पोलीस अधिकारी सांगून कंपनीची फसवणूक, 20 लाखांचा गंडा, नेमका कसा घडला प्रकार?
नार्कोटिक्स विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सांगून कंपनीला लाखो रुपयांचा गंडा (Fraud of the company of lakhs of rupees) घातल्याचा धक्कादायक प्रकार रायगड (Raigad) जिल्ह्यातील खोपोली तालुक्यात घडला आहे.
Raigad Crime News : नार्कोटिक्स विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सांगून कंपनीला लाखो रुपयांचा गंडा (Fraud of the company of lakhs of rupees) घातल्याचा धक्कादायक प्रकार रायगड (Raigad) जिल्ह्यातील खोपोली तालुक्यात घडला आहे. या घटनेतील टोळीतील सहा आरोपींना रायगड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यामध्ये गुजरातच्या (Gujarat) अनेक भागातून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
नेमकी कशी झाली फसवणूक?
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, खोपोली तालुक्यातील मुळगाव इथल्या इनोव्हासिंथ टेक्नॉलॉजी इंडीया लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकांना अज्ञात व्यक्तींकडून काल सकाळी एक कॉल आला होता. यामध्ये त्यांच्या कुरियरने येणाऱ्या मालामध्ये काही एलएसडी या अमली पदार्थांच्या 70 स्ट्रिप्स मिळाल्या आहेत. यामध्ये झालेल्या आर्थिक व्यवहारात आपल्या कंपनीचा देखील बँक डिटेल्स आहेत, असा दावा करुन या कंपनीकडून तब्बल 19 लाख 89 हजार 55 रुपये इतकी रक्कम आपल्या बँक खात्यात वळवून घेतल्याचा प्रकार घडला. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे जेव्हा कंपनीच्या लक्षात आले, त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.
आरोपींकडून तब्बल 9 लाख 97 हजार आणि 16 मोबाइल सेल फोन जप्त
दरम्यान, या घटनेप्रकरणी, रायगड पोलिसांकडून पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या नेतृत्वाखाली या घटनेचा शोध लावण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण 6 आरोपी असल्याचं निदर्शनात आल्यानंतर या आरोपींना सुरत, गांधीनगर, अहमदाबाद येथून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल 9 लाख 97 हजार आणि 16 मोबाइल सेल फोन जप्त करण्यात आले आहे.
कंपनीच्या फसवणूक प्रकरणी अधिकचा तपास अद्याप सुरु
दरम्यान, या कंपनीच्या फसवणूक प्रकरणीचा अधिकचा तपासही अद्याप सुरु आहे. यामध्ये आणखी काही माहिती मिळतेय का? याचा तपास पोलिस अधिकारी करत आहेत. कारण, अटक करण्यात आलेले आरोपी हे बाहरेच्या राज्यातून म्हणजे गुजरातमधून अटक केले आहेत. यामध्ये सुरत, गांधीनगर, अहमदाबाद या शहरांचा समावेश आहे. त्यामुळं या घटनेशी संबधीत गुजरात राज्यात काही धागेदोरे हाती लागतात का? याचा देखील तपास पोलिस अधिकारी करत आहेत. दरम्यान, सध्या खपोली पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात घेतलं आहे. तसेच या सर्वांकडे असणारा मुद्देमाल देखील जप्त केला आहे. तसेच आरोपींकडे असणारे सर्व फोन जप्त करण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
भुरट्या चोराने दोस्तांना दारुच्या पार्ट्या दिल्या, पोलिसांना टीप लागताच चक्रं फिरली, नागपुरातील पुरुषोत्तम पुट्टेवार मृत्यू प्रकरणाचं बिंग कसं फुटलं?