Sangli News : इस्लामपुरात कुख्यात गुंड नितीन पालकरला मध्यवस्तीत अजिंक्य बाजारात भरदिवसा भोकसले
Sangli News : नितीन पालकर हा गुरुवारी दुपारी इस्लामपूर येथील वाळवा बाजारसमोर एका पान टपरी जवळ थांबला होता. त्यावेळी दोघा हल्लेखोरांनी धारदार हत्याराने त्याच्यावर हल्ला चढवला.

Sangli News : सांगलीतील वाळवा तालुक्यातील इस्लामपुरात कुख्यात गुंड नितीन पालकरचा निर्घृण खून करण्यात आला. गुरुवारी भर दिवसा नितीन पालकरवर धारदार हत्याराने हल्ला चढविण्यात आला. नितीन पालकर हा इस्लामपूरमधील कुख्यात गुंड आहे. त्याच्यावर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी इत्यादी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. नितीन पालकरच्या गुन्हेगारी कारवायात वाढ झाल्याने इस्लामपूर पोलिसांनी त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई देखील केली होती. नितीन पालकर हा गुरुवारी दुपारी इस्लामपूर येथील वाळवा बाजारसमोर एका पान टपरी जवळ थांबला होता. त्यावेळी दोघा हल्लेखोरांनी धारदार हत्याराने त्याच्यावर हल्ला चढवला. नितीन पालकरचा खून नेमक्या कोणत्या कारणातून झाला हे समजू शकले नाही.
बेसबॉल बॅटने मारहाण करत युवकाचा खून
दरम्यान, आणखी एक घटना खुनाची घडली असून राष्ट्रीय महामार्गालगत वाघवाडी फाट्यावर भर चौकात युवकाचा बेसबॉल बॅटने मारहाण करत खून करण्यात आल्याची घटना घडली. नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध ठेवल्याच्या रागातून हा प्रकार झाला. पोलिसांनी 12 तासांत दोघा संशयितांना जेरबंद केलं असून खुनाची कबुली दिली आहे. सौरभ राजेंद्र केर्लेकर (वय 30, रा. माळगल्ली, इस्लामपूर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या खून प्रकरणी पोलिसांनी अरविंद उर्फ राघू सुभाष साटम, किरण रामचंद्र सातपुते अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
मृत सौरभ हा राघूचा नातेवाईक आहे. तो रुग्णवाहिका चालक आणि डीजे ऑपरेटर म्हणून काम करत होता. सौरभचे आपल्या नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध आहेत यावरून राघू चिडून होता. काटा काढायच्या उद्देशाने त्याला मंगळवारी रात्री उशिरा वाघवाडी फाट्यावरील ओपन जिमशेजारी असणाऱ्या अशोक ढाब्याजवळ बोलावून घेतले. तिथे राघू आणि सौरभ यांची वादावादी झाली. त्यावेळी तिथे असणाऱ्या किरण याने सौरभला धरून ठेवले आणि रागाच्या भरात राघूने लाकडी बॅटचे फटके सौरभच्या तोंडावर आणि डोक्यात मारून त्याला गंभीर जखमी केले. मध्यरात्री ही मारहाण झाल्यावर सौरभ हा तिथेच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
इतर महत्वाच्या बातम्या























