एक्स्प्लोर

भिडेंसारख्या वाचाळवीरांना सत्ताधाऱ्यांनी लगाम लावावा, आव्हाडांचा हल्लाबोल, म्हणाले, शिवराज्याभिषेक उत्सव बंद करणं तुम्हाला सात जन्मात शक्य नाही

रायगडावर (Raigad) साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा 6 जून रोजी साजरा करण्याची पद्धत बंद करून हा सोहळा तिथीनुसार साजरा करावा, असं वक्तव्य संभाजी भिडेंनी केलं होतं. यावर जितेंद्र आव्हाडांनी टीका केली.

Jitendra Awhad on Sambhaji Bhide : दरवर्षी 6 जून रोजी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा (Shivrajyabhishek Sohala) मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. तसेच या सोहळ्याला हजारो शिवप्रेमी उपस्थित राहताता. मात्र रायगडावर (Raigad) साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा 6 जून रोजी साजरा करण्याची पद्धत बंद करून हा सोहळा तिथीनुसार साजरा करावा, असं वक्तव्य संभाजी भिडे (Sambhaji Bhide)  यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्त्वायनंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भिडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 

नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

आपलं वय झालं म्हणून आपण काहीही बरळत बसू नये. आपल्या तोंडावर थोडा तरी लागाम लावला पाहिजे, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी संभाजी भिडे यांच्यावर जोरदार टीका केली.   शिवराज्याभिषेक उत्सव बंद करणे तुमच्या सात जन्मात तरी तुम्हाला शक्य नाही. जोपर्यंत सूर्य चंद्र तारे राहतील तोपर्यंत रायगडावर 6 जूनला शिवरायांना मानवंदना आणि तोफेची सलामी दिली जाईल असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. भिडेंसारख्या वाचाळ वीरांना सत्ताधाऱ्यांनी लगाम लावावा. अन्यथा महाराष्ट्राचा अपमान आम्ही कदापी सहन करणार नाही. भेटू किल्ले रायगडावर... जय शिवराय असे ट्वीट करत जितेंद्र आव्हाड यांनी संभाजी भिडे यांच्यावर टीका केली आहे. 

नेमकं काय म्हणाले होते संभाजी भिडे?

रायगडावरील 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बरखास्त करायला पाहिजे,  शिवराज्याभिषेक सोहळ्याचा राजकारणासाठी वापर होत असल्याचे संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.  संभाजी यांनी कोल्हापुरात बोलताना शिवराज्यभिषेकावर भाष्य केले. संभाजी भिडे म्हणाले की, तिथीप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व कार्यक्रम पार पडले पाहिजेत. दरम्यान, भिडे यांनी वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावरूनही भाष्य केलं आहे. रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढायला नको, असे विधान भिडे यांनी केले. या कुत्र्याचं राजकारण करू नये, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, इतिहास संशोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत भिडे यांनी वाघ्या कुत्र्याबद्दल जे इतिहास संशोधक बोलतात ते कोणत्या उंचीचे आहेत? अशी विचारणा केली. याबाबत एक स्वतंत्र इतिहास संशोधक मंडळ स्थापन करून त्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी भिडे यांनी केली. 

महत्वाच्या बातम्या:

सहा जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा नामशेष केला पाहिजे, रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढायला नको : संभाजी भिडे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raigad News: लाडकी बहिणच्या सर्व्हेला आलेला विद्यार्थी बुडाला; कर्जतमधील पळसदरी डॅमजवळ काय घडलं?
लाडकी बहिणच्या सर्व्हेला आलेला विद्यार्थी बुडाला; कर्जतमधील पळसदरी डॅमजवळ काय घडलं?
Raigad Crime news: माणगावच्या लॉजवरील तरुणीच्या मृतदेहाबाबत धक्कादायक खुलासा; प्रेमप्रकरण अन्...; आरोपीला नवी मुंबईतून बेड्या
माणगावच्या लॉजवरील तरुणीच्या मृतदेहाबाबत धक्कादायक खुलासा; प्रेमप्रकरण अन्...; आरोपीला नवी मुंबईतून बेड्या
Maharashtra Weather Updates मोठी बातमी: पुढील 3 तासांत मुंबईसह ठाणे, पालघर रायगडमध्ये पावसाचा इशारा; मंत्रालयाकडून सतर्कतेचा इशारा
मोठी बातमी: पुढील 3 तासांत मुंबईसह ठाणे, पालघर रायगडमध्ये पावसाचा इशारा; मंत्रालयाकडून सतर्कतेचा इशारा
ऑनलाईन जुगारात तरुण कर्जबाजारी! चोरी करुन कर्ज फेडण्याचा प्रकार उघड, रायगड पोलिसांची कारवाई 
ऑनलाईन जुगारात तरुण कर्जबाजारी! चोरी करुन कर्ज फेडण्याचा प्रकार उघड, रायगड पोलिसांची कारवाई 

