Uddhav Thackeray in Irshalwadi: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackarey) यांनी इर्शाळवाडीतील (Irshalwadi) दुर्घटनाग्रस्त नागरिकांच्या भेटीसाठी पोहचले. यावेळी त्यांनी इर्शाळवाडीतील नागरिकांना धीर देखील दिला आहे. पुनर्वसन होईपर्यंत तुमच्या पाठिशी आहोत, असं आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी ग्रामस्थांना दिलं. इर्शाळवाडीतील घटना ही सर्व राजकारण्यांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. या परिस्थितीत सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत यावेळी विधापरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि अनिल परब देखील उपस्थित होते. 


यामध्ये कुठेही राजकारण येऊ देणार नाही - उद्धव ठाकरे


उद्धव ठाकरेंनी ग्रामस्थांची संवाद साधताना काळजी घेण्याचं आवाहन देखील केलं आहे. तसेच यामध्ये कुठेही राजकरण येऊ देणार नाही असं आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी ग्रामस्थांना दिलं आहे दिलं आहे. तसेच सर्व राजकारणांनी एकत्र यायला हवं असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. जोपर्यंत तुम्हा सगळ्याचं पुनर्वसन होत नाही, तुमचं आयुष्य मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही सगळे तुमच्या मदतीसाठी आहोत अशी ग्वाही देखील उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. 


'इथल्या लोकांसाठी पंतप्रधान आवास योजना लागू करा'


देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तरी अनेक आदिवासी जमाती अशा पद्धतीचं जीवन जगत आहेत. त्यामुळे आता आदिवासी जमातीला प्रवाहात आणण्याची गरज आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ज्या काही अशा पद्धतीच्या वस्त्या आहेत त्यांच पुनर्वसन व्हायला हवं असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तीन ते चार वस्त्या मिळून एखादं गाव वसवलं पाहिजे असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर यंत्रणांवर ताण येऊ नये यासाठी इर्शाळवाडीत न जाण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या लोकांसाठी पंतप्रधान आवास योजना लागू करा अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर सरकार आले किंवा गेले तरी या योजनेला स्थगिती देऊ नका असं आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. 


'सरकारकडे जाण्यास तयार, मला कोणताही कमीपणा वाटत नाही'


या दु: खाचं निवारण करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत, पण यासाठी तुम्हाला जी काही मदत लागेल ती करण्यासाठी आम्ही तप्तर आहोत असं आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी येथील ग्रामस्थांना केलं आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी इर्शाळवाडीतील ग्रामस्थांचं आणि दरडीच्या दुर्घटनेतून बचावलेल्याचं सांत्वन केलं आहे. सध्याचं क्षेत्र हे दरड प्रवण क्षेत्रात येत असल्याने त्या संदर्भात सरकारसोबत संवाद साधणार असल्याचं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, मी सरकारकडे जायला तयार आहे, यामध्ये मला कोणताही कमीपणा येणार नाही. मी सरकारकडे जनेतेच्या दृष्टीकोनातून पाहतो, असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 


हे ही वाचा :


Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर, शरद पवारानंतर आदित्य ठाकरे भुजबळांच्या मतदारसंघात