एक्स्प्लोर

Shirdi SaiBaba Birthplace Conflict | साईंच्या जन्मस्थळाच्या वादामुळं पुकारलेला शिर्डी बंद मागे

साई बाबांच्या जन्मस्थळाच्या वादावरुन मध्यरात्रीपासून शिर्डीत बेमुदत बंद पाळण्यात आला. शिर्डी परिसरातील जवळपास 30 गावांनी या बंदला पाठिंबा देत गावांत बंद पाळण्यात आला.

शिर्डी : जन्मस्थळाच्या वादामुळं मध्यरात्रीपासून पुकारलेला शिर्डी बंद मागे घेण्याचा निर्णय शिर्डीकरांनी केला आहे. वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या बैठक बोलावली आहे. तोवर बंद मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी शिर्डीकरांकडे केली होती. त्यानुसार अखेर शिर्डीकरांनी बंद मागे घेतला आहे. पण उद्याच्या बैठकीत तोडगा निघाला नाही तर पुन्हा बंद पुकारला जाईल, असा इशाराही शिर्डीकरांनी दिला आहे. दरम्यान साई बाबांच्या जन्मस्थळाच्या वादावरुन मध्यरात्रीपासून शिर्डीत बेमुदत बंद पाळण्यात आला होता. शिर्डी परिसरातील जवळपास 30 गावांनी या बंदला पाठिंबा देत गावांत बंद पाळण्यात आला. या बंदमध्ये साईमंदिर मात्र भाविकांसाठी सुरु ठेवण्यात आलं आहे. दुसरीकडे शिर्डीकरांनी पुकारलेल्या बंदला परभणी आणि पाथरीकरांनी साई जागराने प्रत्युत्तर दिलं होतं. साईंच्या भजन आणि किर्तनात पाथरीकर दंग झाल्याचं पाहायला मिळालं होतं. या साई जागर आंदोलनात शिवसेना खासदार संजय जाधवही सहभागी झाले होते. जन्मस्थळाचा वाद निर्माण न करता शिर्डीकरांनी सद्बुद्घी मिळो, अशी प्रार्थना पाथरीकरांनी केली आहे. जगाला 'सबका मालिक एक'चा संदेश देणाऱ्या शिर्डीच्या साईबाबांचं जन्मस्थळ परभणी जिल्ह्यातलं पाथरी की नगर जिल्ह्यातलं शिर्डी असा वाद सध्या सुरु आहे. या वादामुळे आज शिर्डी बंद आंदोलन सुरु केलं होतं. या आंदोलनात 30 गावांनी सहभाग घेतला होता. काय आहे पाथरीकरांचा दावा पाथरीकरांनी दावा केला आहे की, साई संस्थाननं 1994 ला प्रकाशित केलेल्या हिंदी साईचरित्रामध्ये साई बाबांचा जन्म हा पाथरी येथील आहे. मात्र हा उल्लेख पाथर्डी नावानं करण्यात आला आहे. संत दासगणू महाराज यांनी त्यांच्या ओवीमध्ये भगवना श्रीकृष्णाचा जन्म जसा मथुरेत झाला आणि ते गोकुळात आले तसाच साईबाबांचा जन्म पाथरीत झाला आणि ते शिर्डीत गोकुळाप्रमाणेच आले असे सांगितलं आहे. पण शिर्डीकरांचा या दाव्याला विरोध आहे. साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत दावा करताना पाथरीकरांनी साईचरित्राच्या आठव्या आवृत्तीचादेखील दाखला दिला आहे. ज्या आठव्या आवृत्तीचा दाखला देत पाथरीकर साईबाबांच्या जन्मस्थळाचा दावा करीत आहेत, ती स्थळप्रत शिर्डी संस्थानच्या दप्तरांतूनच गायब असल्याचे निष्पन्न झाले आहे. शिर्डी साईंच्या जन्मस्थानावरुन नव्या वादाची शक्यता, परभणीतल्या पाथरीला मुख्यमंत्र्यांकडून 100 कोटींचा निधी 1972 ते 75 मध्ये साईचरित्राची आठवी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली होती. त्यानंतर पाथरी संस्थानचे विश्वस्त विश्वासराव खेर आणि सीताराम धानू हे द्वयी शिर्डी संस्थानचेही विश्वस्त होते. त्यामुळे सदर प्रकरणास वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. याबाबत संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे म्हणाले की, आठवी आवृत्ती गायब आहे, याबाबत आम्हाला आताच माहिती मिळाली आहे, आम्ही यावर चौकशी करणार आहोत. शिर्डी संस्थानने साईचरित्राच्या आतापर्यंत 36 आवृत्त्या प्रकाशित केल्या आहेत. त्यापैकी नेमकी आठवी आवृत्ती मंदिर संस्थानच्या दप्तरांमधून गहाळ झाल्याची नोंद आहे. त्यामुळे इतक्या आवृत्त्यांपैकी केवळ आठवी आवृत्तीच कशी गायब झाली? असा सवाल पाथरीकर उपस्थित करत आहेत. काय आहे वादामागील कारण? काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील एका सभेत पाथरी असा साईंच्या जन्मस्थानाचा उल्लेख करीत 100 कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादाला तोंड फुटले. पाथरी गावाच्या विकासाला आमचा विरोध नाही. मात्र, जन्मस्थळाला विरोध असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी मध्यरात्रीपासून शिर्डीकरांनी बेमुदत संप पुकारला आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री यावर आपली भूमिका स्पष्ट करत नाही. तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Sunny Deol Reaction Pan Masala Gutkha Ads: पान मसाल्याची जाहिरात करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी तुकाराम मुंढेंच्या रडारवर; सनी देओल म्हणाला, 'पैशांसाठी इमान विकणार...'
पान मसाल्याची जाहिरात करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी तुकाराम मुंढेंच्या रडारवर; सनी देओल म्हणाला, 'पैशांसाठी इमान विकणार...'
Aus vs Ban 1st Test : आधी बांगलादेशने लाज काढली, आता ICC करणार ऑस्ट्रेलियाचा हिशेब; 42 लाखांचा दंड अन् WTC पॉइंट्सही जाणार, नेमकं काय घडलं?
आधी बांगलादेशने लाज काढली, आता ICC करणार ऑस्ट्रेलियाचा हिशेब; 42 लाखांचा दंड अन् WTC पॉइंट्सही जाणार, नेमकं काय घडलं?
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Embed widget