Raigad Rain: रायगड जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर, अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळे जिल्हा प्रशासनाचा निर्णय
रायगड जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. गेल्या चार दिवसापासून रायगडला अक्षरशः पावसाने झोडपलेला आहे.
रायगड : मुंबई, पुण्यासह राज्यभर पाच दिवस (Maharashtra Rain) मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. राज्यभरात आज पावसाने धुमाकूळ घातलाय. रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आज (19 जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. डॉ. योगेश म्हसे यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे.
रायगड जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. गेल्या चार दिवसापासून रायगडला अक्षरशः पावसाने झोडपलेला आहे. तसेच विविध भागांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटना समोर येत आहेत. रायगड जिल्ह्यातील चारही नद्यांनी देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे. रायगड जिल्ह्यातील महाड भोईघाट येथील सावित्री नदी मही कावती मंदिर येथील सावित्रीचे पात्र भरले असून या घाटाला पाणी लागले आहे. तर रोहा मधील नागोठणे येथील बंधाऱ्यावरील अंबा नदी सध्या इशारा पातळीवर वाहते रोहे मधील शहरातून वाहणारी डोहवाल बंधारा येथील कुंडलिका नदी ही सध्या इशारा पातळीवर वाहत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून रायगड जिल्हा प्रशासनाने आज जिल्ह्यातील सर्व शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी हा निर्णय घेतला.
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे.
— Raigad District Collector (@CollectorRaigad) July 19, 2023
रायगड प्रशासन ndrf अलर्ट मोडवर
रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील पाताळगंगा ही नदी इशारा पातळीवर वाहत असल्याने या चारही नदी काठच्या लोकांना प्रशासनाने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. तर रायगड प्रशासन ndrf अलर्ट मोडवर सध्या आल्याचे चित्र पाहायला मिळते.
सावित्री नदीचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत
महाडमधील सावित्री नदी सध्या ओसांडून वाहत असून सध्या नदीची पाणी पातळी पावणे सात मीटरवर वाहते. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे तर महाड मधल्या काही सखल भागात सावित्रीचे पाणी शिरल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
चिपळूण शहरातील नद्यांनी धोक्याती पातळी ओलांडली
चिपळूण शहरातील वाहणारे वशिष्ठी नदीचे पाणी नदी पात्र बाहेर येऊन काही सखल भागामध्ये शिरले आहे. त्यामुळे तेथील जीवन विस्कळीत झालेला आहे.चिपळूण दोन दिवस पावसाने चांगलाच जोर धरला आहे.त्यामुळे वाशिष्टी नदीचे पात्र भरून ओसंडून वाहत आहे.या नदीपत्राचे पाणी चिपळूणच्या काही सकल भागामध्ये शिरले आहे.त्यामुळे तेथील प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. तर तालुक्यातील शिरगाव मधीलनदी वशिष्ठीला मिळणारी नदी सुद्धा सध्या ओसांडून वाहत आहे.ही चिपळूण-कराड रस्त्याच्या बाजूला असल्याने तेथील पाणी रस्त्यावर आल्यामुळे तेथील वाहतूक काही काळ ठप्प झाली आहे..