एक्स्प्लोर

शारजील इमामच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या उर्वशी चुडावालाच्या अडचणी वाढल्या

याप्रकरणी घोषणाबाजी करणाऱ्या उर्वशी चुडावाला आणि आणखी 50 जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई पोलीस आता उर्वशी चुडावालाचा शोध घेत आहेत. या परेडदरम्यान उर्वशी चुडावाला नावाच्या मुलीने देशद्रोहाचा आरोप असलेल्या शरजील इमामच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली होती.

मुंबई : जेएनयूचा विद्यार्थी शारजील इमामच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याचा आरोप असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या उर्वशी चुडावाला यांचा अटकपूर्व जामीन अर्ज बुधवारी मुंबई सत्र न्यायालयानं नामंजूर केला आहे. चुडावाला यांच्याविरोधात आझाद मैदान पोलिसांनी देशद्रोहाचा आरोप ठेवला आहे. शारजील इमामच्या विरोधात राष्ट्रद्रोहासह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे. त्याच्या समर्थनार्थ काही दिवसांपूर्वी आझाद मैदानमध्ये एलजीबीटीक्‍यू (समलैगिंक-बायसेक्‍शुअल-ट्रान्सजेन्डर-क्वीर) समाजघटकांच्यावतीने निदर्शन करण्यात आली होती. या आंदोलनामध्ये 22 वर्षीय चुडावाला यांनी शारजीलच्या समर्थनासाठी घोषणाबाजी केली होती. शारजील तुझं स्वप्न आम्ही पूर्ण करु, अशी घोषणाबाजी करुन उर्वशीनं देशाविरोधात गुन्हा दाखल असलेल्या आरोपीचे समर्थन केले आहे, असा आरोप सरकारी पक्षाने ठेवला आहे. मात्र तिने केवळ एकदाच घोषणा दिली आणि तो गुन्हा होऊ शकत नाही, तसेच केवळ घोषणा देणं म्हणजे सरकारविरोधात टीका होत नाही, असा दावा तिच्यावतीने करण्यात आला. मात्र अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रशांत राजवैद्य यांनी हा युक्तिवाद अमान्य करत तिचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला. तसेच मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी अर्ज करण्याकरीताही चुडावाला यांना मुदत दिली नाही. चुडावाला यांनी आंदोलनाआधी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्टही लिहिली होती. सीएए विरोधात शारजील इमामने दिल्ली आणि अलिगढमध्ये चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप स्थानिक पोलिसांनी केला आहे.

मुंबईत LGBT परेडमध्ये शरजील इमामच्या समर्थनार्थ घोषणा, 51 जणांविरोधात देशद्रोहाचे गुन्हे 

काय आहे प्रकरण?

मुंबईत मागील शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या LGBT प्राईड परेडदरम्यान देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या शरजील इमामच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली होती. याप्रकरणी घोषणाबाजी करणाऱ्या उर्वशी चुडावाला आणि आणखी 50 जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई पोलीस आता उर्वशी चुडावालाचा शोध घेत आहेत. या परेडदरम्यान उर्वशी चुडावाला नावाच्या मुलीने देशद्रोहाचा आरोप असलेल्या शरजील इमामच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली आणि शरजीलचं स्वप्न आम्ही पूर्ण करु असं म्हटलं होतं. शरजील देखील जेएनयूचा विद्यार्थी आहे. त्याने देशाचे तुकडे करण्यासंदर्भातील भाषण केलं होतं. देशातील विविध राज्यांमध्ये शरजील विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या शरजील दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरु आहे. या घोषणाबाजीचा व्हिडिओ विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेअर केला होता आणि म्हटलं होतं की मुंबईत हे काय होत आहे? राज्य सरकार हे सहन का करत आहे? याआधी मुंबईत महक मिर्झा नावाच्या मुलीनेही गेट वे ऑफ इंडियावर आंदोलनादरम्यान फ्री काश्मीरचे पोस्टर दाखवले होते. तिच्याविरोधातही मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही, असं फडणवीसांनी म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Video: सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या रिसेप्शनमध्ये पीएम मोदी, राहुल अन् प्रियांका गांधी आमनेसामने; मोदींनी प्रियांकाजी कशा आहात विचारताच काय घडलं? मल्लिकार्जु खरगेंची सुद्धा कोपरखळी!
Video: सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या रिसेप्शनमध्ये पीएम मोदी, राहुल अन् प्रियांका गांधी आमनेसामने; मोदींनी प्रियांकाजी कशा आहात विचारताच काय घडलं? मल्लिकार्जु खरगेंची सुद्धा कोपरखळी!
ABP Majha Top 10, 12 August 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon
ABP Majha Top 10, 12 August 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon
Vileparle Shanta Bhavan Building Fire: मुंबईतील विलेपार्लेमधील इमारतीला भीषण आग, 2 जणांचा मृत्यू; इमारतीच्या 11 व्या मजल्यावर काय घडलं?
मुंबईतील विलेपार्लेमधील इमारतीला भीषण आग, 2 जणांचा मृत्यू; इमारतीच्या 11 व्या मजल्यावर काय घडलं?
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या रिसेप्शनमध्ये पीएम मोदी, राहुल अन् प्रियांका गांधी आमनेसामने; मोदींनी प्रियांकाजी कशा आहात विचारताच काय घडलं? मल्लिकार्जु खरगेंची सुद्धा कोपरखळी!
Video: सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या रिसेप्शनमध्ये पीएम मोदी, राहुल अन् प्रियांका गांधी आमनेसामने; मोदींनी प्रियांकाजी कशा आहात विचारताच काय घडलं? मल्लिकार्जु खरगेंची सुद्धा कोपरखळी!
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'

Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Embed widget