IND vs AUS : टीम इंडियाला मोठा धक्का, श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त; ऑस्ट्रेलियाविरोधात खेळण्यावर प्रश्नचिन्ह
Shreyas Iyer : श्रेयस अय्यरची दुखापत गंभीर असल्यास तो ऑस्ट्रेलियाविरोधात 17 मार्चपासून होणाऱ्या वनडे मालिकेतून बाहेर जाऊ शकतो.
![IND vs AUS : टीम इंडियाला मोठा धक्का, श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त; ऑस्ट्रेलियाविरोधात खेळण्यावर प्रश्नचिन्ह Shreyas Iyer Injury Suffered Lower Back Pain BCCI Monitoring Condition Doubtful for ODI Series IND vs AUS IND vs AUS : टीम इंडियाला मोठा धक्का, श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त; ऑस्ट्रेलियाविरोधात खेळण्यावर प्रश्नचिन्ह](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/25/72964411a8e36b6851d650b0702ef9ca_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IND vs AUS ODI Series, Shreyas Iyer : अहमदाबाद कसोटी सामना रोमांचक स्थितीत पोहचला आहे. भारताने पहिल्या डावात आघाडी घेतली आहे. पण पाठदुखीमुळे श्रेयस अय्यर फलंदाजीसाठी उतरला नव्हता.. श्रेयस अय्यरची दुखापत गंभीर असल्यास तो ऑस्ट्रेलियाविरोधात 17 मार्चपासून होणाऱ्या वनडे मालिकेतून बाहेर जाऊ शकतो.
बीसीसीआयची मेडिकल टीम अय्यरच्या दुखापतीवर उपचार करत आहे. शुक्रवारी रात्री अय्यरने आपल्या पाठदुखीबाबत कळवले होते.. त्यानंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार सुरु झाले. पण रविवारी स्कॅन वैगरे करण्यात आले. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. एका संकेतस्थळाच्या माहितीनुसार, श्रेयस अय्यरचे स्कॅन रिपोर्ट चांगले आले नाहीत. तज्ज्ञांना स्कॅन रिपोर्ट्स दाखवण्यात येणार आहेत. त्यानंतर काही चाचण्या केल्या जाणार आहेत. त्यानंतर श्रेयस अय्यर वनडे मालिकेत खेळू शकतो की नाही...हे स्पष्ट होईल.
रिप्लेसमेंट मिळणार ?
बीसीसीआय निवड समितीचे सदस्य सध्या अहमदाबादमध्येच उपस्थित आहे. त्यांना श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत सांगण्यात आले आहे. अय्यरच्या रिप्लेसमेंटबाबत लवकरच निर्णय घेतला जाऊ सकतो. जर अय्यरची रिप्लेसमेंट जाहीर केली तर तो खेळाडू चौथ्या कसोटीनंतर टीम इंडियासोबत जोडला जाईल. सुत्रांच्या वृत्तानुसार, श्रेयस अय्यरची रिप्लेसमेंट मिळण्याची शक्यता कमीच आहे, कारण निवड समितीने ऑस्ट्रेलियाविरोधात आधीच 17 जणांच्या चमूची निवड केली आहे.
Shreyas Iyer's scans report are not encouraging, he'll have to visit a specialist. (Reported by Cricbuzz).
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 12, 2023
Shreyas Iyer doubtful for the first ODI against Australia. (Reported by Cricbuzz).
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 12, 2023
याआधीही अय्यरला झाली होती दुखापत -
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यापूर्वी श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे सूर्यकुमार यादव याला कसोटीत संधी देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा अय्यरला पाठदुखीचा त्रास झाला आहे.
विराटच्या शतकाने गाजवला चौथा दिवस -
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरु भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात भारताने एक चांगली धावसंख्या करुन सामन्यात आपलं पुनरागमन केलं आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत तब्बल 480 धावा स्कोरबोर्डवर लावल्यावर भारतानं चोख प्रत्यूत्तर देत शुभमन गिल (Shubhaman Gill) आणि विराट धावांकोहली (Virat Kohli) यांच्या शतकाच्या मदतीनं 571 धावा करत 91 धावांची आघाडी घेतली. चौथा दिवस संपताना ऑस्ट्रेलियानं एकही विकेट न गमावता 3 धावा केल्या असल्याने भारत सध्या 88 धावांच्या आघाडीवर सामन्यात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)