एक्स्प्लोर

BJP Challenge To Sunil Tatkare In Raigad : आधी गीतेंना पाडलं आता सुनील तटकरेंचा कडेलोट करणार; रायगडमध्ये भाजप नेत्यांचे आव्हान

Sunil Tatkare : भाजपाने गेली महिनाभरापासून जोरदार तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात भाजपचे मेळावे सुरू असून थेट तटकरे यांनाच टीकेचे लक्ष्य करण्यात येत आहे

BJP Claim Sunil Tatkare Raigad Seat : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील वातावरणात राजकीय वातावरण तापत  पहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे (NCP Ajit Pawar) असलेल्या रायगड लोकसभा मतदारसंघावर भाजपने (BJP) दावा केला आहे. भाजपने श्रीवर्धन (Shrivardhan) येथे सभा घेत सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना थेट आव्हान दिले आहे. शिवसेनेच्या (Shiv Sena UBT) अनंत गीते (Anant Geete) यांच्यानंतर आता  सुनील तटकरे यांचा रायगडावरून कडेलोट करून ही लोकसभा जिंकणार असल्याचे आव्हान भाजपच्या स्थानिक नेत्यांनी दिले आहे. 

भाजपाने गेली महिनाभरापासून जोरदार तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात भाजपचे मेळावे सुरू असून थेट तटकरे यांनाच टीकेचे लक्ष्य करण्यात येत आहे. मंत्री आदिती तटकरे विधानसभेसाठी निवडून आलेल्या श्रीवर्धनमध्ये भाजपने दोन मेळावे घेऊन जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या मेळाव्यांमध्ये  सुनील तटकरे यांच्यावर सडकून टीका करण्यात आली. 

मागच्या टर्ममध्ये गीते आता तटकरे... 

भाजपचे श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी मेळाव्यात बोलताना सुनील तटकरे यांना थेट आव्हान दिले. त्यांनी म्हटले की, मागील वर्षी अनंत गीते यांचा कडेलोट केला. यंदा सुनील तटकरे यांचा कडेलोट करणार, तुम्ही महायुतीतसहभागी झालात ही युती वरिष्ठ पातळीवर मान्य असेल पण आम्ही मानत नाही असेही त्यांनी म्हटले. त्यामुळे रायगडमध्ये भाजपचाच खासदार आणणार असे थेट आव्हान भाजपचे श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी तटकरेंना दिले आहे.  

जागा वाटप जाहीर होण्याआधीच महायुतीमध्ये स्थानिक पातळीवर वादाच्या ठिणग्या पडू लागल्या आहेत. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि इतर घटक पक्षांचा समावेश आहे. त्याच्या परिणामी जागा वाटप करतानाही महायुतीच्या नेत्यांचा कस लागणार आहे. 

शिवसेनेचा खासदार भाजपने पाडल्याची कबुली?

भाजपसोबत 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीनंतर फारकत घेतली होती. त्यावेळी शिवसेनेच्या नेत्यांकडून भाजप शिवसेना संपवत असल्याचा आरोप करण्यात आला होता. विधानसभेच्या शिवसेनेच्या काही जागा भाजपमुळे पडल्या असल्याचा आरोप करण्यात आला होता. आता रायगड लोकसभा निवडणुकीत अनंत गीते यांना पराभूत करण्यात भूमिका बजावली असल्याचे वक्तव्य  भाजपच्या स्थानिक नेत्याने केल्याने चर्चांना उधाण आले आहे. 

