एक्स्प्लोर

Pune Jilhaparishad: जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; कोणत्या गावात कुठे होणार कार्यक्रम?

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी सोडत कार्यक्रम 13 जुलै रोजी होणार आहे.

Pune Jilhaparishad: जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्यासाठी आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी सोडत कार्यक्रम 13 जुलै रोजी होणार आहे.  

सोडत कार्यक्रमानंतर 15 जुलै रोजी निवडणूक विभाग, निर्वाचक गणनिहाय आरक्षणाची प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. या आरक्षणाबाबत 15 जुलै ते  21 जुलै 2022 पर्यंत हरकती तसेच सूचना सादर करता येणार आहेत. 2 ऑगस्ट रोजी राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या निवडणूक विभाग, निर्वाचक गणाचे अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे.

आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्धीनंतर 15 ते 21 जुलै या कालावधीत पुणे जिल्हा परिषद निवडणुक विभागाच्या व पंचायत समिती निर्वाचक गणाच्या आरक्षणावरील हरकती व सूचना ग्रामपंचायत शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे, बी विंग, तिसरा मजला,  तसंच संबंधित तहसिल कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत स्विकारण्यात  येणार आहेत, असे जिल्हा परिषद व पंचायत समिती जिल्हा नोडल अधिकारी संजय तेली यांनी कळविले आहे.

पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट व गणाचे आरक्षण सोडत कार्यक्रम 13 जुलै रोजी सकाळी 11वाजता नमूद ठिकाणी होणार आहे.

  • पुणे जिल्हा परिषद- मा. श्री. शरदचंद्रजी पवार सभागृह, पहिला मजला, पुणे जिल्हा
    परिषद, पुणे (नविन इमारत) कॅम्प, पुणे
  • जुन्नर पंचायत समिती- जिजामाता सभागृह (पंचायत समिती आवार) जुन्नर 
  • आंबेगांव पंचायत समिती- तहसिल कार्यालय आंबेगाव, पहिला मजला, मिटींग हॉल,  आंबेगांव
  • शिरुर पंचायत समिती -तहसिल कार्यालय शिरुर, नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, सभागृह क्र. १ शिरूर
  • खेड पंचायत समिती -चंद्रमा गार्डन मंगल कार्यालय, बाडा रोड, राजगुरुनगर, ता. खेड
  • मावळ पंचायत समिती -भेगडे लॉन, जुना पुणे-मुंबई रस्ता, वडगाव, ता. मावळ
  • मुळशी पंचायत समिती-सेनापती बापट सभागृह, पंचायत समिती मुळशी (पौड), ता. मुळशी
  •  हवेली पंचायत समिती - जुनी जिल्हा परिषद, महात्मा गांधी सभागृह, पंचायत समिती हवेली
  • दौंड पंचायत समिती -नवीन प्रशासकीय इमारत तहसिल कार्यालय दौंड, दुसरा मजला सभागृह, दौंड
  • पुरंदर पंचायत समिती -पंचायत समिती पुरंदर येथील श्री. छत्रपती संभाजी महाराज सभागृह, सासवड, ता. पुरंदर
  • वेल्हे पंचायत समिती-पंचायत समिती कार्यालय येथील नविन सभागृह , ता. वेल्हे
  • भोर पंचायत समिती-अभिजित भवन मंगल कार्यालय महाड नाका, संजय नगर, ता. भोर
  • बारामती पंचायत समिती- कविवर्य मोरोपंत नाटय मंदीर, इंदापूर रिंग रोड, नवीन प्रशासकीय भवन समोर, बारामती
  • इंदापूर पंचायत समिती-लोकनेते शंकरराव पाटील सभागृह, पंचायत समिती इंदापुर
शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Water Storage Of All Maharashtra Dam: राज्यातील सर्व प्रमुख धरणं तुडुंब भरली, मोठ्या शहरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; राज्यातील धरणांमधील पाण्यासाठ्याची A टू Z माहिती
राज्यातील सर्व प्रमुख धरणं तुडुंब भरली, मोठ्या शहरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; राज्यातील धरणांमधील पाण्यासाठ्याची A टू Z माहिती
Sharad Pawar : इकडे शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा विषय उडवून लावला, तिकडे पंतप्रधान मोदींना बारामतीत बोलावलं, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
इकडे शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा विषय उडवून लावला, तिकडे पंतप्रधान मोदींना बारामतीत बोलावलं, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Maharashtra Goverment Cabinet Decision: पुणे, अहिल्यानगरपासून सोलापूर परभणी, नांदेडपर्यंत...; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 धडाकेबाज निर्णय
पुणे, अहिल्यानगरपासून सोलापूर परभणी, नांदेडपर्यंत...; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 धडाकेबाज निर्णय
Sharad Pawar on NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं महत्त्वाचं भाष्य, थेट उडवूनच लावलं, म्हणाले....
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं महत्त्वाचं भाष्य, थेट उडवूनच लावलं, म्हणाले....

