एक्स्प्लोर

Sangli Crime : सर्पदंशाने अवघ्या 15 वर्षीय शाळकरी मुलीचा करुण अंत; झोपेत असतानाच सर्पदंश

Sangli Crime : सर्पदंश केल्यानंर श्रेया ओरडून जागी झाली. त्यानंतर नातेवाइकांनी रात्री दहा वाजता जत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी श्रेयाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. 

सांगली : सांगली जिल्ह्यातील (Sangli News) जत तालुक्यातील संख गावामध्ये अवघ्या 15 वर्षीय शाळकरी मुलीचा सर्पदंशाने करुण अंत झाल्याची धक्कादायक घटना घडली. झोपी गेली असतानाच सर्पदंश झाला. श्रेया श्रीशैल न्हावी (वय 15) असे या शाळकरी मुलीचं नाव आहे. शनिवारी रात्री हा प्रकार घडला. सर्पदंश केल्यानंर श्रेया ओरडून जागी झाली. त्यानंतर नातेवाइकांनी रात्री दहा वाजता जत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी श्रेयाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. 

मिळालेल्या माहितीनुसार श्रेया आर. बी. पी. हायस्कूलमध्ये इयत्ता नववीच्या वर्गात शिकत होती. नेहमीप्रमाणे श्रेया झोपी गेली. यावेळी गावातील वीज गेली होती. यावेळी आठच्या सुमारास तिला सर्पदंश झाल्यानंतर ती जागी होऊन ओरडू लागली. त्यानंतर कुटुंबीयांना खासगी रुग्णालयात तत्काळ नेले. तेथून तिला रात्री दहाच्या सुमारास जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिच्या निधनाचे वृत्त समजताच नातेवाइकांनी हंबरडा फोडला. रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद जत पोलिस ठाण्यात झाली आहे. 

घरापासून हाकेच्या अंतरावर तरुणाचा गॅस स्टोव्ह डोक्यात घालून निर्घृण खून

दरम्यान, सांगली शहरात (Sangli Crime) संजयनगर झेंडा चौक परिसरात तरुणाच्या डोक्यात गॅस स्टोव्ह घालून निर्घृणपणे खून (Murder In Sangli) करण्यात आला. नितीन आनंदराव शिंदे (वय 32, रा. संजयनगर, सांगली) असे मृत तरुणाचे नाव आहे. किरकोळ वादातून हा खून चौघांनी केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. नितीनच्या घरासमोर हाकेच्या अंतरावर हा खून झाला. नितीन शिंदे संजयनगरमध्ये खेराडकर पेट्रोलपंपाजवळ झेंडा चौकात राहण्यास होता. त्याची मालवाहतूक गाडी असून तो व्यवसाय करत होता. नितीनच्या वडिलांची वखार आहे. नितीन कामावरून परतल्यानंतर काल रविवारी सांयकाळी घराबाहेर पडला होता. त्यावेळी एका परप्रांतीयाच्या घराजवळ तो आला होता. त्या चौकात संशयित आले. त्यांच्यात किरकोळ कारणातून वादावादी झाली. त्यानंतर अर्धा तासाने नितीन घरात गेला. त्यावेळी संशयित पुन्हा दुचाकीवरून आले. त्यानंतर पुन्हा वाद झाला. वाद टोकाला गेल्यानंतर संशयितांनी तेथील गॅस स्टोव्ह उचलून नितीनच्या डोक्यात घातला. एकच वर्मी घाव बसल्याने नितीन रक्ताच्या थारोळ्यात पडला.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

One Nation One Election : 'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray : अबू आझमींना ईडीची भीती होती का? आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल ABP MAJHAArvind Sawant : चंद्रचूड यांनी न्यायालयाला चूड लावली, अरविंद सावंतांची बोचरी टीकाABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 09 December 2024Aaditya Thackeray : 5 वर्षात पुन्हा अन्याय होणार नाही असं आश्वासन हवं, आदित्य ठाकरे गरजले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
One Nation One Election : 'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
Team India WTC Points Table : ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
मोठी बातमी : मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात खुद्द CM फडणवीस घालणार लक्ष, 11 डिसेंबरला 'त्या'14 तरुणांची घेणार भेट
मोठी बातमी : मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात खुद्द CM फडणवीस घालणार लक्ष, 11 डिसेंबरला 'त्या'14 तरुणांची घेणार भेट
शिवनेरीच्या भूमिला मंत्रीमंडळात स्थान द्या, अपक्ष आमदाराचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
शिवनेरीच्या भूमिला मंत्रीमंडळात स्थान द्या, अपक्ष आमदाराचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
Embed widget