 इतर महत्त्वाच्या बातम्या :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मिस्टर फडणवीस तुझा बिस्तरा गुंडाळल्याशिवाय आम्ही राहणार नाही; कडूंच्या आंदोलनात महादेव जानकर कडाडले
मिस्टर फडणवीस तुझा बिस्तरा गुंडाळल्याशिवाय आम्ही राहणार नाही; कडूंच्या आंदोलनात महादेव जानकर कडाडले
महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणात बजरंग सोनवणेंची एन्ट्री; पीडित कुटुंबीयांची भेट, चाकणकरांसह मुंडे बंधू-भगिनींवर हल्लाबोल
महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणात बजरंग सोनवणेंची एन्ट्री; पीडित कुटुंबीयांची भेट, चाकणकरांसह मुंडे बंधू-भगिनींवर हल्लाबोल
राज ठाकऱ्या तुझ्यात दम असेल तर चुनाव रोक के दिखाव; विरोधकांच्या मोर्चावरुन गुणरत्न सदावर्ते आक्रमक
राज ठाकऱ्या तुझ्यात दम असेल तर चुनाव रोक के दिखाव; विरोधकांच्या मोर्चावरुन गुणरत्न सदावर्ते आक्रमक
मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत VVPAT वापराची कायद्यांत तरतूद नाही; आयोगाने स्पष्टच सांगितलं
मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत VVPAT वापराची कायद्यांत तरतूद नाही; आयोगाने स्पष्टच सांगितलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour : 'खापरी परिसरात सरकारकडून चर्चेसाठी शिष्टमंडळ दाखल,पोलिसांचा चोख बंदोबस्त
Zero Hour : 'आंदोलन थांबणार नाही, वाटल्यास तुरुंग भरली तरी चालतील', Bachchu Kadu यांचा इशारा
Farmers' Protest: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ठाम, Bachchu Kadu यांचा सरकारला थेट इशारा
Phaltan Case: डॉक्टरने जीवन संपवलं की हत्या?', अंधारेंची Rupali Chakankar यांच्या राजीनाम्याची मागणी
Nagpur Farmers Protest : बच्चू कडूंचा महाएल्गार, आंदोलनावर ठाम, सरकारसमोर पेच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मिस्टर फडणवीस तुझा बिस्तरा गुंडाळल्याशिवाय आम्ही राहणार नाही; कडूंच्या आंदोलनात महादेव जानकर कडाडले
मिस्टर फडणवीस तुझा बिस्तरा गुंडाळल्याशिवाय आम्ही राहणार नाही; कडूंच्या आंदोलनात महादेव जानकर कडाडले
महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणात बजरंग सोनवणेंची एन्ट्री; पीडित कुटुंबीयांची भेट, चाकणकरांसह मुंडे बंधू-भगिनींवर हल्लाबोल
महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणात बजरंग सोनवणेंची एन्ट्री; पीडित कुटुंबीयांची भेट, चाकणकरांसह मुंडे बंधू-भगिनींवर हल्लाबोल
राज ठाकऱ्या तुझ्यात दम असेल तर चुनाव रोक के दिखाव; विरोधकांच्या मोर्चावरुन गुणरत्न सदावर्ते आक्रमक
राज ठाकऱ्या तुझ्यात दम असेल तर चुनाव रोक के दिखाव; विरोधकांच्या मोर्चावरुन गुणरत्न सदावर्ते आक्रमक
मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत VVPAT वापराची कायद्यांत तरतूद नाही; आयोगाने स्पष्टच सांगितलं
मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत VVPAT वापराची कायद्यांत तरतूद नाही; आयोगाने स्पष्टच सांगितलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑक्टोबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑक्टोबर 2025 | बुधवार
देवेंद्र फडणवीस हे चोरी करुन मुख्यमंत्री झालेत, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल, म्हणाले, शेतकऱ्यांच्या असंतोषाचा अंत पाहू नये
देवेंद्र फडणवीस हे चोरी करुन मुख्यमंत्री झालेत, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल, म्हणाले, शेतकऱ्यांच्या असंतोषाचा अंत पाहू नये
मुंबईतील हिवाळ्यातील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची संयुक्त बैठक
मुंबई महानगरपालिका आणि एमपीसीबी यांच्या संयुक्त उपस्थितीत वायू प्रदूषण नियंत्रणावर उच्चस्तरीय आढावा बैठक
Bacchu Kadu : बच्चू कडू आणि आंदोलकांनी ठिय्या आंदोलन स्थळावरुन बाजूला व्हावं, नागपूर खंडपीठाचे आदेश, बच्चू कडू म्हणतात लोकन्यायालयाचंही ऐकणार...
नागपूर खंडपीठाचे ठिय्या आंदोलन स्थळ सोडण्याचे आदेश, बच्चू कडूंची प्रतिक्रिया समोर, म्हणाले...
Embed widget