख्यमंत्र्यांसाठी कुठलेही विकासाचे काम हे चुटकी भर काम असते. मात्र, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना कोकणासाठी काही केलेलं नाही. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुरणपोळ्या खात नाहीत, तर लोकांच्या ताटात पुरणपोळ्या कशा जातील यासाठी प्रयत्न करतात असे केसरकर म्हणाले आहेत.
पुढे बोलतांना त्यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर निशाणा साधला. चंद्रकांत खैरे सत्तेत असतांना औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करू शकले नाहीत. सत्ता गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ठराव मांडला आणि आमच्या सरकारने तो ठराव मान्य करून मंजुरी देखील आणली. त्यामुळे इतर गोष्टींवर बोलण्यापेक्षा आमच्या सरकारचा अभिनंदन केलं पाहिजे, असे केसरकर म्हणाले.
भास्कर जाधवांचे आमच्या पक्षात स्वागतचं केले जाईल
भास्कर जाधव यांच्या नाराजीच्या चर्चेवर बोलतांना केसरकर म्हणाले की, "आमच्याकडे आल्यास शंभर टक्के त्यांचं स्वागत केलं जाईल. कारण ते एक लढवय्या नेते व उत्कृष्ट वक्ते आहेत. त्यांच्या येण्याने शिवसेनेची ताकद वाढेल. मात्र, त्यांची नाराजी कशाबद्दल आहे हे मात्र मला माहित नाही. परंतु, ते पक्षात आल्यास निश्चितच स्वागत होईल, असे केसरकर म्हणाले.
खोक्यासाठी बाहेर पडलो नाही....
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना वाऱ्यावर सोडल्यामुळेच आमच्यासोबत एवढी लोक बाहेर पडली. तर, ते खोक्यासाठी बाहेर पडले नाहीत हे आदित्य ठाकरे यांना कोणीतरी सांगा. कोणीतरी सांगतो शिकवतो म्हणून खोटं बोलून बदनामी करायची हे कुठेतरी थांबलं पाहिजे. नाहीतर त्यांची शंभर पट बदनामी होऊ शकते हे त्यांनी लक्षात ठेवावं. आम्हालाही संस्कार आहेत म्हणून आम्ही गप्पा आहोत, असे केसरकर म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं!
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. अशात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाच्या बैठकांना जोर आला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. अशात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. त्यामुळे पुढील काळात राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Nitesh Rane : उद्धव ठाकरे नपुंस### सरदार, नितेश राणेंची जीभ पुन्हा घसरली