सांगली : 10 टक्के आरक्षण आम्ही मागितलं नव्हतं, ती सरकारची चूक होती अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. मनोज जरांगे पाटील सांगली दौऱ्यावर होते. आज त्यांनी सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. पाटील यांनी सांगितले की माझ्या विरोधात बोलायला लावण्याचे ठिकाण एकमेव सागर बंगला आहे. ज्यावेळी माणूस कशामध्ये सापडत नाही त्यावेळी तो माणूस बदनाम केला जातो, अशी टीका सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना केली. 


आधी नेत्यांची लाट होती आता मराठा समाजाची लाट


ते म्हणाले की फडणवीस यांनी माझ्या विरोधात पाच ते सहा गट तयार केले आहे. पाटील यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की फडणीस यांनी काल जातीयवादी पीआयकडून माझ्या गेवराईमधील घरावर नोटीस चिकटवली आहे. 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या बैठकीमध्येच निवडणुकीचा निर्णय घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान ते पुढे म्हणाले की मराठा समाज हुशार होत आहे. नेत्यांपेक्षा आणि पक्ष मोठे करण्यापेक्षा स्वतःचे कुटुंब मोठे करा याकडे समाजाचा कल असल्याच ते म्हणाले. आधी नेत्यांची लाट होती आता मराठा समाजाची लाट असल्याचे त्यांनी सांगितलं.


दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले की राखीव जागांवरती मराठा आरक्षणास पाठिंबा देणाऱ्या इतर समाजातील उमेदवाराला पाठिंबा देऊ. 29 रोजी मोठी बैठकीला त्या बैठकीत निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितलं. पाटील यांनी भुजबळ यांच्यावर सुद्धा तोफ टाकली ते म्हणाले की 60 टक्के आरक्षणामध्ये मराठा समाज देखील आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या