एक्स्प्लोर

20 लाखाचं कर्ज घेऊन पॉलीहाऊस उभारलं, वर्षभरात 45 लाख कमावलं!

रायगडच्या सुमितची पिळदार बॉडी आहे. बॉडी बिल्डिंगच्या अनेक स्पर्धा त्याने गाजवल्या आहेत. या स्पर्धा गाजवतानाच, त्याने शेतीतही नियोजनबद्ध पीक घेऊन, लाखो रुपये कमावले आहेत.

रायगड:  तरुणांमध्ये बॉडीबिल्डिंगचं मोठं फॅड आहे. जिममध्ये जाऊन पिळदार शरीरयष्टी बनवण्याकडे बहुतेकांचा कल असतो. मात्र बॉडीबिल्डिंगमध्ये सुवर्ण पदक मिळवलेला तरुणानं थेट शेतीचा मार्ग धरला आहे. रायगडच्या सुमित थळे या तरुण शेतकऱ्यानं पॉलीहाऊसमध्ये शिमला मिरचीची लागवड केली. शेतीचं अभ्यासपूर्ण नियोजन करुन, या तरुणानं इथेही सोनं कमावलं आहे. 27 वर्षीय सुमितने 20 गुंठे जागेत लाल आणि हिरव्या शिमला मिरचीची लागवड केली. काटेकोर नियोजनातून त्याला वर्षाला 30 टन मिरचीतून 45 लाख रुपयांचं उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. बॉडीबिल्डिंग ते कसदार शेती उरण तालुक्यातील मुळेखंड येथे राहणारा सुमित थळे हा पदवीधर आहे. गेल्या चार वर्षांपासून तो बॉडीबिल्डिंग करीत आहे. त्याने मुंबई आणि ठाणे येथील बॉडीबिल्डिंग स्पर्धेत पदकं मिळविली आहेत. सुमितने 2017 मध्ये ठाणे नवदीप बॉडीबिल्डिंग स्पर्धेच्या 75 किलो गटात, तर 2016 मध्ये मुंबई नवदीप बॉडीबिल्डिंग स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं आहे. एकीकडे बॉडीबिल्डिंग करत असताना, सुमितने शेतीकडे व्यावसायिक दृष्टीने पाहिले. 20 गुंठ्यात पॉलीहाऊस सुमितने 20 गुंठे जागेत पॉलीहाऊस उभारले. त्यामध्ये त्याने लाल आणि हिरव्या शिमला मिरचीची लागवड केली. यासाठी त्याने मामाची भातशेतीची जमीन भाडेतत्वावर घेत, राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि बँकेकडून कर्ज घेतले. पॉलीहाऊसच्या उभारणीसाठी सुमितला सुमारे 20 लाख रुपयांचा खर्च आला.  20 गुंठे जागेमध्ये त्याने सुमारे 6 हजार रोपांची लागवड केली. पॉलीहाऊसमध्ये लावण्यात आलेल्या शिमला मिरचीमधून पुढच्या 45 दिवसात उत्पादनाला सुरुवात होण्याची अपेक्षा आहे. यासाठी त्याने एक मिटर रुंदीचे वाफे तयार केले असून, झिगझॅग पद्धतीने रोपांची लागवड केली आहे. तर, शिमला मिरचीसाठी आवश्यक असलेले 30 अंश सेल्सिअस तापमान राखण्यासाठी, सुमितने या पॉलीहाऊसमध्ये 'फॉगर' लावले आहेत. तसंच ठिबक सिंचन पद्धतीने पाण्याचे नियोजन केले आहे. पॉलीहाऊसमध्ये लावण्यात आलेल्या शिमला मिरचीला दिवसातून दोन वेळा पाणी देण्यात येते. सुमितने केलेल्या या धाडसामुळे शिमला मिरचीच्या या उत्पादनातून, येत्या वर्षभरात त्याला किमान 40 ते 45 लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. यासाठी त्याला घाऊक बाजारात एक टनाला 150 रुपयांचा दर मिळणे अपेक्षित आहे. पॉलीहाऊसच्या उभारणीसाठी सुमितला राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून 8 लाख 97 हजार 120 रुपयांचे अनुदान मिळाले. त्याने बँक ऑफ महाराष्ट्रमधून 19 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. मात्र सुमितने केलेले कष्ट, नवा प्रयोग करण्याचं धाडस आणि त्यातून आलेलं दमदार पीक, यामुळे सुमितला कर्ज फेडण्यास आता फारसं अवघड नाही. त्यामुळे, सुमितसारख्या तरुणांनी आधुनिक शेतीकडे व्यावसायिक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. VIDEO:

