Sangli Crime : एका वर्षातच संसार फुलण्याआधीच पतीकडून घातपात, आटपाडी तालुक्यातील घटना
आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील नवविवाहिता यशोदा आकाश शिंदे (वय 22) हिचा घातपात करून जीवे मारल्याचा आरोप विवाहितेच्या नातेवाईकांनी केला आहे. याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sangli Crime : आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील नवविवाहिता यशोदा आकाश शिंदे (वय 22) हिचा घातपात करून जीवे मारल्याचा आरोप विवाहितेच्या नातेवाईकांनी केला आहे. याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरसुंडी येथील एका गावातील यशोदा इंगवले व आकाश शिंदे यांचा विवाह एका वर्षांपूर्वी झाला होता.
गुरुवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास यशोदाचा नातेवाईक विक्रमला गावातील एकाने यशोदाने गळफास घेतल्याचे सांगितल्याने विक्रमने तत्काळ आकाशच्या घरी धाव घेत पाहिले असता आकाश यशोदाच्या तोंडावर पाणी मारत होता व तिला फिट आल्याचे सांगत होता.
आकाशने दिलेल्या उत्तराने तिथे कोणत्याही प्रकारचे गळफास घेतल्याचे जाणवले नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. यामुळे आकाशने यशोदाला घातपात करून मारल्याचा संशय व्यक्त केला .आकाश यशोदाकडे दारूसाठी पैसे मागत असल्यानेच तिचा पती आकाश आनंदा शिंदे (वय 24), सासू मंगल आनंदा शिंदे व नणंद ज्योती प्रदीप इंगवले यांनी यशोदाला मारल्याचा आरोप नातेवाईक यांनी केला आहे.
विक्रम व नातेवाईकांनी यशोदाला खरसुंडी व भिवघाट येथे खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेले असता ती उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान,आकाशला दारूचे व्यसन असल्याने तो नेहमी यशोदाला मारहाण व शिवीगाळ करत होता. नातेवाईकांनी आकाशला समजावून सांगितले होते. आकाशने कामासाठी मुबंईला जात असल्याचे सांगत यशोदाला सोबत नेले होते. मुबंईमध्येही यशोदाला मारहाण करत असल्याने नातेवाईकांनी मुलीला माहेरी खरसुंडीला आणले.
आकाश ही काही कालांतराने खरसुंडी येथे मुबंई येथील काम सोडून गावी परतला होता. आकाशने अनेकवेळा सासरी जात यशोदाला सासरी नेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आकाश दारूच्या आहारी गेला असल्याने यशोदाच्या नातेवाईकांनी तिला सासरी पाठवले नव्हते. मात्र, आकाश घरातील कोणीतरी नातेवाईक आजारी आहे असे सांगून यशोदाला सासरी बोलावत होता. मागील चार पाच दिवसांपूर्वीच आजी आजारी असल्याने यशोदाला आकाश आपल्या घरी घेऊन आला होता.
इतर महत्वाच्या बातम्या