एक्स्प्लोर

शनीमहाराजांच्या दर्शनाआधीच काळाची झडप! शिंगणापुरात भरधाव मिनी बसची रिक्षाला धडक; तिघा मित्रांचा जागीच मृत्यू

ShaniShingnapur Road Accident: राहुरी–शनीशिंगणापूर मार्गावर रिक्षा व मिनी बसची समोरासमोर धडक. इगतपुरीतील तीन तरुणांचा जागीच मृत्यू.

ShaniShingnapur Road Accident: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शनीशिंगणापूर मार्गावर भीषण अपघाताची घटना उघडकीस आली. उंबेरे गावाजवळ  रिक्षा आणि मिनी बसची समोरासमोर धडक झाली. या धडकेत इगतपुरीजवळील गिरणारे येथील तीन तरूणांचा जागीच मृत्यू झाला. तर, दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले.  तर, इतर दोघे जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.  काही  तरूण पालखी घेऊन शिर्डीला गेले होते. तर, त्यातील काही तरूण दर्शनासाठी शनीशिंगणापूरला  दर्शनासाठी जात होते. दरम्यान,  राहुरीजवळ समोरून येणाऱ्या मिनी बसची रिक्षाला धडक बसली. यात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला.  तर, मिनी बस रस्त्याच्या कडेला उलटली, तर, नाशिकच्या सटाण्याजवळही भीषण अपघात घडला.  या अपघातात आमलीपाडा येथील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. या दोन्ही अपघाताच्या घटनेनंतर नाशिक हादरले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, इगतपूरीजवळील गिरणारे येथील  काही तरूण पालखी घेऊन शिर्डीला जात होते. तर, त्यातील काही तरूण शनिशिंगणापूरला निघाले होते. तिघेही रिक्षाने निघाले होते. परंतु, दर्शनापूर्वीच त्यांच्यावर काळाने झडप घातली.   राहुरीहून समोरून येणाऱ्या मिनी बसने रिक्षा धडक दिली. अपघात घडताच स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मदतकार्याला सुरूवात केली. या भीषण अपघातात  रिक्षातील दीपक जगन डावखर (वय वर्ष २२),  आकाश मनोहर डावखर (वय वर्ष 22) आणि दीपक विजय जाधव (वय वर्ष 22) या तिघांचा अपघाती मृत्यू झाला. 

तिघे तरूण इगतपूरी येथील रहिवासी

तिघेही नाशिकच्या इगतपूरी येथील गिरणारे गावचे रहिवासी होते.   तर, रूपेश गणेश भगत (वय वर्ष 19) आणि रोशन  गंगाधर डावखरे हे दोघेही गंभीर जखमी आहेत. त्या दोघांवर सध्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.  या भीषण अपघातानंतर तरूणांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हा अपघात नेमका कसा घडला? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सटाण्यात अपघात, दाम्पत्याचा मृत्यू

नाशिकच्या सटाण्यातही भीषण अपघाताची घटना घडली. साक्री - शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर ढोलबारे गावाजवळ मंगळवारी सकाळच्या सुमारास अपघाताची  घटना घडली.  येवल्याहून मुलांना भेटून दाम्पत्य दुचाकीवरून घरी परतत होते. मात्र, मागून येणार्‍या भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.  तर, दुचाकी थेट समोरून येणाऱ्या पिकअपला आदळली. या अपघातात  संदीप दासू गावित (वय वर्ष 35) आणि त्यांची पत्नी आशा संदीप गावित दोघांचा जागीच  मृत्यू झाला. 

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
Cyber Crime : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा AI Deepfake व्हिडीओ, पुण्यातील व्यापाऱ्याला 1 कोटींचा गंडा, अनेकजण बळी
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा AI Deepfake व्हिडीओ, पुण्यातील व्यापाऱ्याला 1 कोटींचा गंडा, अनेकजण बळी

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
Embed widget