YouTube Guidelines : महिलांनो युट्यूबर व्हायचंय? Youtube कडून महिलांसाठी खास संधी, मोबाईल घ्या, व्हिडीओ बनवा अन् महिन्याभरात मालामाल व्हा!
सध्या सगळ्यांनाच युट्यूबर होण्याची स्वप्न रंगवताना दिसतात. त्यात अनेकांना युट्यूबवरुन कमाई करायची असते. गुगलच्या व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफार्म असलेल्या युट्यूबवर आता महिलांना चांगली कमाई करता येणार आहे.
YouTube Guidelines : सध्या सगळ्यांनाच युट्यूबर (YouTube Guidelines) होण्याची स्वप्न पडतात. त्यात अनेकांना युट्यूबवरुन कमाई करायची असते. यात महिलांनादेखील चांगली संधी आहे. गुगलच्या व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफार्म असलेल्या युट्यूबवर आता महिलांना चांगली कमाई करता येणार आहे. त्यात या महिलांनी युट्यूबने सांगितलेल्या स्टॅटजीनुसार व्हिडीओ करुन युट्यूब चॅनेल अपलोड करुन जर आपलं युट्यूब चॅनल सुरु केलं तर त्यांचं चॅनल लगेच मॉनिटाईज होणार आहे.
काय आहे युट्यूबची नवी स्ट्रॅटजी?
युट्यूबने आता नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहे. या महिलांना मोठी संधी उपलब्ध करुन देणार आहे. यात अडल्ट कंटेन्ट आपलोड केल्यास महिलांचं चॅनेल लगेच मॉनिटाईज होणार आहे. मात्र, यासाठी काही अटीदेखील देण्यात आल्या आहेत. महिला आता स्तनपान करतानाचे व्हिडीओ (YouTube now allows monetization on videos with breastfeeding) अपलोड करु शकणार आहेत. यात शररीराचा कोणताही भाग दिसला तरीही हा व्हिडीओ ग्राह्य धरला जाणार आहे. मात्र नग्नतेला युट्यूबचा विरोध कायम आहे. यापूर्वी युट्यूबवर असा कंटेन्ट अपलोड केला गेला आहे. या व्हिडीओला मिलियन्समध्ये व्हिव्ह्जदेखील आहेत पण त्यातून रेव्हेन्यू जनरेट होत नव्हता आता मात्र महिला मालामाल होणार आहेत.
त्यासोबतच स्तनपान करताताना माहिती देणाऱ्या व्हिडीओला प्राधान्य देण्यात येणार आहे. फक्त स्तनपान करुन अंगरप्रदर्शन करणाऱ्या व्हिडीओला कमी प्राधान्य असणार आहे. त्यामुळे आता महिला काम करता करतादेखील युट्यूबर होऊ शकणार आहेत. महत्वाचं म्हणजे बाळांतपण झालेल्या महिलांना अनेक ठिकाणी नोकरी करणं शक्य नसतं त्यात बाळाच्या देखभालीवरदेखील लक्ष देणं गरजेचं असतं. मात्र युट्यूबने घेतलेल्या या निर्णयामुळे आता महिला स्वावलंबी होण्यास मदत होणार आहे.
अश्लील व्हिडीओला युट्यूबचा विरोध कायम?
यूट्यूबने म्हटलं आहे की, ते आपल्या वापरकर्त्यांच्या अभिप्रायानंतर स्तनपानावर मॉनिटायझेशन फीचर आणत आहे. खरं तर अनेक पालक यूट्यूबवर स्तनपानाशी संबंधित कंटेंट पाहतात आणि हे लक्षात घेऊन कंपनी आता क्रिएटर्सना पैसे देत आहे. कंपनीद्वारे केवळ माहितीपूर्ण व्हिडिओंचे मॉनिटाईज केले जाईल. व्हिडिओमध्ये नग्नतेचा प्रचार केल्यास अशा कंटेंटचे मॉनिटायझेशन कंपनी करणार नाही. सेक्स आणि नग्न व्हिडीओला युट्यूब ब्लॉक करणार आहे. त्यामुळे स्तनपान करताना असले तरीही माहितीपूर्ण व्हिडीओ असणं गरजेचं असणार आहे.
इतर महत्वाची बातमी-