एक्स्प्लोर

Jaykumar Gore : भाजप आमदाराच्या अडचणीत वाढ, 200 मृत कोविड रुग्ण जिवंत दाखवून भष्टाचार केल्याचे आरोप गंभीरतेने घ्या, न्यायालयाच्या पोलिसांना सूचना

Covid Scam Allegations : कोविड काळात राज्य सरकारने सर्व कोविड सेंटरना मोफत औषधांचा साठा पुरवला होता, पण त्यामध्ये जयकुमार गोरे यांनी घोटाळा केल्याचा आरोप करण्यात येतोय. 

मुंबई: भाजपा आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या विरोधातील भ्रष्टाचारांच्या आरोपांना गंभीरतेनं घ्या अशा सक्त सूचना मुंबई उच्च न्यायालयाने सातारा पोलिस अधीक्षकांना दिल्या आहेत. आमदार जयकुमार गोरे यांनी कोविड काळात 200 पेक्षा अधिक मृत रुग्णांना जिवंत दाखवून निधीवाटपात घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी मायणी येथील दीपक देशमुख यांनी जयकुमार गोरेंविरोधात हायकोर्टात याचिका केली आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाकडून या याचिकेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. 

जयकुमार गोरे, त्यांच्या पत्नी सोनिया गोरे तसेच घोटाळ्यात सहभागी इतर आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची या याचिकेतून मागणी करण्यात आली आहे. सरकारनं मोफत कोरोना उपचारासाठी सर्व रुग्णालयं आणि कोविड सेंटरना मोठ्या प्रमाणावर औषधांचा साठा विनामुल्य देण्याकरता पुरवला होता. मात्र आमदार जयकुमार गोरे आणि त्यांच्या साथीदारांनी कोरोनाग्रस्तांकडून उपचाराचे पैसे उकळल्याचा गंभीर आरोप करण्यात येतोय. 

कोविड काळातील या संपूर्ण गैरव्यवहाराचा सखोल तपास उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली करण्याची याचिकेतून मागणी करण्यात आली आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आता आमदार जयकुमार गोरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

काय आहे नेमका आरोप? 

सातारा जिल्ह्यातील मायणी-खटाव येथे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्स सेंटर आहे. हे सेंटर सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाग्रस्तांचे उपचार करण्यासाठी ताब्यात घेतले होते. या संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष जयकुमार गोरे होते. याकाळात डॉक्टरांच्या खोट्या सह्या, बनावट कागदपत्रं वापरण्यात आली. राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचा गैरफायदा घेण्यात आला असा आरोप करण्यात आला आहे. 

या प्रकरणात भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवून कोट्यवधी रुपये लाटले. 200 हून अधिक मृत रुग्णांना जिवंत दाखवून विविध सरकारी योजनांतून निधी मिळवण्यात आला. सरकारने मोफत कोरोना उपचारांसाठी सर्व रुग्णालय, कोरोना सेंटरना मोठ्या प्रमाणावर औषध व इंजेक्शन पुरवली होती. मात्र गोरे व त्यांच्या साथीदारांनी कोरोनाग्रस्तांकडून उपचाराचे पैसे उकळले असे गंभीर आरोप करण्यात आले आहे. 

गुन्हा दाखल करण्याची मागणी

कोरोना रुग्णांवरील उपचाराच्या नावाखाली याप्रकरणी जयकुमार गोरे, त्यांच्या पत्नी सोनिया गोरे तसेच घोटाळ्य़ात सहभागी इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण गैरव्यवहाराचा सखोल तपास उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तीच्या देखरेखीखाली व्हावा, अशी विनंतीही याचिकेतून करण्यात आली आहे. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

