एक्स्प्लोर
Advertisement
राजू शेट्टींची आत्मक्लेश यात्रा मुंबईत, माझी शेताच्या बांधावर : खोत
सांगली : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी हे आत्मक्लेश यात्रा घेऊन राजभवनाकडे आणि मी शेतकऱ्यांच्या बांधाकडे जात आहे, असे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले. शिवाय, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार संवेदनशील असल्याचेही खोत यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.
“शेट्टी यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती कार्यकर्त्यांकडून मिळाली. त्यांच्या प्रकृतीला आराम मिळावा अशी प्रार्थना आपण ईश्वराकडे करीत आहोत. खासदार राजू शेट्टी यांच्या मागण्या योग्य असून आपण सरकारमध्ये राहून सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत.”, असेही सदाभाऊ खोत म्हणाले.
“शासनाने न मागणी करता उसाच्या एफआरपीमध्ये टनाला 268 रूपयांनी वाढ केली. यापूर्वीच्या सरकारकडे मागणी करीत असताना आंदोलन हाती घ्यावे लागत होते. यासाठी लाठ्या-काठ्या खाव्या लागल्या. उसाचा खरेदी कर माफ करीत असताना अंदाजपत्रकात 700 कोटींची तरतूद शासनाने केली. शिवाय, उपसा सिंचन योजनेचा वीज दर कमी करण्यात आला.”, अशी माहितीही सदाभाऊंनी एबीपी माझाला दिली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शासन संवेदनशील आहे. शासन घेत असलेल्या निर्णयाबद्दल मी समाधानी आहे, असे सांगायलाही सदाभाऊ विसरले नाहीत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
बातम्या
निवडणूक
Advertisement