(Source: ECI/ABP News/ABP Majha)
World Top 10 Jam Cities : दिल्ली-मुंबईपेक्षा जास्त वाहतूक कोंडी, पुणे जगात सातव्या तर भारतात दुसऱ्या क्रमांकावर!
पुण्यातील वाहतूक कोंडीने मुंबई, दिल्लीलाही मागे टाकलेय. जगभरातील 387 शहरांतील वाहतूक कोंडीबाबतचा एम्स्टर्डमच्या टॉमटॉमने एक रिपोर्ट जारी केला. त्या रिपोर्ट्सनुसार, जगभरातील सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या शहरात पुणे सातव्या क्रमांकावर आहे.
World Top 10 Jam Cities : वाहतूक कोंडी अन् पुणे हे एक नातेच तयार झाले आहे. पुणे शहरात उद्योग उभे राहिले. शिक्षणाच्या चांगल्या संधी निर्माण झाल्या. यामुळे पुणे शहराचा विकास चौफेर झाला. बाहेरुन पुणे शहरात येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. यामुळे सर्वात जास्त वाहने पुणे शहरात आहे. पुण्यातील वाहतूक कोंडीने मुंबई, दिल्लीलाही मागे टाकलेय. जगभरातील 387 शहरांतील वाहतूक कोंडीबाबतचा एम्स्टर्डमच्या टॉमटॉमने एक रिपोर्ट जारी केला. त्या रिपोर्ट्सनुसार, जगभरातील सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या शहरात पुणे सातव्या क्रमांकावर आहे. तर भारतातील दुसरे शहर ठरलेय. पुण्याने मुंबई आणि दिल्ली या शहरांना मागे टाकलेय.
एम्स्टर्डमच्या टॉमटॉम कंपनीने जगातील 387 शहराच्या वाहतूक कोंडीचा रिपोर्ट जारी केलाय. 2023 च्या या रिपोर्ट्सनुसार, लंडनमध्ये जगभरात सर्वात जास्त वाहतूक कोंडी होते. आयरलँडमधील डबलिन दुसऱ्या तर टोरंटो तिसऱ्या क्रमांकावर आहे. टॉप 10 शहरांमध्ये भारतातील दोन शहरांचा (बेंगलोर आणि पुणे) क्रमांक लागतो. बेंगलोर भारतातील पहिले तर जगभरातील सहावे वाहतूक कोंडी होणारं शहर आहे. या यादीमध्ये पुणे सातव्या क्रमांकावर आहे.
या रिपोर्ट्सनुसार, लंडनमध्ये दहा किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी सरासरी 37 मिनिट 20 सेकंदाचा कालावधी लागतो. या शहराची कंजेशन लेवर 45 टक्के इतकी आहे. भारतामधील बेंगलोरमध्ये दहा किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी सरासरी 28 मिनिट 10 सेकंदाचा कालवधी लागतो. बेंगलोर शहराची कंजेशन लेवर 63 टक्के इतकी आहे. पुण्यात दहा किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी 27 मिनिट 50 सेकंदाचा वेळ लागतो. पुणे शहराची कंजेशन लेवल 57 टक्के इतकी आहे. खासकरुन सकाळी आणि सायंकाळच्या वेळी पुण्यातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रामाणावर वाढते.
दिल्ली आणि मुंबईची स्थिती काय ?
राजधानी दिल्लीमध्ये दहा किलोमीचरचं अंतर पार करण्यासाठी 21 मिनिटांचा कालावधी लागतो. या शहराची कंजेशन लेवल 48 टक्के आहे. टॉमटॉम कंपनीच्या रिपोर्टमध्ये दिल्ली 44 व्या क्रमांकावर आहे. भारताची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये दहा किमीचं अतंर पार करण्यासाठी 21 मिनिट 20 सेकंद इतका वेळ लागतो. या शहराची कंजेशन लेवल 43 टक्के इतकं आहे. टॉमटॉमच्या रिपोर्टमध्ये मुंबई 54 व्या क्रमांकावर आहे.
सर्वात जास्त वाहतूक कोंडी होणारी जगातील 10 आघाडीची शहरं Here are the top 10 most congested cities in 2023 according to the TomTom Traffic Index:
1. लंडन. London
2. डब्लिन Dublin
3. टोरंटो Toronto
4. मिलन Milan
5. लिमा Lima
6. बेंगलोर Bengaluru
7. पुणे Pune
8. बुखारेस्ट Bucharest
9. मनिला Manila
10. ब्रुसेल्स Brussels