Jayant Patil: एकनाथ शिंदेंनी एक्का दाखवला आणि आपण पत्त्यांच्या डावात हरलो : जयंत पाटील
आरोग्याच्या सुविधांबाबत आम्ही कधीच शहाणे आणि सजग नव्हतो. कोरोना आल्यानंतर आपल्याला आरोग्याच्या सुविधांचे महत्त्व कळले, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.
![Jayant Patil: एकनाथ शिंदेंनी एक्का दाखवला आणि आपण पत्त्यांच्या डावात हरलो : जयंत पाटील Maharashtra Sangli News Jayant Patil statement on CM Eknath Shinde Corona Jayant Patil: एकनाथ शिंदेंनी एक्का दाखवला आणि आपण पत्त्यांच्या डावात हरलो : जयंत पाटील](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/05/c951b68f13a13c81d90e5c6774042edf169389540611489_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सांगली: एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) एक्का दाखवला आणि आपण पत्त्यांच्या डावात हरलो, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली आहे. डिग्रज रुग्णालयाच्या कामासंदर्भात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. इस्लामपूरमध्ये वैद्यकीय उपकरणे प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते.
कसबे डिग्रज गावामध्ये अद्यावत रुग्णालय उभारण्याचा आमचा मानस होता. सर्व तयारी झाली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांनी एक्का काढला आणि आम्ही मांडलेला पत्त्यांचा डाव कोसळला असे वक्तव्य केल्यानंतर जयंत पाटलांनी केल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. आरोग्याच्या सुविधांबाबत आम्ही कधीच शहाणे आणि सजग नव्हतो. कोरोना आल्यानंतर आपल्याला आरोग्याच्या सुविधांचे महत्त्व कळले, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.
कोरोना काळात आरोग्य सुविधा का महत्त्वाच्या आहेत हे कळले आहे. कोरोना काळात रुग्णालयांमध्ये उपचारसाठी आत गेलेली माणसं कमी बाहेर आली.आता व्हाईट पेपर काढला पाहिजे की कोणाच्या हॉस्पिटलमध्ये किती लोकं आत गेली. या काळात असेही हॉस्पिटल होते की एखादा श्रीमंत माणूस आला की याचा ऑक्सिजन काढून त्या श्रीमंत व्यक्तीला लावायचा असे उद्योग वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये झालेले असा आरोपीही जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना केलाय.
कोरोना काळात दलालांकडून रुग्णांच्या नातेवाईकांची लूट
कोरोना महामारीच्या काळात आरोग्यव्यवस्था दिवसेंदिवस कोलमडली आहे. असं असताना या काळात दलालांकडून रुग्णांच्या नातेवाईकांची लूट झाली. कोरोना संकटाच्या काळात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मदत करणारे जेवढे होते. त्यापेक्षा कितीतरी मोठ्या संख्येने रुग्णांना त्यांच्या अडचणीचा फायदा घेत लुबाडणारे सध्या दिसून येत आहेत. राज्यातील सरकारी, खासगी दवाखाने रुग्णांनी खचून भरले होते. सरकारी दवाखान्यांमध्ये तर काही ठिकाणी एकाच बेडवर दोन ते तीन रुग्ण उपचार घेत असल्याचंही विदारक चित्र आले होते.
रुग्णालयांमध्ये उपचारांच्या नावाखाली आर्थिक लूट
सांगलीसह आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्येही अशी परिस्थिती पाहायला मिळाली होती. रुग्णालयांमध्ये खाटा शिल्लक नसल्याने अत्यवस्थ रुग्णांना उपचारासाठी दाखल करताना नातेवाईकांवर वेगवेगळ्या रुग्णालयांची उंबरठे झिजवण्याची वेळ आली होती. खासगी रुग्णालयांमध्ये उपचारांच्या नावाखाली आर्थिक लूट सुरू असल्याच्या तक्रारी येत होत्या. करोना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेले रेमडेसिविर या औषधाचा तुटवडा निर्माण झाला असल्याने नातेवाईकांना त्यासाठी धावपळ तसेच अनेकदा गरजेपोटी अव्वाच्या सव्वा दरात हे औषध घेण्याची वेळ येत असल्याची ओरड सुरु आहे. अत्यावश्यक स्थितीत वेळेवर ऑक्सिजन न शकल्याने काही रुग्णांना जीव गमवावा लागला होता.
हे ही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)