एक्स्प्लोर

Bhaskar Jadhav : गॅसचा तुटवडा नाही म्हणता, मग केरोसिन का देता? भास्कर जाधवांचा सवाल

Bhaskar Jadhav On LPG Shortage : सध्याच्या एलपीजी तुडवड्याला नेहरू आणि उद्धव ठाकरे जबाबदार आहेत असं भाजपने अजूनतरी म्हटलं नाही त्याबद्दल त्यांचं धन्यवाद, असा टोला आमदार भास्कर जाधवांनी लगावला. 

रत्नागिरी : एकीकडे देशात आता कोरोनासारखी स्थिती पुन्ही उद्भवू शकते असं स्वतः पंतप्रधान सांगतात, तर दुसरीकडे राज्यात कशाचाही तुटवडा नाही असं मुख्यमंत्री सांगतात. मात्र अनेक ठिकाणचे पेट्रोल पंप बंद आहेत, एलपीजी गॅसचा तुटवडा आहे. सरकारने आता केरोसिन देण्याचंही जाहीर केलं आहे. अफवा पसरवण्यात भाजपचा कुणीच हात धरू शकत नाही अशी टीका ठाकरेंचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केली. नेहरुंमुळे आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळे गॅस, पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या आहेत, असं सांगितलं नाही म्हणून मी भाजपला धन्यवाद देतो असा टोलाही त्यांनी लगावला.

राज्यातील गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्यासंबंधी बोलताना भास्कर जाधव यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जहरी टीका केली. काँग्रेसच्या काळातील साडे तीनशे रुपयांना मिळणारा गॅस आता हजार-बाराशेला मिळतोय, असं असलं तरी भाजपवाले काँग्रेसवर टीका करतात असं जाधव म्हणाले. 

केरोसिन का देता? 

पंतप्रधान स्वत: सांगतात कोविड सारखी स्थिती आहे आणि आपले पुढारी काहीच झालं नाही अशा बढाया मारतात, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. तुमच्याकडे सगळं भरपूर आहे असं सांगता, मग राज्यात बंद असलेले केरोसिन रेशनवर द्यायचा निर्णय का घेतला, असा प्रश्नही त्यांनी विचारला.

अफवा पसरवण्यात भाजपचा कुणीही हात धरू शकत नाही. फक्त आजच्या परिस्थितीला नेहरू आणि उद्धव ठाकरे हे जबाबदार आहेत असा आरोप भाजपने केला नाही, याबद्दल आपण भाजपला धन्यवाद देतो असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला. 

भोंदूगिरीला भाजप जबाबदार

देशातील वाढत्या भोंदूगिरीसाठी भाजप जबाबदार असल्याची टीका भास्कर जाधव यांनी केली. ते म्हणाले की, "2014 पासून देशात अंधश्रद्धेवर लोकांचा खूप विश्वास बसायला लागलाय. भोदूंगिरी, भगतगिरी बाबा आणि साधू सगळे चमत्कार घडवतात असा लोकांचा समज झाला आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रकार देखील सुरू झाला. राजकारणी लोक सुद्धा बाबा-बुवांच्या च्या मागे लागले. भगतगिरी किंवा बाबा बुवा यांच्या माध्यमातूनच सत्तेचा मुकुट घालता येईल असा अनेकांचा समज झाल्याचं दिसतंय. भोंदूबुवांचे पाय धरल्यामुळे राजकारणी लोकांची प्रगती झाली, मग तशी प्रगती होण्यासाठी आम्हाला देखील भोंदूबाबांकडे जायला हवं असा समज काही राजकीय लोकांच्या वागण्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये पसरला आहे. अशोक खरात प्रकरण हा त्यातीलच एक प्रकार आहे."

राजसत्ता आणि धर्मसत्ता हे वेगवेगळी असायला हवं. धर्माचं अवडंबर माजवून ज्या वेळेला राजकारणी राजसत्ता राबवयाला बघतात, त्यावेळी आपला राजधर्म विसरून विवेक नष्ट होतो आणि अघोरी विद्या किंवा बंगाली बाबासारखे प्रकार घडतात, असं भास्कर जाधव म्हणाले. 

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Bollywood Actor Prem Adib Life Stroy: ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', लोक देवघरात फोटो लावून पुजायचे, ओळखलं का कोण?
ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', ओळखलं का कोण?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Bollywood Actor Prem Adib Life Stroy: ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', लोक देवघरात फोटो लावून पुजायचे, ओळखलं का कोण?
ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', ओळखलं का कोण?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
Bhavesh Kaware and Amit Thackeray: भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Embed widget