Sangli News : सांगली जिल्ह्यातील शिक्षकांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 25 कोटी रुपयांची कर्जे थकवले आहेत. संबंधित 350 शिक्षक आणि मुख्याध्यापकांना बँकेने कर्ज वसुलीसाठी नोटीसा पाठवल्या आहेत. त्यामुळे वसुलीमध्ये सुधारणा होत आहे. कर्जे थकवलेल्या शिक्षकांन मध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचा यामध्ये समावेश आहे.


जिल्हा बँकेने शिक्षकांना 25 कोटी रुपयांची कर्जे दिली होती. यातील बहुतांश शिक्षकांना याच बँकेतून वेतन मिळत होते. त्यानंतर काही शिक्षकांनी आपले वेतन अन्य बँकात करण्यासाठी प्रयत्न केले, त्यात त्यांना यशही आले. त्यामुळे जिल्हा बँकेची कर्जे थकली आहेत. विशेष म्हणजे जिल्हा बँकेची कर्ज देताना संबंधित शाळेचे मुख्याध्यापक गट शिक्षणाधिकारी यांचे हमीपत्र घेतले आहे. त्यानुसार जिल्हा बँकेने सध्या जोरदार कारवाई सुरू केली आहे.


मात्र, घेतलेली हमीपत्रे ठराविक नमुन्यात नसल्याचा गैरफायदा संबंधित शिक्षकांनी उचलला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित शिक्षकांकडून नियमाप्रमाणे हमीपत्र घेण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू झाले आहे. बँकेकडून थकीत कर्जे वसुलीसाठी जोरदार मोहीम राबवली जात आहे. एनपीएसाठी प्रशासनाचा सध्या संकल्प असून त्यासाठी सर्वच कर्जदारांना नोटीसा देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये बडे कर्जदार संस्थांचाही समावेश आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या