अजित पवारांच्या निवासस्थापासून हाकेच्या अंतरावर तरूणीचा विनयभंग, बारामती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
तरूणीला जबरदस्तीने फरफटत घराबाहेर नेऊन तिला जखमी केल्याप्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

बारामती : बारामतीतील अजित पवारांचे (Ajit Pawar) निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटीच्या गेटवर तरुणीला मारहाण झाली आहे. बारामती शहरातील सहयोग सोसायटी येथे तरुणी मेहंदी काढण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी याने अरफाज सादिक आत्तार याने तरुणीचा विनयभंग केला आहे. तसेच तिला फरफटत घराबाहेर नेऊन तिला जखमी केल्याप्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी सहयोग सोसायटी येथे मेहंदी काढण्यासाठी गेली होती. ज्या घरात मेहंदी काढण्यासाठी गेली होती त्या घरात जाऊन आरोपीने फिर्यादीस बाहेर बोलून घेतले. त्यानंतर तू माझ्याबरोबर चल असे म्हणून तिचा डावा हात ओढून पकडून फरफटत ओढत बंगल्याच्या गेटच्या बाहेर नेऊन माझ्याशी लग्न कर असे सांगितले. त्यानंतर तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्या गालावरून हात फिरवून तू मला आवडते आरोपी म्हणाला. आरोपीने पीडितेचा विनयभंग करून तिला ढकलून खाली पाडून तिचे गुडघ्यास जखम करून तिला शिवीगाळ दमदाटी केली.
बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आली आहे. ज्या सहयोग सोसायटी मध्ये तरुणीला जखम झाली आहे त्या सोसायटीत अजित पवारांचे घर आहे. बारामती शहर पोलिसांनी भा.द.वि. 354, 354D, 323, 363, 504, 506 गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास बारामती पोलिस करत आहे.
Before You Go
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report





















