22-23 दिवस दोघांनी गुंगारा देत फिरले; घटनास्थळापासून आरोपी केवळ 250 किमी अंतरावर सापडले; अंबादास दानवेंचं ट्विटची चर्चा
Ambadas Danve On Sudharshan Gule: सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून ताब्यात घेण्यात आले.
Ambadas Danve On Sudharshan Gule: बीड येथील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून ताब्यात घेण्यात आले. गेल्या 22-23 दिवसांपासून सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे फरार होते. याचपार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एक्सवर पोस्ट करत (आधीचे ट्विटर) या कारवाईवर भाष्य केलं आहे.
सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे दोन आरोपी पकडले गेले आहेत. तब्बल 22-23 दिवस गुंगारा देत फिरणारे हे आरोपी घटनस्थळापासून केवळ 250 किमी अंतरावर पुण्यात सापडतात. यांना कोणी आश्रय दिला, सुरक्षा कोणी दिली, ही नावे आता तातडीने समोर यायला हवीत, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.
सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे दोन आरोपी पकडले गेले आहेत. तब्बल २२-२३ दिवस गुंगारा देत फिरणारे हे आरोपी घटनस्थळापासून केवळ २५० किमी अंतरावर पुण्यात सापडतात. यांना कोणी आश्रय दिला, सुरक्षा कोणी दिली, ही नावे आता तातडीने समोर यायला हवीत. #santoshdeshmukhcase
— Ambadas Danve (@iambadasdanve) January 4, 2025
आरोपींना कसं घेतलं ताब्यात?
या प्रकरणातील संशयित आरोपींना ज्या व्यक्तीने पळून जाण्यासाठी मदत केली होती, त्यांच्याकडून काही लिंक्स मिळाल्या. काही माहिती मिळाली. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर हे तिघे ज्या लोकांच्या संपर्कात होते, त्यांच्याकडून माहिती घेतली गेली. त्यानंतर पोलिसांनी आणि स्पेशल टीमने त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. या दोघांना पुण्यातून अटक केल्याची माहिती आहे. याबाबत कोणताही अधिकृत दुजारा दिलेला नाहीये. या तिघांच्या मागे एसआयटी सोबतच सीआयडी आणि बीड पोलिसांची टीम होती. या प्रकरणाची चौकशी देखील सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील या प्रकरणाची दखल घेतली आणि तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याचबरोबर या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी टेक्निकल टीम तयार करून या आरोपींच्या मोबाईलचे लोकेशन आणि ज्या लोकांच्या संपर्कात होते त्यांच्या चौकशीनंतर काही माहिती मिळवली. त्याचबरोबर या तीन आरोपींनी आपले मोबाईल फोन बंद ठेवले होते. नवीन सिम घेतले होते. पण त्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून त्यांची माहिती मिळाली आणि त्या आधारे या दोघांना अटक केलेले आहे. या प्रकरणातील ते मुख्य आरोपी आहेत. तिसरा आरोपी फरार आहेत. त्याला त्याला देखील पकडण्यात पोलिसांना लवकरच यश येईल अशी अपेक्षा आहे. या हत्या प्रकरणांमध्ये डॉक्टर वायबसे यांच्यासह त्याची वकील त्यांना एसआयटीने ताब्यात घेतलेलं आहे.
संबंधित बातमी:
वाल्मिक कराड सरेंडर, पण सुदर्शन घुले त्यापेक्षा डेंजर; सरपंच हत्येतील मुख्य आरोपी घुले कोण?