Nashik Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून ठाकरे यांच्या उपस्थितीत आज नाशिकमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडणार आहे. दरम्यान छगन भुजबळांच्या येवला मतदारसंघात आदित्य ठाकरेंची सभा देखील होणार आहे. भुजबळांच्या येवला या मतदारसंघांमध्ये आधी शरद पवारांची सभा पार पडली आहे. आता पुन्हा एकदा आदित्य ठाकरे हे नाशिकमध्ये येणार असून येवल्यामध्ये त्यांची आज सभा होणार आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी येवल्यात जाऊन भुजबळ (Chhagan Bhujbal) विरोधात दंड थोपटल्यानंतर आता शिवसेनेच्या (Shivsena) उद्धव ठाकरे गटाचे नेते व युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे हे देखील येवल्यात जाऊन भुजबळांविरोधात दंड थोपटणार असल्याचे चित्र आहे. राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष देखील सक्रिय झाले आहे. सत्ताधारी पक्षाकडून शासन आपल्या दारी उपक्रम राबवला जात असताना विरोधी पक्षातील प्रमुख घटक असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मतदारसंघ पिंजून काढण्याची भूमिका घेतली आहे. त्याच अनुषंगाने आदित्य ठाकरे आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. 


शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे हे आज नाशिक दौऱ्यावर येत असून आज दिवसभर ते नाशिक जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात ते कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या सभेनंतर आदित्य ठाकरे हे येवला दौऱ्यावर जात आहेत. तत्पूर्वी आदित्य ठाकरे हे नाशिक मध्ये देखील कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार असून त्यानंतर ते येवल्याकडे रवाना होणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना कार्यालयात युवा सेनेचा मेळावा होईल, त्यानंतर येवल्यात त्यांची सभा होणार आहे.


ठाकरे यांचा दौरा कसा असणार?


आदित्य ठाकरे हे आज नाशिकमध्ये साडेदहा वाजेपर्यंत पोहोचतील. सुरुवातीलाच ते शिवसेनेच्या नेत्या निर्मला गावित यांच्या घरी सांत्वन पर भेट देणार आहेत. निर्मला गावित यांचे चिरंजीव हर्षल गावित यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे हे गावित कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेणार आहेत. त्यानंतर आदित्य ठाकरे हे शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत. सातपूर येथील डेमोक्रसी हॉल येथे हा मेळावा पार पडणार आहे. त्यानंतर त्यानंतर आदित्य ठाकरे हे येवल्याकडे रवाना होणार आहेत. येवला शहरात देखील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला असून ते कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Aaditya Thackeray on Irshalwadi : आदित्य ठाकरे इर्शाळगडाच्या पायथ्याशी,घटनेवर दिली पहिली प्रतिक्रिया