LMV Driving License : LMV ड्रायव्हिंग लायसन्स धारक 7500KG वजनाची वाहने चालवू शकतील; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
LMV ड्रायव्हिंग लायसन्स धारक 7500KG वजनाची वाहने चालवू शकतील; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Manoj Jarange Patil: मराठा समाजाच्या हिताचा उमेदवारच निवडून द्या, पण शक्यतो पाडापाडी कराच: मनोज जरांगे पाटील
मराठा समाजाच्या हिताचा उमेदवारच निवडून द्या, पण शक्यतो पाडापाडी कराच: मनोज जरांगे पाटील
Vastu Tips : संध्याकाळी किती वाजता देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते? 'या' चुका करणाऱ्यांच्या घरी पाऊल पण ठेवत नाही
संध्याकाळी किती वाजता लक्ष्मी घरात प्रवेश करते? 'या' चुका करणाऱ्यांच्या घरी पाऊल पण ठेवत नाही
US Election Result 2024 : तगडी टक्कर देऊनही कमला हॅरिस पिछाडीवर, अमेरिकेत अब की बार ट्रम्प की सरकार? सत्तांतराची चिन्हे
तगडी टक्कर देऊनही कमला हॅरिस पिछाडीवर, अमेरिकेत अब की बार ट्रम्प की सरकार? सत्तांतराची चिन्हे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Donald Trump Lead: डोनाल्ड ट्रम्प बहुमताच्या आकड्यापासून अवघे ३ इलक्टोल दूरABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 06 November 2024City Sixty | सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा एक क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaBalasaheb Sancheti Home Raid : वैजापुरात प्रसिद्ध उद्योजक बाळासाहेब संचेतीच्या घरावर छापे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LMV Driving License : LMV ड्रायव्हिंग लायसन्स धारक 7500KG वजनाची वाहने चालवू शकतील; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
LMV ड्रायव्हिंग लायसन्स धारक 7500KG वजनाची वाहने चालवू शकतील; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Manoj Jarange Patil: मराठा समाजाच्या हिताचा उमेदवारच निवडून द्या, पण शक्यतो पाडापाडी कराच: मनोज जरांगे पाटील
मराठा समाजाच्या हिताचा उमेदवारच निवडून द्या, पण शक्यतो पाडापाडी कराच: मनोज जरांगे पाटील
Vastu Tips : संध्याकाळी किती वाजता देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते? 'या' चुका करणाऱ्यांच्या घरी पाऊल पण ठेवत नाही
संध्याकाळी किती वाजता लक्ष्मी घरात प्रवेश करते? 'या' चुका करणाऱ्यांच्या घरी पाऊल पण ठेवत नाही
US Election Result 2024 : तगडी टक्कर देऊनही कमला हॅरिस पिछाडीवर, अमेरिकेत अब की बार ट्रम्प की सरकार? सत्तांतराची चिन्हे
तगडी टक्कर देऊनही कमला हॅरिस पिछाडीवर, अमेरिकेत अब की बार ट्रम्प की सरकार? सत्तांतराची चिन्हे
Ashti vidhan sabha: भाजपचे सुरेश धस लवकरच तुतारीचा प्रचार करणार! अमोल मिटकरींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
भाजपचे सुरेश धस लवकरच तुतारीचा प्रचार करणार! अमोल मिटकरींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Astrology : 7 नोव्हेंबरपासून 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन; शुक्राचा केतूच्या नक्षत्रात प्रवेश, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ
7 नोव्हेंबरपासून 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन; शुक्राचा केतूच्या नक्षत्रात प्रवेश, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ठाकरे सकाळी म्हणाले, महिला पोलिसांची भरती करणार, शिंदे संध्याकाळी म्हणाले पोलिस दलात 25 हजार महिलांची भरती करणार! कोल्हापुरात घोषणांचा 'सुकाळ'
ठाकरे सकाळी म्हणाले, महिला पोलिसांची भरती करणार, शिंदे संध्याकाळी म्हणाले पोलिस दलात 25 हजार महिलांची भरती करणार! कोल्हापुरात घोषणांचा 'सुकाळ'
Dhananjay Munde: 'माझा पराभव करण्यासाठी व्यूहरचना', धनंजय मुंडेंचा रोख नेमका कोणाकडं? पंकजा मुंडेंचं नाव घेत नेमकं काय म्हणाले?
'माझा पराभव करण्यासाठी व्यूहरचना', धनंजय मुंडेंचा रोख नेमका कोणाकडं? पंकजा मुंडेंचं नाव घेत नेमकं काय म्हणाले?
Embed widget