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक
SIR Mumbai Crime: घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...
घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...
Anuradha Paudwal on Personal Life: 25 दिवसांत चिमुकलीचा मृत्यू, तरुण मुलालाही गमावलं; अनुराधा पौडवाल यांच्या आयुष्यात दु:खाचे वादळ
25 दिवसांत चिमुकलीचा मृत्यू, तरुण मुलालाही गमावलं; अनुराधा पौडवाल यांच्या आयुष्यात दु:खाचे वादळ
TET Exam Paper Leak: 8 हजारांत बाहेर पडलेला पेपर 80 हजारांत विकला गेला; कशी मिळाली पहिली टिप? कसा उलगडला संपूर्ण कट, मोठा प्लॅन आला समोर
8 हजारांत बाहेर पडलेला पेपर 80 हजारांत विकला गेला; कशी मिळाली पहिली टिप? कसा उलगडला संपूर्ण कट, मोठा प्लॅन आला समोर

व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TET Exam Paper Leak: 8 हजारांत बाहेर पडलेला पेपर 80 हजारांत विकला गेला; कशी मिळाली पहिली टिप? कसा उलगडला संपूर्ण कट, मोठा प्लॅन आला समोर
8 हजारांत बाहेर पडलेला पेपर 80 हजारांत विकला गेला; कशी मिळाली पहिली टिप? कसा उलगडला संपूर्ण कट, मोठा प्लॅन आला समोर
Pune ATS Raid: पाकिस्तानी गँगस्टर भट्टीच्या संपर्कातील संशयितांवर ATSची कारवाई; पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात धाडसत्र, 45 जणांना उचललं
पाकिस्तानी गँगस्टर भट्टीच्या संपर्कातील संशयितांवर ATSची कारवाई; पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात धाडसत्र, 45 जणांना उचललं
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात घसरण तर चांदीच्या दरात तेजी, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात घसरण तर चांदीच्या दरात तेजी, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पुण्यात दरोडा टाकण्याची तयारी, आंतरराज्यीय दरोडेखोरांचे टोळीला बेड्या; अहिल्यानगरमधून बोलेरो चोरुन ओतुरला आले
पुण्यात दरोडा टाकण्याची तयारी, आंतरराज्यीय दरोडेखोरांचे टोळीला बेड्या; अहिल्यानगरमधून बोलेरो चोरुन ओतुरला आले
NCP Pune Mahangarpalika: मोठी बातमी: पुणे महानगरपालिकेत अजितदादांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार? उपमहापौरपदाची मागणी, संजय काकडे सुनेत्रा पवारांना भेटणार
पुणे महानगरपालिकेत अजितदादांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार? उपमहापौरपदाची मागणी, संजय काकडे सुनेत्रा पवारांना भेटणार
Pune Water Cut: वारीनंतर पुन्हा पाणीकपात; १५ जुलैपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा, भविष्यात पाण्याची टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय
वारीनंतर पुन्हा पाणीकपात; १५ जुलैपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा, भविष्यात पाण्याची टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय
एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर कॅबिनेट मंत्र्यांची बैठक; मंत्रिमंडळ विस्तारात खांदेपालट होणार, नव्या चेहऱ्यांना संधी?
एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर कॅबिनेट मंत्र्यांची बैठक; मंत्रिमंडळ विस्तारात खांदेपालट होणार, नव्या चेहऱ्यांना संधी?
Mahesh Babu Nephew Siddharth Galla Engagement: साऊथ सुपरस्टार महेश बाबूची कोरियन सूनबाई, कुटुंबात आनंदोत्सव, मराठमोळ्या बायकोनं शेअर केलेत PHOTOs
साऊथ सुपरस्टार महेश बाबूची कोरियन सूनबाई, कुटुंबात आनंदोत्सव, मराठमोळ्या बायकोनं शेअर केलेत PHOTOs
Embed widget