Sanjeevraje Naik Nimbalkar : संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या घरावर आयकरचा छापा; सकाळी 6 वाजल्यापासून झाडाझडती सुरू, बंगल्याबाहेर कार्यकर्ते दाखल
Sanjeevraje Naik Nimbalkar : आज सकाळीच आयकर विभागाचं पथक संजीवराजे यांच्या घरी दाखल झालं. सकाळी 6 वाजल्यापासून पथकाकडून झाडाझडती सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

सातारा: सातारा जिल्ह्यातील माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर (Sanjeevraje Naik Nimbalkar), रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागानं छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी करण्यापूर्वीच आयकर विभागानं छापा टाकला गेला असल्याची माहिती आहे. आज सकाळीच आयकर विभागाचं पथक संजीवराजे (Sanjeevraje Naik Nimbalkar)यांच्या घरी दाखल झालं. सकाळी 6 वाजल्यापासून पथकाकडून झाडाझडती सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
संजीवराजे नाईक निंबाळकर (Sanjeevraje Naik Nimbalkar) यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा पडला त्यानंतर घडमोडींना वेग आला आहे. सकाळी सहा वाजल्यापासून आयकर विभागाकडून त्यांची चौकशी सुरू आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर हे रामराजे निंबाळकर यांचे चुलत बंधू आहेत. सकाळी सहा वाजता आयकर विभागाचे पथक संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर घराबाहेर कार्यकर्ते जमले आहेत. बंगल्यामध्ये आत कोणालाही प्रवेश दिला जात नसल्याची माहिती आहे. त्यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले आहेत. या धाडीमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे शरद पवार यांच्या पक्षात आहेत, तर संजीव राजे नाईक निंबाळकर यांनी निवडणुकीआधी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असलेल्या संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील लक्ष्मी नगर भागातील निवासस्थानी आज सकाळी आयकर विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी छापा टाकला आहे. त्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू आहे. निवासस्थानामधील सर्वांचे मोबाईल देखील काढून घेतल्याची माहिती आहे. घराबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे ते चुलत बंधू आहेत. या बाबत कुणालाही माहिती देण्यात आलेली नाही. सकाळी सहा वाजल्यापासूनच ही तपासणी सुरू आहे, या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
संजीवराजेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशापूर्वी मोठी घडामोड
संजीवराजे नाईक निंबाळकर काही दिवसांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यापूर्वीच हा छापा टाकण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी साताऱ्यातील राज्यसभा खासदार नितीन पाटील यांच्याशी चर्चेनंतर प्रवेशाचा निर्णय होईल असं म्हटलं होतं.
नेचर डिलाईट डेअरीचे मालक अर्जुन देसाई यांच्या घरावर धाड
त्याचबरोबर इंदापूर तालुक्यातील कळस येथील नेचर डिलाईट डेअरीचे मालक अर्जुन देसाई यांच्या घरावर केंद्रीय तपास यंत्रणांची धाड टाकण्यात आल्याची माहिती आहे. आयकर विभागाची धाड असल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

