एक्स्प्लोर

Sangli News : सांगलीमधील तब्बल चार माजी आमदार एकाचवेळी अजितदादांच्या गळाला; मुंबईत होणार पक्षप्रवेश!

या पक्षप्रवेशाने सांगली जिल्ह्यात अजितदादा पवार पक्षाची ताकद वाढणार असून याचा परिणाम जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपालिका निवडणुकीत दिसून येणार आहे.

Sangli News : सांगली जिल्ह्यातील माजी चार आमदार लवकरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात जाणार आहेत. लवकरच मुंबईत हा पक्ष प्रवेश होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. यामध्ये शिराळ्यातील  शिवाजीराव नाईक, कवठेमहांकाळचे अजितराव घोरपडे, आटपाडीचे राजेंद्रअण्णा देशमुख आणि जतचे विलासराव जगताप यांचा समावेश आहे. या माजी आमदारांच्या बरोबरच जत आणि आटपाडी तालुक्यातील काही प्रमुख भाजप पदाधिकारी देखील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. यामध्ये नुकतेच भाजपच्या जिल्हा युवा मोर्चाच्या अध्यक्ष पदाचा आणि भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या आटपाडीच्या अनिल पाटील आणि जतमध्ये भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवलेल्या तमनगौडा रवी पाटील यांचाही समावेश आहे.  

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत होणाऱ्या या पक्षप्रवेशाने सांगली जिल्ह्यात अजितदादा पवार पक्षाची ताकद वाढणार असून याचा परिणाम जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपालिका निवडणुकीत दिसून येणार आहे. दुसरीकडे शिराळाचे माजी आमदार मानसिंगराव नाईक शरद पवार गटातच राहणार की अजित पवार गटात जाणार हे मात्र अद्याप स्पष्ट नसले तरी त्याच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

चार माजी आमदार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार

सांगली जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पक्ष वाढवण्याचे काम सुरु आहे.त्यामुळे सांगली जिल्ह्यातील चार माजी आमदार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात राजकीय अस्वस्थता असून भाजपमधून बाहेर पडूनही अद्याप महायुतीशी संधान असलेल्यांना राजकीय पर्याय दिसत नव्हता. अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळालेले मतदान लक्षात घेउन आजही जिल्ह्यात असलेली पक्षाची ताकद पुर्नस्थापित करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडून प्रयत्न केले जात आहेत.  इस्लामपूर मतदारसंघात राष्ट्रवादी कडून विधानसभा निवडणूक लढवलेलेले निशिकांत भोसले-पाटील यांच्यावर राष्ट्रवादी वाढवण्याची जबाबदारी सोपवली आहे. 

कवठेमहांकाळ तालुक्यातील माजी मंत्री राहिलेले माजी आमदार अजितराव घोरपडे यांनी विधानसभा निवडणुकीत माजी खासदार संजयकाका पाटील यांचा प्रचार केला होता, मात्र त्यांनी अजितदादा पवार पक्षात अधिकृत प्रवेश केला नव्हता. जतेचे माजी आमदार विलासराव जगताप हे भाजपत होते, मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपने गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिल्याने त्यांनी बंडखोर उमेदवारी केलेल्या रवि पाटील यांचा प्रचार केला.  यामुळे त्यांना पक्षातून काढले होते. खानापूर-आटपाडी मतदार संघातील  माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख हे शरदचंद्र पवार पक्षात होते, मात्र विधानसभेचे तिकीट न मिळाल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. 

मानसिंगराव नाईक काय भूमिका घेणार?

शिराळाचे माजी आमदार मानसिंगराव नाईक जरी शरद पवार गटात असले तरी अजित पवार यांच्याशी त्याचे राजकीय संबंध देखील उत्तम आहेत. त्यामुळे या सगळ्या पक्ष प्रवेशात मानसिंगराव नाईक आता उघडपणे अजित पवार यांच्या पक्षात जाणार का याकडे लक्ष लागले आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Embed widget