व्हिडीओ

Beed Walmik Karad News Audio Clip : वाल्मिक कराड गँगची तुरुंगात पुन्हा दहशत?
Amol Mitkari On Murlidhar Mohol :ब्लॅक बॉक्स कुठे? विमानाचा CCTV कुठे? मोहोळांनी माफी मागावी-मिटकरी
Nashik TCS Case : निर्लज्जपणाचा कहर नराधमांच्या हाती पदर Special Report
Sanjay Dutt Movie : काँग्रेसच्या भुमिकेमुळे संजय दत्तच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह Special Report
Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या वाट्याला 6 जागा, इच्छूकांची फिल्डिंग, ही 12 नावं रेसमध्ये, कोणाला उमेदवारी मिळणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Madha Clash : ओळखपत्र मागितल्याने उत्पादन शुल्क अधिकारी चिडले, धाबेवाल्याला मारहाण; नंतर ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना चांगलंच चोपलं
ओळखपत्र मागितल्याने उत्पादन शुल्क अधिकारी चिडले, धाबेवाल्याला मारहाण; नंतर ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना चांगलंच चोपलं
धक्कादायक! बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षीय मुलगा ठार, मित्रांसोबत आंबे पाडायला गेलेल्या कृष्णावर वन्यजीवाचा हल्ला
धक्कादायक! बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षीय मुलगा ठार, मित्रांसोबत आंबे पाडायला गेलेल्या कृष्णावर वन्यजीवाचा हल्ला
Video:आयपीएलमध्ये 'स्मोकिंग बॉम्ब'चा स्फोट; रबाडा धूर काढत असल्याचा व्हिडिओ व्हायरल? गुजरात टायटन्सवर प्रश्नचिन्ह
Video:आयपीएलमध्ये 'स्मोकिंग बॉम्ब'चा स्फोट; रबाडा धूर काढत असल्याचा व्हिडिओ व्हायरल? गुजरात टायटन्सवर प्रश्नचिन्ह
Pune Rain Hailstorm पुण्यात टपोऱ्या गारांचा पाऊस, हाती बर्फ घेण्याची धडपड; उकाड्यामुळे त्रस्त पुणेकरांना दिलासा
Pune Rain Hailstorm पुण्यात टपोऱ्या गारांचा पाऊस, हाती बर्फ घेण्याची धडपड; उकाड्यामुळे त्रस्त पुणेकरांना दिलासा
Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात पुढील चार दिवस पावसाचे, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याला यलो अलर्ट; पुणे आणि साताऱ्यात गारपीट
राज्यात पुढील चार दिवस पावसाचे, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याला यलो अलर्ट; पुणे आणि साताऱ्यात गारपीट
Kalpana kharat bail reject मोठी बातमी! कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन फेटाळला; भोंदू अशोक खरातच्या पत्नीला अटक होणारच
मोठी बातमी! कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन फेटाळला; भोंदू अशोक खरातच्या पत्नीला अटक होणारच
IPL 2026 : आयपीएलमध्ये गुणतालिकेत पंजाब किंग्ज टॉपवर, सर्वाधिक षटकार कोणत्या टीमच्या नावावर? जाणून घ्या यादी
आयपीएलमध्ये गुणतालिकेत पंजाब किंग्ज टॉपवर, सर्वाधिक षटकार कोणत्या टीमच्या नावावर? जाणून घ्या यादी
हिरे, दागिने, प्रायव्हेट जेट, 52 लाखांचा अरबी घोडा ते आलिशान गिफ्ट दिल्या त्याच जॅकलिन फर्नांडिसचा आता सुकेशविरोधात एल्गार! कोर्टात अर्ज देताच सुकेशच्या चिट्टीतील फक्त 7 शब्दांनी लक्ष वेधलं!
हिरे, दागिने, प्रायव्हेट जेट, 52 लाखांचा अरबी घोडा ते आलिशान गिफ्ट दिल्या त्याच जॅकलिन फर्नांडिसचा आता सुकेशविरोधात एल्गार! कोर्टात अर्ज देताच सुकेशच्या चिट्टीतील फक्त 7 शब्दांनी लक्ष वेधलं!
Embed widget