व्हिडीओ

Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!
Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambernath Crime Cat death: मांजरीला ढकलणाऱ्या माथेफिरुच्या घरी पोलीस धडकले, मुलगा म्हणाला, 'माझे बाबा वयस्कर, आताच रिटायर्ड झालेत'
मांजरीला ढकलणाऱ्या माथेफिरुच्या घरी पोलीस धडकले, मुलगा म्हणाला, 'माझे बाबा वयस्कर, आताच रिटायर्ड झालेत'
ही काय संसद आहे का? MIDC मधील कंपनीच्या गेटवर अडवताच भाजप नेता संतापला; कंपनी प्रशासनाला दिला इशारा
ही काय संसद आहे का? MIDC मधील कंपनीच्या गेटवर अडवताच भाजप नेता संतापला; कंपनी प्रशासनाला दिला इशारा
ग्रामस्थांच्या मरणयातना सुरूच, गावात स्मशानभूमी नसल्याने चक्क ग्रामपंचायती समोरच मृतदेहावर अंत्यसंस्कार
ग्रामस्थांच्या मरणयातना सुरूच, गावात स्मशानभूमी नसल्याने चक्क ग्रामपंचायती समोरच मृतदेहावर अंत्यसंस्कार
Maharashtra Goverment Cabinet Decision: पुणे, अहिल्यानगरपासून सोलापूर परभणी, नांदेडपर्यंत...; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 धडाकेबाज निर्णय
पुणे, अहिल्यानगरपासून सोलापूर परभणी, नांदेडपर्यंत...; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 धडाकेबाज निर्णय
Kolhapur Crime News: म्हशीच्या गोठ्यात प्रियकरानं माजी सरपंच महिलेचा गळा आवळला, कोल्हापूरमधील अनैतिक संबंधांचा भयानक शेवट, कारची डिक्की उघडताच पोलीस चक्रावले
म्हशीच्या गोठ्यात प्रियकरानं माजी सरपंच महिलेचा गळा आवळला, कोल्हापूरमधील अनैतिक संबंधांचा भयानक शेवट, कारची डिक्की उघडताच पोलीस चक्रावले
Shetkari Karjmafi: कर्जमाफीच्या यादीमध्ये गोंधळ; यादीतील रक्कम, केवायसीवरील रक्कम अन् कर्जांच्या रकमेतही तफावत, शेतकऱ्यांचा संताप, नेमकी अडचण काय?
कर्जमाफीच्या यादीमध्ये गोंधळ; यादीतील रक्कम, केवायसीवरील रक्कम अन् कर्जांच्या रकमेतही तफावत, शेतकऱ्यांचा संताप, नेमकी अडचण काय?
'गटार छाप, आई-बापाच्या जीवावर ऐश, ड्रग्ज, दारू घेणाऱ्या, कित्येकांसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या...'; हिंदू तरुणींबाबत कंगना नको नको ते बरळली
'गटार छाप, आई-बापाच्या जीवावर ऐश, ड्रग्ज, दारू घेणाऱ्या, कित्येकांसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या...'; हिंदू तरुणींबाबत कंगना नको नको ते बरळली
NCP Merger Talking: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
Embed widget