Creation of Ancient Harp in Miraj : मिरजेतील सतारमेकर गल्ली ही तंतुवाद्य निर्मितीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. याच मिरजमधील GS मुझिकल्स टीमने पाच महिने अथक परिश्रम करून सहा फुटी आणि 40 स्वरांचा भारतीय बनावटीचा प्रथमच हार्प तंतुवाद्य तयार केला आहे. पाश्चात्य रोमन हस्तशिल्पचे या हार्पवर कोरीव काम करण्यात आले आहे. भारतात पहिल्यांदाच भारतीय बनावटीचा हार्प तयार करण्यात आल्याने मिरजेच्या नावलौकिकात भर पडली आहे.


GS मुझिकल्स टीमची तंतुवाद्य निर्मितीमध्ये चौथी पिढी कार्यरत


मिरजेत देशी- विदेशी तंतुवाद्य तयार करण्याचा हातकंडा असल्याने इथे तयार केलेल्या तंतुवाद्यांला जगाच्या कानाकोपऱ्यात मोठी मागणी आहे. आज देशी तंतुवाद्य सोबत विदेशी तंतुवाद्य तयार करण्याचा बहुमान मिरज मधील GS मुझिकल्स या फर्मला मिळाला आहे. देशी विदेशी तंतुवाद्य तयार करण्यात GS मुझिकल्स टीमची तंतुवाद्य निर्मितीमध्ये चौथी पिढी कार्यरत आहे. (Creation of Ancient Harp in Miraj)


वाद्य निर्मितीमध्ये हातखंडा असल्याने देशातील नामांकित सांस्कृतिक संस्थेने पाच महिन्यांपूर्वी हार्प हे विदेशी तंतुवाद्य तयार करण्याची मागणी GS मुझिकल्सकडे केली होती. अमेरिका, कॅनडा आणि पाश्चात्य देशात इसवी सणपूर्व 3 हजार पूर्वी पासून हार्प तंतुवाद्य वाजवले जायचे. याचा उल्लेख धार्मिक ग्रंथात पाहायला मिळतो.  


सहा फुटी आणि 40 स्वरांचा भारतीय बनावटीची हार्प


विदेशात हे तंतुवाद्य तयार केले जात असल्याने देशात या तंतुवाद्यांची निर्मिती कधी झाली नाही, पण GS मुझिकल्स टीमने पाच महिने अथक परिश्रम करून सहा फुटी आणि 40 स्वरांचा भारतीय बनावटीची प्रथमच हार्प तंतुवाद्य तयार करण्यात यश आले आहे. पाश्चात्य रोमन हस्तशिल्प या हार्पवर कोरीव काम करण्यात आले आहे.  भारतात पहिल्यांदा भारतीय बनावटीचा  हार्प तयार करण्यात आल्याने मिरजेच्या नावलौकिकात भर पडली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या